prasuti-nantar-ya-pach-goshti-lakshat-theva

 

प्रसुतीनंतरचा काही दिवसांचा काळ हा आई आणि बाळ या दोघांसाठी अवघड आणि नाजूक असतो, आईने योग्यप्रकारे काळजी न घेतल्यास आईला विविध प्रकारच्या इन्फेक्शनला सामोरे जावे लागते आणि त्यामुळे बाळ देखील आजारी पडण्याची शक्यता असते.

त्यामुळे प्रसुतीनंतर आईने पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या 

1. टेम्पोंन चा वापर करू नका 
टेम्पोंनच्या वापराने प्रसूतीनंतर झालेल्या जखमांना धक्का पोहचण्याची शक्यता असते. तसेच ते वापरताना योग्य ती काळजी न घेतल्यास इन्फेक्शन  होण्याची शक्यता असते.

2. सॅनिटरी नॅपकिन वेळोवेळी बदला 
प्रसुतीनंतर कमीत कमी ४ तासाने सॅनिटरी नॅपकिन बदलावे, आणि शरीराची योग्य ती स्वछता राखावी. या बाबत कंटाळा करू नये.

3. थोडे दिवस शरीसंबंध टाळावे 
प्रसूतीनंतर जो पर्यंत रक्तस्त्राव होत असतो म्हणजे (luchia) थांबे पर्यंतसंबंध टाळावे, प्रसुतीच्यावेळी झालेल्या जखमा भरून यायची वाट पहा तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोष्टीचा विचार  करा. 

4. बसण्याची पद्धत 
बसण्याची पद्धत नेहमी योग्य असावी पण या काळात डॉक्टरांच्या सल्ल्याने बसण्याचा प्रयत्न करावा जेण करून तुमच्या योनी आणि गुदद्वारच्या मधल्या भागावर दाब पडणार नाही. आणि कमरेला देखील आराम पडेल.   

5. बसताना उशी किंवा पॅडेड रिंगचा वापर
प्रसूतीनंतर बसताना उशी आणि पॅडेड रिंगचा वापर करावा ज्यामुळे  योनी आणि गुदद्वारमधला भाग कापड्यानं घासून तिकडे जखम होणार नाही आणि सूज येणार नाही. 

या काळात स्वतःची काळजी घ्या,आराम करा शरीराला पुर्ववत होण्यासाठी वेळ द्या.

Leave a Reply

%d bloggers like this: