naisargik-prasutishi-sambadhit

एका स्त्रीच्या आयुष्यात बाळंतपण हा शारीरिकदृष्ट्या सगळ्यात आव्हानात्मक काळ असतो. नैसर्गिकरीत्या झालेली प्रसूती आणि सी-सेक्शन म्हणजे शस्त्रक्रियेने झालेली प्रसूती, ह्यात बराच फरक असतो. बाळाचा जन्म म्हणजे कठीण शारीरिक वेदना आणि त्रासातून तुम्हाला जावे लागते. त्यातही तुमची प्रसूती नैसर्गिक झाली असेल तर हे तुम्हाला चांगलेच ठाऊक असेल.खाली दिलेल्या काही गोष्टी ज्या शस्त्रक्रियेविना प्रसूती झालेल्या मातांसाठी मांडल्या आहेत.

१. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त 

गर्भातला जीव नाळेने तुमच्याशी जोडलेला असतो. जन्म झाल्यावर ती नाळही तिथून काढली जाणे आवश्यक असते. म्हणून कदाचित डॉक्टरांनी तुम्हाला बाळ बाहेर आल्यावरही पुन्हा एकदा जोर लावण्यास सांगितले असेल. हे वेगळे वाटू शकते, आणि हे तुम्ही अपेक्षित केलेल्या त्रास पेक्षा जास्त त्रासदायक असतं पण बाळ बाहेर आल्यावर त्याच्यासोबत ही नाळ बाहेर येणे व योग्यरीत्या काढणे गरजेचे असते.

२. गर्भाशयाची काळजी

प्रसूतीनंतर होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी गर्भाशयाचे आकुंचन होणे गरजेचे असते. हे आकुंचन सोप्या पद्धातीने व्हावे यासाठी नर्स तुम्हाला ओटी पोटाशी ठराविक वेळाने मसाज देतात. पहिल्यांदा मसाज देणार हे ऐकून तुम्ही आनंदित झाला असाल पण सूज असल्यामुळे हा मसाज त्रासदायक होऊ शकतो.  तेंव्हा काळजी घ्या, हे सर्व गर्भाशयाच्या योग्य काळजीसाठी गरजेचे आहे.

३. टाके

प्रसुतीदरम्यान योनी फाटण्याचे प्रमाण तुम्हाला वाटते तितके कमी नसते. बाळाला पोटातून बाहेर ढकलतांना तुमची योनी काही प्रमाणात फाटू शकते (जणू काही हे यापेक्षा वेदनादायक काही होऊच शकत नाही). या जागी टाके घातले जातात आणि काही काळासाठी त्या जागेवर सूज येते. अशावेळी लघवी करणे म्हणजे तुमच्यासाठी आव्हानच आहे!

४. अनिश्चित प्रसव
एकदा गर्भाशयातून नाळ काढल्यानंतर सारे काम झाले असे तुम्हाला वाटत असेल तर थांबा, अजूनही तुमच्या योनीमधून काही गोष्टी बाहेर येणे पूर्ण बंद होणार नाही. अनेक गोष्टीं तुमच्या ओटी  पोटात अशावेळी चालू असतात. कधी कधी अचानक काहीतरी योनीतून बाहेर येत असल्याचे तुम्हाला जाणवेल. काळजी करू नका, तुमचं शरीर ९ महिने साठवलेल्या काही टाकाऊ गोष्टी शरीरातून बाहेर काढत आहे.

५. योनीची काळजी

प्रसुतीवेळी तुम्ही त्रासातून गेल्या आहात आणि त्यानंतर घातलेले टाके यामुळे आता साहजिकच योनीची योग्य निगा राखणे आवश्यक ठरते. योनीची किती काळजी घेणे गरजेचे आहे हे आता कदाचित तुम्हाला नव्याने कळेल. सोबतच स्वच्छता ठेवण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक वेगळ्या पद्धती देखील तुम्हाला कळतील.

६. प्रसुतीवेळी मलविसर्जन


बाळाला जन्म देताना मलविसर्जन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण बाळ तुमच्या शरीरातून बाहेर येत असते ते काही छोटेसे नसते. म्हणजेच तुम्ही बाळाला जन्म देताना सारखाच जोर लावत असता, हा जोर तुमच्या संपूर्ण पार्श्वभागावर पडून जन्म देतेवेळी मलविसर्जन होऊ शकते.

७. प्रसुतीनंतरचे  मलविसर्जन 


प्रसुतीनंतर मलविसर्जन अवघड असते. तुम्हाला जाणवत राहते की जरा इकडे तिकडे हालचाल झाली तर संपूर्ण पार्श्वभागावर कठीण परीस्थिती येऊ शकते. विसर्जन करताना दुखते आणि हे नाजूक काम होऊन जाते कारण प्रसुतीवेळी तो भाग दाबाखालून गेला असल्याने तिथली कोणतीही जाणीव संवेदनशील असते. मलविसर्जन करताना वेळ लागू शकतो, पण काळजी करण्याचे कारण नाही हे हळूहळू पूर्वपदावर येईल.

८. नवऱ्याला काही दिवस सुट्टी !
बाळाच्या जन्मानंतर काही काळ तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून दूर राहावे लागते . पण नवऱ्यावर कितीही प्रेम असले तरी त्याच्यामुळेच ह्या सगळया शारीरिक त्रासातून तुम्हाला जावे लागले हे मात्र विसरता येत नाही !

९. एक नवीन मी !


तुमची योनी आता आधीपेक्षा वेगळी असणार आहे. परत सांगायच तर ’तुम्ही एका संपूर्ण मानवी जीवाला’ तिथून जन्म दिला आहे. अजून पुढच्या काही महिन्यांसाठी तुम्ही चकित होत राहणार आहात कारण अशा काही गोष्टी तुम्हाला जाणवणार  आहेत ज्या यापूर्वी तुमच्या लक्षात आल्या नव्हत्या.

१०. काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या


काही दिवस तुम्हाला डायपर्स आणि टाकाऊ पॅड, शिट्स वापरावे लागतील. रक्तस्त्राव जास्त असणार आहे. तेंव्हा स्वतःची योग्य काळजी घ्या. यात महत्वाचं म्हणजे ज्या स्त्रियांना रक्त पाहून त्रास होत असेल, त्यांची भीती आतापर्यंत नाहीशी झाली सुद्द्धा असेल.      

शेवटी काय तर, तुम्ही महिन्या –दोन महिन्यात ह्या सगळ्यातून मुक्त व्हाल. आणि तुमचं छोटंसं गोंडस बाळ त्याच्या आईला छळण्यासाठी सज्ज असणार आहे! बाळावरच्या प्रेमाने तुम्हाला ह्या सगळ्या त्रासाचा विसर पडेल आणि मातृत्वाच्या या प्रवासाला तुमची आनंदाने सुरवात होईल!              

Leave a Reply

%d bloggers like this: