tumcha-navra-asa-aahe

तो तुमचा सगळ्यात जवळचा मित्र असू शकतो,सखा-सोबती असू शकतो किंवा तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे तो असू शकतो आणि तुम्हाला त्रास देणारा, खट्याळ, सतत खोड्या काढणारा प्राणी म्हणजे सुद्धा तुमचा नवरा असू शकतो.  पण जर तो उत्तम साथीदार असेल तर अभिनंदन! तुम्ही नशीबवान आहात!   

पण तुम्ही हे कसे ओळखाल?
तर आम्ही इथे देत आहोत उत्तम नवऱ्याची ८ लक्षणे, जी तुम्हाला पटवून देतील की तुमचा जोडीदार तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे की नाही.

१)  तुमचं मन जिंकण्यासाठी काहीही 


रोमान्स आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर  सगळ्यांनाच भावतो. एखाद्या दिवशी तुम्हाला खुश करण्यासाठी लवकर घरी येणे असो, खास तुमच्यासाठी बनवलेला ब्रेकफास्ट असो किंवा तुमच्यासाठी सजवलेला डिनर. तो नेहमी नवनवीन गोष्टींनी तुम्हाला खुश करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आणि त्याने केलेल्या सगळ्या गोष्टींमधून त्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसत असेल तर, खात्री बाळगा तो तुमच्यासाठी योग्य आहे!

२) तुमचे मत आवडते 

विश्वास हा नात्यातला महत्वाचा आणि नाजूक धागा असतो.जर तो त्याच्या प्रश्नांसंबंधी तुमच्याशी चर्चा करून तुमचा सल्ला किंवा मत विचारात घेत असेल तर तुमच्या दोघांमध्ये खूप चांगले बंध आहेत. याचा अर्थ तो तुमच्या मतांचा आदर करतोय, तुमचा दृष्टीकोन त्याच्यासाठी महत्वाचा आहे. एकमेकांचा मतांचा आदर करणे हे उत्तम नात्याचं लक्षण आहे.

३) तो तुमचे कौतुक करतो

थोडं कौतुक आपल्याला नेहमीच आवडत. तो तुमचं कौतुक करतो, तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो, त्याचा मित्र –परिवारासमोर तुमचं  नाव कौतुकाने घेतो, तुमच्या कला-गुणांचं कौतुक करतो. सर्वात सुंदर तेंव्हा वाटत जेंव्हा त्याच्या नकळत तुम्ही त्याच्या तोंडून तुमचं कौतुक ऐकता.

 ४) तुमचा हात कधीच सोडत नाही 

बाहेर असताना हात हातात घेणे, सोबत राहणे ह्या साध्या साध्या गोष्टींतून त्याची तुमच्या विषयीची ओढ, विचार आणि भावना न बोलता स्पष्ट होते. तुम्हाला नेहमी सुरक्षित वाटावे आणि तो सदैव तुमच्या बाजूने उभा आहे ह्याची जाणीव तुम्हाला करून देण्यासाठी तो नेहमी झटत असतो.

५)  तुम्हाला जे आवडत नाही त्यालाही आवडत नाही 

एका समंजस पतीला महिन्याच्या ‘त्या दिवसात’ काय बोलावे आणि कसे वागू नये हे नक्कीच कळते. तो तुमच्या भावना समजून घेऊन तुमच्या रीतीने वागतो. तुमच्याशी गोडीने बोलून, प्रेमाने वागून तुम्हाला आराम वाटेल असे पाहतो. कधीतरी तुमच्या दुखण्याला उपाय म्हणून तो मसाज देखील देऊ पाहतो, तर तो नक्कीच एक परिपूर्ण नवरा आहे.

६) तो घरातही तुम्हाला मदत करतो 

तुमचे स्वयंपाकघर असो किंवा बाथरूम असो तो नेहमी स्वच्छतेच्या बाबतीत तुमची मदत करतो. तुमच्या सोबत काही वेळ जास्तीचा घालवण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात, तुमच्यासोबतीने घरकाम करणे त्याला आवडते तर ही खूप छान गोष्ट आहे. तुमच्या समाधानासाठी का होईना त्याने साफ-सफाई केली असेल तर त्यानेही तुमच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकते.   

७) त्याला तुमच्या सोबत जेवायला आणि वेळ घालवायला आवडतं

तुम्ही जरी सुगरण नसाल तरी तो तुमच्या हातचं जेवण गोड मानून आनंदाने खातो आणि प्रसंगी विनोदही करतो. तुम्हाला हसवण्यासाठी तो नेहमी खट्याळ विनोद करतो आणि तुमच्या आवडीच्या विषयावर बोलत असतो. तुम्ही बनवलेल्या जेवणाची स्तुती करताना तो अजिबात थकत नाही आणि शेवटी त्याच्यासाठी तुमच्या गालातलं हसू हेच त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं!

८)  तो सोबत असतो तेव्हा कोणतीच फिकीर वाटत नाही 

 

कदाचित तुमचा नवरा एक परिपूर्ण व्यक्ती नसेलही, पण त्याचे तुम्हाला खुश ठेवण्याचे प्रयत्न तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी नक्कीच उत्साह देतात. त्याचं समर्पण, प्रयत्न, विचार आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे सगळे मार्ग हे कुठेतरी तुम्हीही लक्षात घेता आणि त्यातूनच प्रामाणिकपणे एक चांगली व्यक्ती होण्याचा पूर्ण प्रयत्न तुम्ही करत असाल तर तो नक्कीच तुमचा प्राणसखा आहे !

Leave a Reply

%d bloggers like this: