ya-varshatil-balasathichi-utkrusht-aashi-10-nave-marathi-name

या वर्षातील बाळांची उत्कृष्ट अशी १० नावे

नाव हे जन्मभरासाठी असते. जेव्हा बाळाच्या नामकरणाची वेळ येते तेव्हा काही पालकांना त्यांच्या बाळासाठी साजेसं नाव ठेवणे अवघड वाटते.जवळच्या नातेवाईकांपासून  ते दूरच्या नातेवाईकांपर्यंत शेजारच्यांपासून गुरुजी,धार्मिक गुरु अश्या सगळ्यांकडून मदत घेण्यात येते.यावर हल्ली एक चांगला खात्रीशीर उपाय आहे – इंटरनेट, जे त्यांना उत्कृष्ट नावे पुरवते.

आम्ही तुम्हांला तुमच्या बाळासाठी यावर्षात काही उत्कृष्ट आणि प्रसिद्ध अर्थासहित देणार आहोत  

मुलींची नावे अर्थासहित  

१.आभा- पालकांनी त्यांच्या छोट्या परीसाठी दिलेल्या प्रसिद्ध नावांपैकी एक नाव म्हणजे आभाचा अर्थ तेज असा आहे, हे नाव सर्वसाधारण असले तरी पालकांमध्ये लोकप्रिय आहे.

२.अक्षिता-अक्षिताचा अर्थ होतो ‘कधीच न बदलणारे’ किंवा कायमचे. जसे आई वडिलांचे प्रेम मुल कितीही मोठे झाले तरी कधीच बदलत नाही.

३.सानवी-सानवी हे देवी लक्ष्मीचे नाव आहे. हे नाव सौंदर्य, कृपादृष्टी, संपत्ती अश्या स्त्रियांच्या गुणांचे प्रतीक आहे. ज्यांना आधुनिक आणि धार्मिकदृष्ट्या प्रतीत असलेले नाव हवे आहे त्यांच्या मुलींसाठी हे नाव योग्य आहे.

४.मायरा- मायरा हे इंग्रजी नाव आहे तरीही असंख्य भारतीय पालकांकडून हे नाव वापरले जाते. हे मूळतः लेटीन शब्द ‘myrra’ या शब्दापासून आलेले नाव आहे. ज्याचा  अर्थ आहे कौतुकास्पद’ आणि ‘असामान्य’.

५.कियारा- भारतामध्ये बहुतेक भारतीय नावांपेक्षा प्रसिद्धी मिळवत असलेले एक पाश्चिमात्य नाव. कियारा चा अर्थ होतो ‘काळ्या केसांचा’ आणि हे एक मूळतः आयरिश नाव आहे. तर वर दिलेली नावे ही स्वतः भारतीय पालकांनी निवडून दिलेली आहेत आणि मुलींसाठी सर्वात प्रसिद्ध नावे आहेत.

मुलांची 5 नावे अर्थासहित

१. आरव- लहान मुलांसाठी सर्वात प्रसिद्ध नाव, आरव म्हणजे ‘शांत आणि सोज्वळ’. हे नाव केवळ आधुनिकच नाही तर भारदस्त अर्थ असलेले सुद्धा आहे जे भारतीय पालकांमध्ये त्याला प्रसिद्ध बनवते.

२.विवान- या नावाचा अर्थ होतो ‘सूर्याचा पहिला किरण’ आणि ह्या नावाची भगवान श्रीकृष्णाच्या नावातही गणती होते. विवान हे एक सुंदर नाव आहे जे स्वतःतच अद्वितीय असून सांगीतिक गुणधर्माचे वहन करते.

३. मुहंमद-मुहंमद हे नाव पुष्कळ प्रकारे लिहिले जाऊ शकते, आणि भारतीय पालकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. या नावाचा अर्थ होतो ‘प्रशंसनीय’, आणि हे नाव मुस्लीम पालकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.

४.अथर्व- ज्या पालकांना त्यांच्या मुलाचे नाव दोन्ही प्रकारे – अध्यात्मिक आणि आधुनिक असावे असे वाटते, त्यांच्यासाठी अथर्व हे नाव एक चांगला पर्याय ठरू शकते. अथर्व हे गणपतीच्या नावांपैकी एक नाव आहे. तसेच अथर्व हे चार वेदापैकी एक वेदांचे नाव आहे.

५.रुद्र-पुराणकथेतील भगवान शिवाचे दुसरे नाव, रुद्राचा अर्थ ‘वेदानानाशक’ असाही होतो. हे नाव सध्या भारतीय पालकांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे, म्हणून मुलांसाठी वापरले जाणारे आणि सर्वाधिक परिचित असलेले हे एक नाव आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: