garodarpanatil-na-sangta-yenarya-8-samasya

गरोदरपणाच्या आनंदाबरोबर स्त्रीमध्ये अनेक शाररिक बदल घडून येतात.या बदलांमुळे काही न सांगता येण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.परंतू या समस्यांकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून न बघता नैसर्गिक शाररिक बदल म्हणून बघावे

गरोदरपणात  स्त्रियांना न सांगता येणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या समस्या कोणत्या, ते आपण पाहणार आहोत

१) खुप घाम येणे

गरोदरपणात घामाचे प्रमाण वाढते. त्यामुळे कितीही वेळा पुसला तरी वारंवार घाम येतो. हे सुरुवातीला त्रासदायक ठरू शकते, तसेच  घामाच्या डागांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते.

२) लघवीवरचा ताबा सुटणे

अनैच्छिकपणा एक मोठी अडचण असते ज्याला प्रत्येक गरोदर स्त्री सामोरे जाते. या काळात मूत्रविसर्जनावरचा ताबा सुटल्यामुळे लघवीची गळती होते. गरोदर असल्या कारणाने, खोकताना, शिंकताना, उचक्या लागल्यावर किंवा हसताना गळती होणे स्वाभाविक आहे. यासाठी महिलांनी पॅंटी-लायनर्स सारख्या पर्यायांचा वापर करावा. हे वापरल्याने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीं भोवती आणि कुटूंबासोबत किंवा सार्वजनिक ठिकाणी असतानाची अस्वस्थता कमी होईल

३) गॅसेसची समस्या

अनियमितपाणे येणारे ढेकर आणि गॅसेस ही  एक प्रमुख समस्या आहे.  या काळात प्रत्येक स्रीला  सामोरे जावे लागते. त्यामुळे याबाबत लाज बाळगण्यासारखे काही नाही, गरोदर असणे तुम्हाला याची मुभा देते.

४) अतिरिक्त केसांची वाढ होते.

गरोदरपणात केसांची वाढ उत्तेजित होते. त्यामुळे अतिरिक्त भागातील शरीराच्या केसांची वाढ देखील जास्त प्रमाणात होते यासाठी बाजारात उपलब्ध   वॅक्सिंग थ्रेडींग सारखे वेगवेगळे पर्याय डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावेत.

५) मुळव्याध

या काळात कधी कधी  शौच्यास होण्यास त्रास होतो. त्यामुळे शौचालयातून बाहेर येण्यास बराच वेळ लागणे.  हे फक्त लाजिरवाणे नाही, तर अतिशय वेदनादायक ही ठरू शकते. हे टाळण्यासाठी,योग्य प्रमाणात पाणी प्या आणि आहारात पातळ पदार्थाचा समावेश करा. ज्यामुळे तुमची पचनक्रिया उत्तम राहील व तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. जर तुम्हाला आधीपासून मुळव्याधीचा त्रास असेल तर आराम देणारी क्रीम्स डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरून पहा.

६) चेहऱ्यावर मुरुमांचे प्रमाण वाढणे

या काळात शरीरातील संप्रेरकाच्या बदलामुळे चेहऱ्यावर मुरुमांचे प्रमाण वाढते. शरीरात थंडावा आणण्यासाठी भरपूर पाणी प्यायचे लक्षात ठेवा, आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन साधारणसा फेस वॉश वापरा.

७) त्वचा काळवंडणे

गरोदरपणात त्वचा काळवंडण्याची शक्यता अधिक असते. ह्याचे कारण म्हणजे इस्ट्रोजेनचे वाढलेले प्रमाण. यामुळे स्तनांग्र आणि आसपासचा  भाग देखील काळवंडतो. पोटाखाली एक गडद रेष उठू शकते.मुलाचा जन्मनंतर या सर्व गोष्टी बहुतांशी पुर्ववत होतात.

८) दुग्धस्राव

कधी-कधी मुलाला जन्म द्यायच्या आधीच दुग्धस्त्राव सुरु होतो. त्यामुळे बाहेर गेले असताना कपड्यांवर  डाग पडू शकतात;त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे.आजकाल त्यासाठी बाजारात विविध प्रकारची कपडे उपलब्ध असतात त्याचा वापर करावा.

Leave a Reply

%d bloggers like this: