sasubai-barobar-na-talta-yenare-vad-

लग्न हा एक ना सुटणार गुंता आहे. यामध्ये प्रचंड चढ-उतार असतात कधी कधी इतकी वाईट परिस्थिती येते कि सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावेसे वाटते. बहुतेक वेळेस या सगळ्यास घरातली एक स्री जबाबदार असते आणि ती म्हणजे तुमच्या सासूबाई. एका क्षणांत त्यांच्या चेहऱ्यावर हसू असते आणि पुढच्याच क्षणी त्या रुसून बसतात

तुमची त्यांच्यासोबत अटळ असणारी काही भांडणं पुढे दिलेली आहेत 

. सर्वोत्कृष्ठ सुगरण 

तर, लक्षात राहू द्या कि तुमच्या सासूबाई या  जगातल्या सर्वश्रेष्ठ सुगरण आहेत, कारण त्यांना तसं वाटतं. तुम्हाला स्वयंपाकमधलं काही कळतं यावर त्यांचा तिळमात्र विश्वास नसतो. त्यामुळे त्यांच्या मुलाचं कसं होणार असे टोमणे तुम्हांला नेहमी ऐकायला लागणार आणि त्यामुळे स्वयंपाक वरून होणाऱ्या भांडणसाठी तयार राहा 

 २.  स्वच्छतेच्या गुरु 

त्या स्वच्छतेच्या गुरु आहेत आणि तुमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे त्या घर स्वच्छ ठेवतात.  केर काढण्याचा तुम्ही कितीही चांगला प्रयत्न केला तरी केर राहिलेली एखादा तरी कोपरा त्या शोधून काढतील आणि त्यावरून तुमची खरडपट्टी काढतील. ही अशी लढाई आहे जी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही म्हणून तस प्रयत्न देखील करू नका

३. देव,धर्म,कर्मकांड  

देव,धर्म ,उपास-तपास पूजा अश्या धार्मिक आणि कर्मकांडाच्या  गोष्टींच्या त्या स्वयंघोषीत पंडित असतात. त्यांना असं  वाटत असतं प्रार्थनेसाठी योग्य प्रकारे हात कसे जोडावेत हे सुद्धा तुम्हाला माहित नाही त्यामुळे याविषयात तुम्ही त्यांचाशी चर्चा न करणंच तुमच्यासाठी योग्य ठरेल नाहीतर देव नाही पण सासू बाई नक्कीच कोपतील

. सर्व मातांच्या माता 

त्या तुम्हाला मुलाचं संगोपन कसं करावं हे सांगतील आणि तुमच्या पतीचं संगोपन केल्यामुळे त्या कश्या महान आहेत हे सुद्धा सांगतील  त्यांच्यामते, तुम्ही तुमच्या मुलाला बिघडवता आणि वेळेपरत्वे त्यांच्याशी कठोर वागता.आणि हे कसे अयोग्य आहे हे तुम्हाला कायम  सांगत राहतात. तुमच्या मुलाला तुम्ही कसं वळण लावण्याची गरज आहे याचे धडे त्या तुम्हाला रोज देत असतात.

 

५.  सर्वोत्कृष्ठ परीक्षक/न्यायाधीश 

सतत परीक्षकाच्या भूमिकेत जाऊन  तुमची आणि आपल्या लेकीची तुलना करतील. त्यांची मुलगी  ही  कशी  एक चांगली आई आणि चांगली सुगरण आहे याचा उल्लेख त्या वेळोवेळी करतील आणि आणि तुम्हाला कसा साधा चहा करता येत नाही आणि मुलांना वळण  लावता येत नाही याचा पाढा वाचतील आणि त्यामुळे तुम्ही त्रासून जाल.

तुमच्यामध्ये आणि तुमच्या सासूबाईमध्ये काही भांडण अटळ असली तरी तुम्ही त्यांना समजून घ्या. त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करा किंवा शांततेने राहण्याचा निर्धार करा.तुमच्या लग्नानंतर त्यांच्या मुलाच्या आयुष्यात त्याचे महत्व कमी तर होणार नाही ना?  या असुरक्षित भावनेनं अटळ अशी भांडणे होतात त्यामुळे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: