pach-prkarchya-sasu

लग्नाची लढाई तर तुम्ही जिंकलीच आहे. मग आता तुम्ही आयुष्यभर सुखी राहणार असं वाटत असेल तर तसं नाहीये, कारण आता तुम्ही एक छोटी लढाई  जिंकली आहे पण संसाराचे युद्ध चालू व्हायचं आहे. ज्यावेळी तुम्ही लग्न करतात, त्यावेळी पती बरोबरच  तुमचा संसार सासुबरोबर देखील सुरु होतो. जर त्या तुमच्याशी आई सारख्या वागत असतील तर तुमचे  वैवाहिक जीवन कायम आनंदी राहील. पण जर तसं नसेल तर मात्र तुमचं जीवन सासू सुनेच्या मालिकांसारखा होईल.

आम्ही तुम्हाला पुढील सासवांच्या ५ प्रकाराबद्दल सांगणार आहोत

१)  मत्सरी हेवा करणारी 

२)  लुडबूड करणारी 

३) भावनांचा खेळ करणारी

४)  महत्व हवं असणारी

५) समजूतदार सासू

 १)  मत्सरी हेवा करणारी – मुलाचे लग्न झाल्यावर त्याचा  संसार सुरु झाल्यावर  हळूहळू स्वतःचे वर्चस्व कमी व्हायला लागल्याची भावना सासूला सहन होत नाही, आतापर्यंत आपला मुलगा आपल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही पण आता तो त्याच्या बायकोचेच ऐकतो ही  कल्पना सहन न झाल्याने ती सासू मत्सर करायला लागते. छोट्या – छोट्या गोष्टीनी खटके उडायला लागतात

२)  लुडबूड करणारी – नवऱ्याबरोबर बाहेर जाऊन आल्यावर कुठे गेला होता? कुठे खायला गेलात? काय काय केले ? यासंबंधी सतत प्रश्न विचारणे. सतत  माहेरच्या झालेल्या  गोष्टींमध्ये नाक खुपसणे. बाहेरगावी फिरायला  जायला असून अडून विरोध करणे किंवा सहकुटुंब बाहेरगावी फिरायला जायचं बेत ठरल्यावर ठिकाण स्वतः ठरवून टाकणे. तुमच्या व पतीच्या  निर्णयांमध्ये लुडबुड करणे

३) भावनांचा खेळ करणारी – या प्रकारच्या सासू थोड्या तापदायक असतात, कारण छोट्या कारणांमुळे मुलाला तुला आता ‘माझी काही किंमत नाही’. असे सांगून भावनांशी खेळ सुरु होतो. जसे बेटा या चित्रपटात अनिल कपूरला त्याची आई ‘ मा का वास्ता’ देऊन ब्लॅकमेल करते.

४) महत्व हवं असणारी – या सासूला नेहमी वाटत असते की, आपल्या सुनने घरातले  सगळ्या गोष्टी त्यांना सांगाव्या. घरातले  प्रत्येक छोटे मोठे निर्णय हे त्यांचा सल्ल्याने घ्यावे. अगदी वेगळे राहत असले तरी घरात नुसता सोफाही बदलायचा म्हटलं तरी त्यांना  कळवायला पाहिजे. एखाद्या सण – उत्सवाला जर चुकून फोन  करायचा राहिलाच तर आयुष्यभर त्या त्याबद्धल ऐकवत राहणार

५) समजूतदार सासू – या प्रकारातील सासू समजून घेते.नवऱ्याशी  भांडण  झाल्यास  काही सल्लेही देते. ती तुमच्या व नवऱ्याच्या मध्ये पडत नाही. एकांत देते जेणेकरून दोघांचे नाते घट्ट होते. संसारात काही चुकी झालीच तर समजून घेते. म्हणजे अशी सासू मिळाली तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात.  

Leave a Reply

%d bloggers like this: