vadil-ani-ladkya-lekicha-ha-video-tumchya-dolyat-pani-anel

     बाबा आणि त्यांची गोड राजकुमारी, यांच नातं आयुष्यभरासाठीचं असतं.या दोघांमधल्या छोट्या- छोटया गंमती- जंमती, त्यांनी ठरवलेल्या बेत, बाप-लेकीची गुपीतं,असं बाप लेकीचं एक वेगळंच  जग असतं आणि या जगात कोणालाच प्रवेश नसतो. त्याच लाडक्या लेकीला सासरी पाठवताना वडीलांचा कंठ दाटून येतो.अश्या बाप लेकीच्या नात्याचे हळूवार क्षण तनिष्कच्या नव्या जाहिरातीत अप्रतिमपणे रेखाटले आहेत.

या जाहिरातीत मुलीचं लग्न लागण्याआधीची वडलांच्या मनाची अवस्था हृदयाला स्पर्श करून जाते. वडीलांचं आपल्या लाडक्या लेकीवर असणारं प्रेम आणि तिची पाठवणी ही त्यांच्यासाठी एक परिक्षाच असते.आपल्या हृदयावर दगड ठेवून तिचा हात तिच्या जोडीदाराच्या हातात देताना बाबांना हेवा वाटतो. लग्न निर्विघ्न पार पाडण्याची चिंता, लग्न घरातली गडबड आणि या सगळ्यात काळजाचा तुकडा दुरावत असल्याचं दुःख असे नाजूक प्रसंग तनिष्कने सुंदररित्या दाखवले आहेत.

वडीलांसाठी हे जितकं अवघड असतं, तेव्हढाच त्यांच्या लाडक्या लेकीला देखील पण क्षणभरासाठी हे  सगळं विसरून  बाबा आणि त्यांच्या राजकुमारीला या जाहिरातीत नाचतांना बघून एकाच वेळी नयनी अश्रू आणि ओठावर हसू  येतं.

 

Leave a Reply

%d bloggers like this: