balachi-swachta-kartana-honarya-pach-chuka-kashya-talavya

बाळच्या जन्मानंतर वातावरणातील काही घटकांमुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते, त्यामुळे ते आजारी पडतात. यासाठी त्याला अंघोळ घालणे, त्याची स्वछता करणे गरजेचे असतेच,पण हि स्वछता आणि अंघोळ योग्यरीतीने करणे खूप महत्वाचे असते. कारण या गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्यास बाळाच्या आरोग्याच्या समस्या निर्माण  होऊ शकतात.

तुमचे बाळ तुमच्यासाठी खास असते, तेव्हा या पाच गोष्टीची सावधगिरी त्याच्या चांगल्या आरोग्याकरिता उपयोगी ठरतील.  

       १) पहिली अंघोळ 

साधरणतः बाळ जन्माला आल्यानंतर पहिली अंघोळ ही डॉक्टरच्या देखरेखीखाली नर्स घालतात, तर बाळाला  अंघोळ घालण्यासाठी डॉक्टरांच्या मागे घाई करू नका. 

२) वारंवार अंघोळ घालू नये 

बाळाची त्वचा ही नाजूक असते म्हणून बाळाला नेहमी एखाद्या जाड कापडात किंवा दुपट्यात गुंढाळलेले असते. त्यामुळे दररोज बाळाला रोज अंघोळ घालायला हवी; याची आवश्यकता नाही. आठवड्यातून १ किंवा २ वेळा अंघोळ केली तरी आपले बाळ स्वच्छ व आरोग्यदायी राहील.

३) बेबी प्रॉडक्टचा व्यवस्थित वापर

घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर पालक बाळाच्या बाबतीत खूप उत्साहित असतात,  आणि लगेच त्यांच्यासाठी दुकानात जाऊन अंघोळ करण्यासाठीची प्रॉडक्ट, मसाज साठी लागणारी उत्पादन खूप आनंदाने घेऊन येतात. पण त्या सगळ्या वस्तू अत्यावश्यक असतील तर घ्यावीत, कारण तुमच्या बाळाला काही प्रॉडक्टमुळे अलर्जी किंवा साईड इफेक्टही होऊ शकते. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बेबी प्रॉडक्ट वापरावीत.

४) अंघोळीचे पाणी कोमट असावे

बाळाची त्वचा खूप कोमल व संवेदनशील असते, अंघोळीचे पाणी खूप तापवलेले किंवा खूप थंडही नसावे. आणि ते अंघोळ करण्या अगोदर चेक करून घ्यावे. अनावधाने राहिल्यास बाळाला पुरळ उठू शकतात आणि थंड पाण्याने सर्दीही होऊ शकते तेव्हा पाणी कोमट असू द्यावे.

५) नाळेबाबत भिती बाळगू नका

अंघोळ घालताना किंवा पुसून काढताना  बाळाचे आई -वडील बाळाच्या  नाळे बाबत चिंतीत असतात, ती नाळ आपोआप गाळून पडते. म्हणून तीला स्वतः काही न करता  ती कोरडी झाल्यावर पडण्याची वाट पाहावी आणि त्याबाबत काही शंकास्पद वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच नाळेखालचा भाग जर सुजलेला वाटला तर त्वरित डॉक्टरांना भेटावे.    

  

Leave a Reply

%d bloggers like this: