prtyek-mulila-aplya-sathidarakadun-havyahavyasha-vatnarya-kahi-romantic-goshti

 

बाहेर असताना तिचा हात हातात घेणे.

सार्वजनिक ठिकाणी बाहेर असताना पत्नीचा हात हातात घेणे, तिच्या जवळ राहणे ह्यातून तिला सुरक्षित असल्याची जाणीव राहील. एवढेच नव्हे तर ह्यातून आपल्या साथीदाराला सोबत बाहेर जाण्यात संकोच वाटत नाही तर सगळ्यांसमोर आपल्यासोबत मिरवायला आवडते असे वाटेल, जे की अतिशय गोंडस आहे.

तिला ‘आई लव यु’ म्हणणे.

हो, अगदीच! तिला रोज आपल्या प्रेमाची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ह्यातून तिचा एखादा वाईट दिवस चांगल्यात बदलू शकतो आणि चांगला दिवस छान दिवस होऊ शकतो! भांडण मिटवण्याचा हा सगळ्यात छान मार्ग आहे !

अनपेक्षित चुंबने आणि जवळ घेणं .

चुंबन हे प्रेमाचा अविर्भाव व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम आहे. गुड मोर्निंग आणि गुड नाईट म्हणतांनाची चुंबने अगदीच . मित्र-परिवार समवेत असताना जवळ घेणं तसेच गालावर किंवा कपाळावरचा चुंबन घेणं तिला आवडतं .

तिला घरकामात मदत करणे.

तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी घर सांभाळणे हे एकट्या व्यक्तीचे काम नाही. हे समजून घरकामात जर नवरा हातभार लावत असेल तर ते छानच आहे. अशाने त्याला तिची किती काळजी आहे आणि तिच्यावर जास्त काम पडू नये म्हणून तो किती प्रयत्न करतोय हे देखील तिला जाणवेल. मग काम कोणतेही असो, बाजारातून समान आणणे, सकाळी उठल्यावर आवराआवर करणे अश्या गोष्टींतून केलेली मदत तिला नक्कीच भावेल!

तिच्या मतांचा आदर करणे.

नवरा जेंव्हा काही महत्वाच्या निर्णयांसाठी, मग ते लहान असोत किंवा मोठे, त्यामध्ये केवळ तिचे मत विचारतच नाही तर तिच्या मतांचा आदर सुद्ध करतो तेंव्हा तिला खूप समाधानी वाटते. ह्यातून त्याच्या आयुष्यात तिची असलेली सामायिकता आणि त्यांच्यामधल्या अजोड नात्याची  भावनातिला स्पर्श करेल. तिच्याविषयीचा मनातला आदर त्याने अशाप्रकारे व्यक्त करणे किती सुंदर आहे नाही का?

तिचे म्हणणं ऐकून घेणे.

तिच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्याने ती नुसती बडबडी आहे असं तिला वाटणार नाही. तिच्या ऑफिसमधल्या तक्रारी असो किंवा मैत्रिणीमधली गम्मत असो, अशा गोष्टी ऐकून घेणे आणि नंतर विषय निघाला तर त्या लक्षात ठेवून बोलणे गरजेचे आहे. ह्यातून तिला तिचं असलेलं महत्व जाणवेल, नाही का ?

तिला आवडणाऱ्या भेटवस्तू तिला देणे.

 

 

तिला महागड्या गोष्टीच द्यायला हव्यात असे नाही ,तिचे आवडते आइस्क्रीम,चॉकलेट तिला दिलं तरी तिला ते आवडेल. तिला एखादं ग्रीटिंग फुलं किंवा पत्रं दिलं तर अप्रतिमच 

तिच्यासाठी सुट्टी घेणे.

एखादा दिवस तिच्यासोबत घालवण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी घेणे ह्यापेक्षा उत्तमरित्या तुमचे प्रेम कसे व्यक्त होणार ? तिचा सहवास तुम्हाला नेहमी हवाहवासा वाटतो आणि तिच्यावरचं तुमचं प्रेम ह्याची जाणीव तिला राहील.

आजारपणात तिची काळजी घेणे.

पतीने काळजी घेतल्याने तुम्ही अर्थातच लवकर बरे होऊ शकता! ती लवकरात लवकर बरी व्हावी, निरोगी रहावी म्हणून नवऱ्याने मनापासून काळजी घेणे याने तिला छानच वाटते. हे नाते अशाने अजूनच गोंडस बनते!

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: