julya-balababat-kahi-gamtishir-goshti

 

जुळी बाळ घरात आल्यावर आनंदाला सीमा राहत नाही. दोघांची एक  नवीन  सुरुवात होते, जुळे असल्याने त्यांचे भावविश्व् एकच असते. दोघे एकत्र शिकतात, खेळतात. त्यांच्या आवडी-निवडीही सारख्याच असतात. मोठे झाल्यावर एकमेकांना साथही  देतात. अशा जुळ्या बाळाच्या काही मजेशीर गोष्टी सांगणार आहोत, या गोष्टींना शास्त्रीय असा काही आधार नसला तरी या बऱ्याच जुळ्यांना लागू पडतात.

 १) टेलीपथी 

 इंद्रियांच्या साहाय्यावाचून ( न बोलता, न सांगता)एकाच्या मनातील विचार त्याचवेळी दूरवर असलेल्या दुसऱ्या  व्यक्तीच्याही मनात उमटणे याला टेलिपथी असा म्हणतात. जुळ्या भावंडांच्या बाबतीत टेलिपॅथीचं प्रमाण हे इतरांपेक्षा जास्त असते. आहे ना गंम्मत , बहुतेक वेळेला  या  जुळ्या भावंडाना काही नकारात्मक घटना घडणार असतील तर त्या बाबतची जाणीव एकाच वेळी होणे.

२)  स्वतःची वेगळी भाषा असते

जुळ्या मुलांच्या भावना एकच असल्याने त्यांची स्वतःची अशी भाषा विकसित झालेली असते. लहानपणी जुळी बाळ  बोलणे शिकण्याच्या अगोदरच एकमेकांशी संवाद साधायला लागतात. त्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल.

३) गर्भातील  संवाद

 गर्भाशयातच त्यांचा परस्पर संवाद सुरु होतो. तिथपासून त्यांची गाढ मैत्री सुरु होते. गर्भातच ते एकमेकांचा हाथही पकडतात.

४) पक्के मित्र

बहुतेक जुळ्या भावंडामध्ये खूपच गाढ मैत्री. शाळेत त्यांना कितीही मित्र मिळाले तरी शेवटी दोघांना एकमेकांशिवाय करमत नाही.मोठी झाल्यावरही प्रत्येक अनुभव ते शेयर करतात.

५) जुळ्या बाळांमध्ये फरक कसा ओळखणार

काही जुळ्या बाळांमध्ये जुळे असले तरी बराच फरक असतो तर काही जुळ्या बाळांमध्ये काहीच फरक नसतो काहींना वेगवेगळ्या जन्मखूणा असतात त्यामुळे वेगळेपण ओळखता येते. कधी कधी त्यांची आई देखील गोंधळते अश्या वेळी काही पालक बाळाच्या नखांवर खूण करतात तर काही वेगवेगळ्या रंगाचे धागे हातात बांधतात पण अगदी तान्ह्या नाही पण जरा मोठे झालेलं बाळ त्याचा नाभीच्या आकारावरून देखील ओळखता येतं.

Leave a Reply

%d bloggers like this: