lahan-mulanachya-sardi-khokalyavar-7-ghrguti-upaya

ज्यावेळी आपल्याला सर्दी खोकला होतो त्यावेळी आपली काय अवस्था होते आपण किती हैराण होतो याची कल्पना आपल्याला आहेच. जर असाच सर्दी खोकला आपल्या लहान मुलांना झाला तर  त्यांची काय अवस्था होईल याची कल्पना न करणेच बरे.यावेळी मुलं चिड-चिडी होतात अश्यावेळी काही घरगुती उपायांमुळे त्यांना थोड्या फार प्रमाणात थोडासा आराम पडू शकतो असे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत 

१. आहारात द्रव पदार्थाचे प्रमाण वाढवावे

सर्दी आणि कफ झाल्यावर थंडीमुळे कमी तहान लागते त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते. त्यामुळे सर्दी आणि कफ जर सुकण्याची शक्यता असते आणि सर्दी आणि कफ सुकला तर जास्त त्रास होतो. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यावर शरीरातील पाण्याचा तोल सांभाळणे गरजेचे असते. यावेळी सामान्य तापमानापेक्षा थोडे उष्ण द्रव पदार्थ म्हणजेच सूप,सार, वरणाचे पाणी अश्या पातळ पदार्थांचे  आहारातले प्रमाण वाढवावे. तसेच थोड्या थोड्या वेळाने मुलाला कोमट पाणी पाजावे

२. तुळशीची पाने

तुळशीची पाने ही सर्दी आणि खोकल्यासाठी औषध म्हणून विविध प्रकारे वापरतात  तान्ह्या बाळाला सर्दी आणि पडसं होऊ नये म्हणून बाळंतिणीने रोज ५ ते ७ तुळशीची पाणी खाल्ल्यास अंगावर दूध पिणाऱ्या बाळाला सर्दी खोकला होत नाही. त्याचप्रमाणे  लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा मधासोबत रोज २ वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या विकारांपासून संरक्षण होते. ( हा उपाय वैद्यकीय सल्ल्याने करावा)

३. दूध आणि हळद

गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून बाळाला पाजावे यामुळे लहान मुलांना सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठीच नाही तर  मोठ्यांसाठी देखील उपयुक्त आहे ठरतो.

४. लसूण आणि ओव्याचा शेक

लसणाच्या काही पाकळया आणि ओवा तव्यावर चांगलं भाजून एका कापडात घेऊन त्याचा हलका शेक मुलांच्या छातीला द्यावा. जर ६ महिन्यांपेक्षा लहान मुल असेल तर मिश्रण असलेल्या कापडाची पुरचुंडी करून बाळाच्या पलंगाला बांधावी किंवा त्याचा आसपास ठेवावी  जेणेकरून त्याचा बाळाच्या  श्वासाबरोबर आत जाईल व त्याला आराम  पडेल.

५. काढा

सर्दी खोकला म्हणालं की काढा हा आलाच. सर्दी आणि खोकला दूर पळवायचा असेल तर, ४ तुळशीची पाने,३ लवंगा,२ वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे,थोडासा गवती चहा, ४ कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात थोडी  साखर घाला आणि हा  हा काढा  २ वर्षावरील मुलाला दिवसातून  दोनदा द्यावा

६. सुंठ व वेखंडचा लेप

लहान मुलांना सर्दी झाल्यावर आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीस सर्दीने डोके दुखत असेल तर थोड्या प्रमाणात सुंठ आणि थोडी वेखंड उगाळून किंवा त्यांची पावडर एकत्र करून पाण्यात कालवून कपाळावर लावावी. (२ वर्षावरील मुलांसाठी )सुंठ आणि वेखंड पावडर एकत्र करून पाण्यात कालवून लोखंडी पळी किंवा छोट्या लोखंडी कढाईत शिजवून कोमट करून  त्याचा लेप कपाळावर लावावा  

 ७. चाटण

२ वर्षावरील मुलांस कोरडा खोकला झाला असल्यास आल्याचा रस २ चमचे त्यात दीड चमचा गुळ किसून घाला. ते चाटण दिवसातून २ ते ३ वेळेला चाटायला दयावा.

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: