5goshti-jya-prasutinanatr-tumchya-sathidarala-sangaychya-astat

तुमच्या जोडीदाराला काही गोष्टी पत्नी म्हणून तुम्हाला सांगायच्या असतात, पण त्या कशा सांगाव्यात हे त्याला उमगत नाही. तुमचा काही गैरसमज होऊ नये यासाठी कदाचित त्या योग्य रितीने सांगण्याचा तो विचार करत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे मन दुखावले जाऊ नये म्हणून तुमच्या कलेने घेण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतील.

प्रसुतीनंतरच्या ह्या काळात तुमच्या साथीदाराला या ५ गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात     

१. नाते सर्वार्थाने पूर्वपदावर आणायचा प्रयत्न 

बाळ आल्यावर इतक्या सगळ्या गोष्टी आजुबाजुला घडत असतात, तसेच बाळंतपणामुळे येणार थकवा तेंव्हा थकव्यामुळे या सर्व तुमची कामभावना मंदावणे साहजिक आहे. इच्छा नसणे बरोबर आहे पण पहिली पायरी म्हणजे नात्यात ती इच्छा पुन्हा नव्याने निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेतलात तर उत्तमच. एखाद्या रात्री बाहेर जाण्याचा बेत बनवला तर रंगत येईल. तेवढेच बाळाला सांभाळण्याची जबाबदारी घरच्यांना दिली तर हरकत नाही. 

२. तुमच्यातील बदल
 बाळंतपणात वजन वाढते, ते सहाजिकच आहे. सोबतीला त्वचेवर येणारे ताणाचे व्रण, खाण्यात बदल झाल्यामुळे होणारे बदल शरीरावर दिसू लागतात. पण तुम्ही एका नव्या जीवाला तुमच्या आत वाढवतांना झालेले हे बदल आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी लाज वाटण्यासारखं काहीच मनात बाळगू नका आणि असं तुम्हाला वाटल्यास त्याला जाणवू देऊ नका . ह्या टप्प्यावर तुमच्या दोघांच्या नात्यातले धागे नक्कीच बाह्य रंगरुपाच्या पलिकडे पोहोचलेले आहेत त्यामुळे त्याचा लेखी या बाह्यरूपातील  हे नगण्य असतात .

३. दखल आणि स्तुती
तुमच्या पोटात बाळ असतांना तुमची काळजी घेण्याचं कर्तव्य तर तुमच्या जोडीदाराने उत्तमरीत्या पार पाडलेलं आहे. तुमच्या जवळ राहून तुमची हवी ती गरज पूर्ण केली आहे. तुम्ही त्याच्या या सर्व गोष्टींची कदर करता हे देखील तो जाणतो. पण ह्या गोष्टी जर बोलून दाखवल्या तर त्याचा परिणाम वाढेल नाही का? एक छानसं हसू, किंवा साधं ‘Thank you’ त्याची प्रशंसा करण्यासाठी म्हटलं तरीसुद्धा त्याला आवडेल. आणि आता तुम्हाला बरं वाटत असेल तर त्याच्यासोबत हळूहळू घरातली कामे हाती घ्यायला हरकत नाही.

४. एकांत
पुरुष निसर्गतः एकांतप्रिय असतात. त्यांना मोकळं होण्यासाठी थोडा एकांत हवा असतो. बाळासोबत आणि तुमच्यासोबत काही सुंदर वेळ घालवण्यासोबतच काही काळ त्याला एकट राहू दया. जेंव्हा केंव्हा तो टीव्ही बघतांना किंवा वाचन करत असतांना स्वतःसोबत बसलेला असेल तर बसू दया. अर्थातच ही गोष्ट दरवेळी सर्वच पुरुषांना लागू पडेल असं नाही.
५. पैसा 
स्वावलंबी असणाऱ्या पण वेगळं राहत असलेल्या जोडप्यांमध्ये पैशांचा विषय अनेकदा येतो. तुमच्या जोडीदाराला तुमची आणि तुमच्या आरोग्याची काळजी आहेच. घरभाडे, बाळाचा खर्च, नोकर-चाकर, औषधी, दवाखान्याचा खर्च हे सर्व एका व्यक्तीच्या कमाईवर ताण आणू शकते. तेंव्हा शक्य असेल तर लवकरात लवकर तुम्ही कामावर रजू होऊन त्याच्यावरचं ओझ हलकं करायला मदत केलीत तर त्यालाही बरे वाटेल. 

Leave a Reply

%d bloggers like this: