balachya-vegveglya-krutimagacha-uddesh

 आपण नेहमी विचार करत असतो इवल्याश्या जीवाच्या मनात काय चालू असेल आपण ज्यावेळी त्याला कडेवर घेतो त्यावेळी त्याला काय वाटत असेल, आपण त्याच्याशी बोलतो त्यावेळी त्याला काय वाटत असेन. कुशीत घेतो त्यावेळी त्याला आपलं प्रेम कळत असेल का?त्याला आपल्याशी काही बोलायचं असता का? आज आपण तुमच्या  या प्रश्नाची उत्तर शोधणार आहोत.  तुमचं लहान बाळाच्या वेगवेगळे प्रकारच्या वागण्याचे प्रकार आणि त्याचा मागचा साधारणात उद्देश काय असतो  ते बघू.  

    १) डोळ्यांत बघणं 

जन्मानंतरच्या काही आठवड्यात बाळ तुमच्या डोळ्यांकडे बराच वेळ  बघत असतं. त्यावेळी त्याला तुमच्या बरोबर असताना किती सुरक्षित आणि आरामदायक वाटत असतं  हे सांगण्याचा प्रयत्न करतं. तुमच्या चेहऱ्याकडे बघून बराच वेळ तुमचे हाव-भाव निरखत असतं. ते तुमच्याबरोबर ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतं

२) हसणं

६ ते ८ आठवड्याच्या दरम्यान लहान मुलं हसायला लागतात. त्याचं ते  हसू तुम्हाला जगातला सगळ्यात मोठा आनंद देत असतं. कोणत्या तरी कारणाने ते हसायला लागतं. तुमचा आवाज ऐकला की, किंवा तुम्हाला बघितलं कि ते हसायला लागतं. ते तुम्हाला हे सुचवत असतं इतरांपेक्षा ते तुमच्याबरोबर जास्त खुश असतं आणि  त्यावेळी तुम्ही पण त्याच्याकडे बघून हसला की  ते अजून खुश होत

३)ओळख दाखवणं

काही मनोवैज्ञानिकच्या शोधाअंती असं दिसून आलं आहे की जन्मानंतर  काही आठवड्यात  लहान मुलांची रक्षणकर्ती त्याची आई आणि त्याचा वर प्रेम करणारे आणि जास्त सहवासात असणाऱ्या बाबांना ते ओळखु लागतं. आणि ज्यावेळी त्याला इतर कुणी जवळ घेतं ते तुमच्याकडे किंवा तुमच्या आवाजाच्या रोखाने बघण्याचा प्रयत्न करतं.

४) वेगवेगळं आवाज काढणं

लहान मुल वेगवेगळे आवाज काढत असतं आणि ज्याच्या विषयी त्याला प्रेम वाटत असतं  किंवा जी व्यक्ती ओळखीची वाटत असते. अश्या व्यक्ती कडे बघून ते जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात आणि उत्साहाने हात-पाय हलवतात, कडेवर घेतल्यास उसळी मारतात अश्यावेळी ते तुम्हाला ओळख दाखवण्याचा प्रयत्न करतं. आणि तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते असं करत असत

५) सतत तुमच्याकडे झेप घेणं .

काही महिन्यांच तुमचं बाळ तुम्ही दुसऱ्या कोणाकडे दिलं आणि तुम्ही त्याचा आसपास असाल तर बाळ तुमच्या कडे झेप घेऊन तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतं. यातून तुम्ही त्याला हव्या असता त्याला तुमच्याकडे  खूप सुरक्षित वाटतं असं त्याला सांगायचं असतं.

Leave a Reply

%d bloggers like this: