garodarpanat-navra-tumchya-pathishee-aahe-na

मातृत्व प्रत्येक स्त्रीसाठी आव्हानात्मक आहे. धकाधकीच्या आयुष्यात कुणालाच वेळ देता येत  नाही.  गरोदरपणात  स्त्री शारिरीकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या तणावात असते. या दिवसांमध्ये तिच्या हार्मोनन्स मध्ये बदल होत असल्याने; तिच्या भावना अल्लड होतात, कधी कधी ती खूप चिडते कधी शांत शांत असते . त्यातच शरीराची दुखणी,  व काही कुटुंबात मुलगाच पाहिजे असाही ताण  गरोदर मातेला  असतो. तेव्हा या गरोदरपणाच्या दिवसात पतीने पत्नीच्या सोबत असायला हवे.

ही सात कारणे तुम्हाला पटवून देतात, पतीने तिच्या गरोदरपणाच्या काळात पाठीशी का राहीले पाहिजे.

१) भावनिक आधार गरज

गरोदरपणात तिच्या हार्मोनल मध्ये बदल होत असल्याने तिचा स्वभाव लहरी बनतो.साध्या साध्य गोष्टीवरून तिची चिडचिड होते  आणि या काळात हे स्वाभाविक आहे म्हणून तुम्ही तिचा भावनिक  मित्र व्हायला पाहिजे, जो तिच्या संवेदना व वेदना समजू शकतो. तिच्याशी वेळ मिळाला तसा संवाद करत राहणे गरजेचे आहे तिला बरे वाटेल.

      २) एका मदतनिसाची आवश्यकता  

गरोदरपणात तणाव असतो आणि शरीरामधे असंख्य वेदना सोसाव्या लागतात. जमल्यास मसाज करून द्यावा, तेवढाच आराम मिळेल. या काळात शारिरीक कामाचा जास्त ताण पडणार नाही, याची काळजी  जोडीदाराने घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात थोडेफार हलकी शारिरीक काम करावीत, जड कामे पतीने स्वतःकडे घ्यावीत . जसे की घरातली साफ सफाई, स्वयंपाकातली मदत.

३) सतत एखाद्याच्या साथीची आवश्यकता वाटणे

सल्लामसलत करण्यासाठी, महत्त्वाचे निर्णय घ्यायला, डॉक्टरांकडे जाताना, बोलायला व गरोदरपणात वाटणाऱ्या चिंता  वाटून घ्यायला – ह्या सगळ्यासाठी, तिला तुमची साथ गरजेची आहे. तुमचे बाळ तिचे आयुष्य कायमचे बदलून टाकते. अगदी पहिल्या दिवसापासून  तिचे विश्व तिच्या बाळासोबत जुळलेले असते या विश्वात तुमची साथ तिच्यासाठी महत्वाची आहे

४) काळजीची अपेक्षा

कुठल्याही स्त्रीच्या गर्भधारणेत, आई व बाळाचे आरोग्य महत्त्वाचे असते. एका निरोगी शरीरासाठी, तिच्या कुटूंबाने व महत्त्वाचे म्हणजे तिच्या जोडीदाराने तिची खास काळजी घेतली पाहिजे. सगळ्या दृष्टीने तिच्याकडे लक्ष पुरविले गेलेे पाहिजे. तिच्या सगळ्या गरजांकडे लक्ष द्यायला हवे व पोषक आहाराचे सेवन केले गेले पाहिजे पतीने पत्नीला  माहिन्याातून एकदातरी डॉक्टरांकडे नेणे  गरजेचे आहे.

५) सदृढ आणि निरोगी बाळासाठी

बाळाची प्रकृती आईच्या प्रकृतीवर अवलंबून असते. गरोदरपणाच्या काळात आईला कुठल्याच अडचणीला तोंड द्यावे लागू नये, याची खबरदारी तिच्या जोडीदाराने घेतली पाहिजे. जमल्यास घरात गोंडस बाळाचे चित्र लावावे.पत्नीला आवडणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा  या गोष्टी निश्चितच आईचे आणि बाळाचे आरोग्य उत्तम राखतील.

६) तिच्यातील बदल हाताळण्यासाठी

एखाद्या जीवाला नऊ महिने गर्भात वाढवणे ही गोष्ट सोपी नाहीच.  या दिवसांमध्ये  शरीरातले व स्वभावातले बदल सहन करणे, खूप कठीण जाते. म्हणून या दिवसात  तुम्ही तिच्या बरोबर असणे गरजेचे आहे

७) कारण ते बाळ दोघांचे आहे

बाळ तिचे एकटीचे नसून, दोघांचे असते बाळाची  वाढ तिच्या उदरात होत असते ह्याचा अर्थ असा नाही की बाळाची संपूर्ण जबाबदारी तिची एकटीची आहे, तर तुम्हीही  बाळाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: