balache-dasapasun-rakshan-karnyasathiche-upay

लहान बाळांचे डासांपासून  रक्षण करणे खूप महत्वाचे असते. कारण डासांमुळे मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया असे विविध आजार पसरतात. आणि लहान बाळांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना ह्या आजारांची लगेच लागण होते. काही बाळांना डासांच्या प्रादुर्भावाने  खूप ताप येतो, थंडीही वाजून येते,  बाळांना पुरळ उठतात. बाळाच्या उत्तम  आरोग्यासाठी   डासांपासून बचाव करणे आवश्यक आहे. तेव्हा पालकांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये.  कारण  डासांपासून होणाऱ्या आजारामुळे बालकाच्या जीव धोक्यात येऊ शकतो.

या उपायांनी तुम्ही आपल्या गोंडस बाळाचे डासांपासून बचाव करू शकता

१) बाळांना पूर्ण कपडे घाला

बाळाच्या अंगावरील कपड्यांनी त्याचे शरीर जितके झाकले जाईल तेवढे डासांपासून त्याचे संरक्षण होईल. पूर्ण कपडे अंगावर घातल्याने काही कीटकांचाही त्रास बाळाला होत नाही. आणि  हवामान कसे आहे त्यानुसार कपडे घाला जेणेकरून बाळाला आरामदायक वाटेल.

२) क्रीम आणि औषधें

डासांपासून संरक्षण करण्यासाठी सर्वात छान उपाय जर असेल तर बाजारात उपलब्ध असलेली क्रीम, औषध, स्प्रे, यांचा वापर करा. परंतु पूर्णतः अवलंबुन राहू नका आणि त्याचा वापर करताना त्या गोष्टीचा बाळावर विपरीत परिणाम तर होत नाही ना? याकडे लक्ष ठेवा.आणि

३) डासांची उत्पत्ती होऊ देऊ नका   

डासांची उत्पत्ती ही अस्वच्छ पाण्यात होत असते. त्यामुळे घराच्या आजूबाजूला घाण पाणी, करवंट्या, शहाळी, जुने टायर, कचरा असे काहीच राहू देऊ नका. यामुळे डासांची पैदास वाढते. आठवढ्यातून एकदा सर्व टाक्या खाली कराव्यात. जमल्यास जर बाजूला खुला ड्रेनेज असेल तर त्यात थोडेसे  केरोसीन टाकावे. आताच्या संशोधनानुसार स्वच्छ पाण्यात डेंगीच्या डासांची पैदास होते तेव्हा त्याचीही काळजी घ्यावी. घराच्या खिडकीला जाळ्या लावाव्यात.

४) मच्छरदाणी आणि जाळीचा  वापर

बाळाच्या अंथरुणावर मच्छरदाणी ;व जेणे करून डास बाळा पर्यंत पोहचणार नाही.  तसेच खिडक्यांना  काढता येतील अश्या प्रकारच्या जाळ्या लावा ज्यामुळे खिडकी बंद करावी लागणार नाही आणि हवा खेळती राहील आणि दास देखील घरात येणार नाही. हा एक केमिकल विरहित उपाय असल्याने त्यामुळे बाळाला कोणत्याही प्रकारचं अपाय होण्याची शक्यता नसते.

५)  उग्र सुगंधीत द्रव्याचा वापर टाळा

बाळसाठी कोणते  उग्र कृत्रिम सुगंधित द्रव्याचा वापर करू नका.  बाळाच्या कपड्यांना किंवा अंथरुणाला कोणत्या प्रकारचे सुगंधीत द्रव्य लावले असता डास  या वासकडे  डास आकर्षित होण्याची शक्यता असते त्यामुळे बाळासाठी कोणते सुगंधित द्रव्य किंवा तेल वापरले असता त्याचा सुगंध मंद असावा.

६) डासांच्या वेळेवर करडी नजर ठेवा

साधारणतः डास  संध्याकाळचा वेळी डासांचा त्रास जास्त जाणवू लागतो तर कधी कधी पहाटेच्या वेळी देखील डासांचा तर जाणवू लागतो  या डासांच्या वेळेवर नजर ठेवून मच्छरदाणी लावणे दरवाजे बंद करणे अश्या गोष्टी कटाक्षाने करा त्यामुळे डासांपासून बाळाचे संरक्षण होईल

Leave a Reply

%d bloggers like this: