pahilaya-varshatil-balachya-vadhiche-tppe

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिली काही वर्ष खूप महत्वाची असतात, त्यातील पहिल्या वर्षात साधारणतः खाली सांगितलेल्या, टप्प्याप्रमाणे बाळाचा विकास होतो. हे टप्पे प्रत्येक बाळाच्या बाबत सारखेच असतील असे नाही. प्रत्येक बाळाची प्रगती एकाच गतीने होते असे नाही.  ते पुढे मागे होण्याची देखील शक्यता असते.

बाळाच्या वाढीचे १२ टप्पे कोणते ते आपण पुढे पाहणार आहोत

पहिला टप्पा (पहिला महिना)

जन्मानंतरच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यापर्यंत बाळ हळू-हळू मान सावरायला लागते,आईच्या सततच्या सहवासाने बाळ आईला ओळखायला लागते.तसेच स्तनपानामुळे जन्मानंतरच्या वजनापेक्षा अर्धा एक किलोने वजन वाढते. बाळाच्या  चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव येतात.

 

२ रा टप्पा (दुसरा महिना)

पहिल्या महिन्यात मान सावरायला लागल्यानंतर आणि आईला ओळखायला लागल्यावर,आता  बाळाची नजर हळू हळू स्थिर व्हायला लागते. या महिन्यात बाळ अधून मधून हसू लागते.  

३ रा टप्पा (तिसरा टप्पा)

दुसऱ्या महिन्यात नजर स्थिर झाल्यावर बाळाच्या हालचालींमध्ये वाढ होते. बाळ वेगवेगळ्या गोष्टींचे निरीक्षण करायला लागते.आवाजाच्या दिशेने प्रतिसाद द्यायला लागते. आवाजाच्या दिशेने बघण्याचा प्रयत्न करते

४ था टप्पा (चौथा महिना)

या टप्प्यात बाळ वस्तूंची ओढाओढ करणे, वस्तू पकडून ठेवणे, मांडीवर टेकून बसवल्यास बसणें वेगवेगळे आवाज काढून प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू लागते.

५ वा  टप्पा (पाचवा महिना)

या महिन्यात बाळ तुमच्या बोलण्याला किंवा विनाकारण जोरात ओरडून प्रतिसाद द्यायला लागते.  या महिन्यात बाळाचे वजन पहिल्या महिन्यांपेक्षा बऱ्यापैकी वाढते.

६ वा  टप्पा ( सहावा महिना)

या महिन्या पर्यंत बाळाला आधार देऊन बसवल्यास  ते खुर्चीत बसू लागते. तसेच या महिन्यापर्यंत साधारणतः बाळाच्य.झोपण्याच्या, भूक लागण्याच्या वेळांचा अंदाज येऊ लागतो. त्यामुळे आईला बाळाचे वेळापत्रक बनवण्यास सोप्पे जाते.

७ वा टप्पा ( ७ वा महिना)

या महिन्यापर्यंत बाळ रांगायला लागते, खाण्याचा पदार्थ हातात दिल्यास तो हातात पकडणे, तो पदार्थ तोंडात घालणे  एखाद्या विशिष्ट आवाजाचा वेध घेणे, जर सतत एखाद्या नावाने हाक मारल्यास त्या व्यक्तीकडे बघणे ओळखीच्या चेहऱ्याकडे बघणे असा बाळाचा दिनक्रम चालू होतो

८ वा टप्पा (८ वा महिना )

७ व्या  महिन्यात चेहरे बघणे एखाद्या नावाने सतत हाक मारल्यास त्या व्यक्तीकडे बघणे असा दिनक्रम सुरु झाल्यावर, तुमच्या लक्षात येण्याच्या आधीच तुमचं बाळ स्वतः रांगायला लागण्या इतपत सक्षम होते, बाळ रांगायला लागल्यावर साहजिकच भीती वाटते, पण ते नक्कीच आनंददायक असते

९ वा टप्पा ( ९ वा महिना)

आठव्या महिन्यानंतर बाळा रांगायला लागल्यावर जवळ जवळ ९ महिन्यांनंतर तुमच्या लक्षात येईल, तुमच्या बाळाला जे काही सापडेल ते उचलून तोंडात घालते.तसेच आधाराने उभा राहण्याचा प्रयत्न  करायला लागते

१० वा टप्पा ( १० वा महिना )

या महिन्यात बाळ साधारणत उभे राहते. स्वतःच्या पायावर उभे राहणे हा बाळाचा पहिल्या वर्षातील सर्वात मोठा विकास असतो. तसेच टाळ्या वाजवणे टाटा  करणे अश्या गोष्टी करायला लागते

११ वा टप्पा ( ११ वा महिना)

या महिन्यात तुमचं बाळ तुमच्या हाताला धरून पाहिलं पाऊल टाकतं, हा सर्वात महत्वाचा विकास असतो. तुमच्या बाळाला पहिलं पाउल टाकताना बघणे उत्कंठावर्धक असते. या महिन्यात बाळ वस्तू हातात नीट पकडू लागते. आपण त्याचाशी खेळत असू तर खेळण्यात रस घेते किंवा आस पास लहान मुलं खेळत असतील तर  टाळ्या वाजवणे  आनंदीत होणे अश्या प्रकारचा प्रतिसाद द्यायला लागते

१२ वा टप्पा ( १२ वा महिना)

या महिन्यात बाळ चालायला लागते चालण्यासाठी लागणार समन्वय साधण्याचा प्रयत्न करू लागते काही जण चालताना पडतात आणि पुन्हा उठून चालायला लागतात, काही जण वेळ घेतात आणि  आधार घेऊन पुढे चालायला लागतात.या महिन्यात बाळाचे वजन साधारणतः जन्माच्या वेळच्या वजन  पेक्षा दुपट्टीपेक्षा जास्त वाढलेले असते

आपल्या बाळाची होणारी वाढ हि वरील प्रत्येक टप्प्याप्रमाणे घडले नाहीतर घाबरून जाण्यासारखे काही नसते कारण प्रत्येक बाळाची वाढ होण्याची गती सारखीच नसते परंतू यात मोठ्या प्रमाणात फरक आढळ्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा

Leave a Reply

%d bloggers like this: