aai-va-balasathi-aambyache-6-fayde

फळांमध्ये आंब्याला “फळांचा राजा” अशी उपमा देण्यात आली आहे. त्याच्या आगमनाची  वर्षभर आतुरतेने  वाट पहावी लागते. तो चवीने रसाळ आणि मधुर असून आरोग्यास तितकाच उपयुक्त असतो. आंब्याच्या सेवनाने होणारे आई आणि बाळाच्या आरोग्य विषयक फायदे बघून तुमचा हा आंब्याचा मोसम आनंददायी जाणार आहे

१. रोग प्रतिकारशक्ती वाढवतो

आंब्याचा मर्यादित  सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच याचे अति सेवन केल्यास पोटदुखी होऊ शकते

२. कर्करोगास प्रतिबंध करतो

हे पोषक फळ आई व बाळाला मोठे आतडे, रक्त, स्तन, पुर:स्थाचा कर्करोग(मूत्राशयाच्या निमूळत्या भागावर असणारी ग्रंथी)  होण्यापासून दुर ठेवते तसेच संभाव्य धोक्यांशी लढण्याची शक्ती देते.

३. मेद कमी करतो

आंब्यात जास्त प्रमाणात तंतुमय घटक असल्यामुळे शरीरातील मेदाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

४. गरोदरपणातील आंब्याचे सेवन

गरोदर महिलांसाठी आंब्यासारखा उत्तम फळ नाही.आईला व तिच्या बाळाला उपयुक्त असलेले लोह, अ, क, ब ६ ही जीवनसत्वे आंब्याचा योग्य प्रमाणातील सेवनाने मिळतात. गरोदरपणात आंब्यासारखे मधुर फळ आईने खाल्याने  कदाचित भविष्यात आंबा हेच बाळाचं आवडतं फळ होईल

५. उत्कृष्ट व निरोगी कामजीवन

आंबा हे फळ उत्तम कामोत्तेजकाचे काम करते व या फळाच्या सेवनामुळे  वैवाहिक जीवन अधिक आनंददायक होते. एकमेकांसोबतचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी पती-पत्नीने आंब्याचे भरपूर सेवन करावे.

६.डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहाते

आई व बाळ दोघांनी नियमितपणे योग्य प्रमाणात आंब्याचे सेवन केल्यास  औषधोपचाराविना त्यांची दृष्टी उत्तम राखण्यास मदत होते.

Leave a Reply

%d bloggers like this: