mulana-shist-lavnyachya-paddthi

जस जसं तुमचे मुल मोठं होत जातं, तस तसं त्याच्या चुकीच्या वर्तणुकीवर मर्यादा घालणे हे महत्वाचे असते. अश्यावेळी नुकत्याच चालायला लागलेल्या मुलाला शिस्त लावण्याचा काम जेवढया लवकर हाती घ्याल, तेवढे आपल्या मुलाच्या शिस्तबद्ध वाढीसाठी चांगले असते. नंतर त्याचा बेशिस्तपणा आणि चुका टाळणे अशक्य होवून बसते म्हणून अश्या वर्तनावर अंकुश ठेवून ते कमी करणे अतिशय योग्य ठरते. 

 

तुमच्या मुलाला शिस्त लावण्यासाठी काही सोप्या क्लृप्त्या दिलेल्या आहेत.

            १   मुलांना मारू नका.

कोणत्याही परिस्थितीत मुलावर हात उगारू नका, ज्या क्षणी आपण आपल्या लाडक्या मुलावर हात उगारता, त्यावेळी तुम्ही त्याला तुमच्या विरुद्ध बंडखोर बनण्यासाठी प्रोत्साहित करत असता. त्याचा कोणत्याही कृती बाबत निराशा व्यक्त करण्यासाठी हात उगारण्या ऐवजी शब्दांचा उपयोग करा आणि तसेच आपल्या कुटुंबातील कोणालाही मुलावर  हात उगारु देऊ नका.

  २   तुमचा तोल सांभाळा .

जेव्हा तुमचे मुल शिस्त मोडते तेव्हा तुमचा होणारा संताप त्याला अधिकच बंडखोर बनवण्यास मदत करतो, त्यामुळे त्याच्याशी वागताना तुमचा तोल सांभाळा

  ३  चांगल्या वर्तनाचा आदर्श

तुमचे मुल तुमचीच नक्कल करते, तुम्ही जे काही करता त्याची नक्कल करण्याचा ते प्रयत्न करते, त्यामुळे त्याच्या समोर पालकांनी स्वतःचे वर्तन चांगले ठेवणे आवश्यक असते, जेणेकरून तुमचे मुल तुमच्याकडून फक्त चांगल्याचा गोष्टी आत्मसात करू शकेल. यामुळे मुलांना शिस्त लावण्याचे काम अतिशय सोपे होईल .

  ४  चांगल्या वर्तणुकीस प्रोत्साहन

जेव्हा तुमचे मुल चांगले वागायला लागते तेव्हा त्यांना बक्षीस द्या आणि प्रोत्साहित करा. हे लाच देण्यासारखे वाटू शकते परंतु आपल्या पाल्याला शिस्त लावण्यासाठी ही अतिशय योग्य पद्धत ठरते. एखादी चांगली गोष्ट केल्यामुळे मिळालेल्या बक्षिसाचा ते आनंद घेतील आणि आणखी काहीतरी चांगले करण्यासाठी ते प्रोत्साहित होतील.

  ५  पुरेसे लक्ष ठेवणे

पालकांच्या मुलांकडे दुर्लक्ष करण्याच्या धोरणांमुळे मुलांमध्ये शिस्तीचा अभाव दिसून येतो, आपल्या वाढणाऱ्या मुलाकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नका कारण तसे केल्यास  मुल जसे मोठे होत जाईल तसं तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. एकदा आपलं मुल बाल्यावस्थेत पोहचल्यावर त्यांला शिस्त लावणे अशक्य होऊन बसते, म्हणून आपल्याकडून जेवढे काही प्रयत्न करता येतील तितके साधारणता मुल १२ ते ३६ महिन्यांचं असताना करावे. मुल जस जसं मोठे होत जाते तस तसं त्याच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असते.

 ६  टाईम आऊट  तंत्र

शिस्त लावण्यासाठी पालकांमध्ये हा लोकप्रिय प्रकार आहे, हेच दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर शिक्षा देण्याचा हेतू म्हणजे शिस्त लावण्यासाठी आपल्या पाल्याला आपल्या पासून आणि सगळयांपासून काही वेळा करता एकटं ठेवणं. आपल्या पाल्याला त्यांची चूक समजण्यास काही वेळ इतरांपासून वेगळं ठेवावं आणि त्याच्या चुकीच्या वर्तणुकी बद्दल स्वतः माफी मागायला लावण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तुम्ही पाल्याला शिक्षा देताना जास्त वेळ शिक्षा देत नाही ना, याची काळजी घ्या, कारण त्यामुळे तुमच्या पाल्याचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.

Leave a Reply

%d bloggers like this: