ya-8-margani-balacha-v-tumcha-pravas-anandi-kara

प्रवासात बाळ सोबत असल्यावर अनेक अडचणी येऊ शकतात. बाळ लहान असल्याने त्यांचा मूड बदलला तर ती रडतात, त्यांना शांत करणे म्हणजे पालकांवर मोठेच संकट येते. आणि बाळ व पालक दोघांनाच याचा त्रास होतो. पण बऱ्याचदा हा त्रास स्वतःच ओढवून घेतलेला असतो. हा त्रास होऊ नये आणि प्रवास कसा सुखकारक व्हावा यासाठी काही उपाय सांगणार आहोत 

१) प्रवासाचे नियोजन करा

बऱ्याचदा अचानक आपण प्रवासाचे बेत अचानक आखतो  लागते, पण अशावेळी बाळाची झोप झाली नसेल तर साऱ्या प्रवासात बाळ चीड- चीड व रडत असते. तेव्हा अचानक कुठे परगावी जाण्याचे नियोजन करू नका. आधीच प्रवासाचे नियोजन करा

२) दूरचा प्रवास टाळा

शक्य झाल्यास दूरचा प्रवास बाळा बरोबर करू नका, कारण खूप तास एकाच ठिकाणी बसून  बाळ कंटाळून जाते. मग ते रडायला लागते मग तुम्हाला त्याचा त्रास होतो. त्यासाठी लहान अंतराचा प्रवास करा. आणि ज्या मार्गाने लवकरात लवकर निश्चित स्थळी पोहचता येईल अश्या मार्गाने प्रवास करा

३) ऋतूनुसार बाळाला कपडे घाला

फॅशन म्हणून मोठं मोठाले एम्ब्रॉयडरी असणारे टोचणारे कपडे बाळांना घालू नका त्यापेक्षा त्यांना वातावरणानुसार सुटसुटीत कपडे घाला फॅशन पेक्षा बाळाला काय आरामदायक वाटतं यावर भर द्या . तसेच प्रवासात बाळाने शी किंवा शु केली तर अडचण होणार नाही अशाप्रकारे  कपडे त्याला घालावेत. आणि काही ज्यादा कपड्याचे जोड तसेच ऋतूनुसार स्वेटर,गरम कपडे, रेनकोट असे सगळे बरोबर असू द्या

) तुमचे बाळ काही  खेळणे नाही

बरीच प्रवासी मंडळी लहान बाळाला बघितल्यावर त्याचे गाल ओढ, त्याचे मुके घे असे प्रकार करतात  त्यामुळे बाळ चिड-चीड करते . शक्य झाल्यास यासंबंधी सहप्रवाशांना नम्रपणे  सांगावे, कारण त्यांनाही लहान बाळ हवेहवेसे वाटते.पण बाळाचे हाल  होतात 

५) बाळाबरोबर खेळा

बाळाला तुम्ही जवळ पाहिजे असे वाटत राहते, मग ते छान खेळतात, रमतात, म्हणून त्याच्याबरोबर खेळत राहावे. प्रवासात त्याला बाहेरचा परिसर दाखवावा. या गोष्टीने बाळ कंटाळणार नाही.

) प्रवासातही स्तनपान

स्तनपान बाळासाठी खूप महत्वाचे आहे म्हणून प्रवासात असलात तरीही स्तनपानासाठी वेळ द्यावा. त्याच्यासाठी लागणारे अन्न तुम्ही घेणारच पण बाळाच्या सवयीनुसार स्तनपानाच्या वेळा  चुकवू नका.

७) काही खेळणी बरोबर असू द्या

प्रवासात मुलांना खेळता येत नाही, इकडे तिकडे पाळता येत नाही एका ठिकाणी बांधल्यासारखं होतं.  त्यामुळे ती चिडचिड करतात. म्हणून त्यांचं मन रमावं यासाठी त्यांची आवडीची काही खेळणी बरोबर ठेवा. ज्यामुळे ते खेळण्यांमध्ये गुंतून राहतील

८) प्रवासात बाळाचे आरोग्य सांभाळा

प्रवास करताना बाळाला लागणारी औषध, क्रीम, लोशन घेऊन ठेवा. बरोबर डॉक्टरांचा नंबर असू द्या. पावसाळा असेल तर थोडी अतिरिक्त काळजी असू द्या.

Leave a Reply

%d bloggers like this: