prasutisathi-hospital-nivdtana-ya-pach-goshti-lakshat-ghyavyat

तुमच्या लहान बाळाला नव्या जगात आणायचे असते. त्याचा पहिला श्वास तुम्हाला पाहायचा असतो, त्याचे प्रत्येक पहिले क्षण हृदयात साठवायचे असतात, तेही कायमचे. इतक्या महत्वाच्या क्षणासाठी तुम्ही तयार असतात. त्यावेळी  प्रसूतीसाठी  इस्पितळ निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात या सांगणार आहोत

 ) स्टेम सेल बँक

त्या स्टेम सेल ( मूल पेशी) असतील तर त्या खूप महत्वाच्या असतात. तेव्हा ते पाहून घ्या. नाळे मध्ये असणाऱ्या या पेशींचे जतन या स्टेम सेल बँकेमध्ये करतात . या स्टेमसेलद्वारे भविष्यात ७५ आजारांवर इलाज करता येतो. म्हणून काही पालक नाळेचे रक्त साठवण्याची काळजी घेतात. ही  गोष्ट बऱ्याच दवाखान्यात नसते, वाटल्यास तुम्ही नेटवर शोधू शकतात.

२) नर्स आणि डॉक्टर

प्रसूतीसाठी इस्पितळ ठरवण्याआधी तिथल्या डॉक्टर व नर्स यांना भेटूनच  मगच  तिथे नाव नोंदवावे कि नाही हे ठरवा.

३) इस्पितळासंबंधी मते

इस्पितळासंबंधी इतर  लोकांचा अनुभव काय आहे याची चौकशी करा. तुमच्या ओळखीच्या किंवा नात्यात त्या दवाखान्यात गेले असतील त्यांना विचारून पहा. आता ऑनलाइन विविध  वेबसाइट वर बरेच जण डॉक्टर इस्पितळासंबंधी वेब साईटवर फीडबॅक देत असतात, तिथे जाऊन पाहू शकतात.

४) इस्पितळ आणि घरांमधील अंतर 

गरोदरपणात कधीही दुखू शकते. दवाखाना जवळ असेल तर लगेच तुम्हाला जाता येईल व काळजी घेता येईल. शक्यतो राह्यत्या घराजवळच निवडा.

५) आभासीपणे त्या दवाखान्यात स्वतःला पहा

आजकाल काही मोठ्या इस्पितळांमध्ये अश्या  सुविधा उपलब्ध झाल्या आहेत ज्यामध्ये दवाखान्यात आभासीपणे त्या दवाखान्यात तुम्ही बाळा बरोबर बसला आहात असे दिसते. या वेबसाईटचा वापर करून तुम्ही प्रसूतीसाठी इस्पितळ निवडू शकता.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: