stanpan-ya-daha-ghataknchya-samaveshane-mateche-dudh-vadhnyas-madat-hoil

 

बाळाच्या जन्मांनंतर बाळाच्या वाढीसाठी पहिले सहा महिने बाळाला स्तनपान करणे गरजेचे असते .आईच्या दुधात पोषक तत्वे असतात. त्यसाठी मातांना योग्याप्रमाणात दूध येण्याकरता सकस आहारची गरज असते. पुढील पदार्थाच्या आहारातील समावेशाने मातांचे दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते 

१) मेथी

 मेथीमध्ये ग्लॅक्टोगोग्युज हा घटक असतो (galactogogues)असतो. आणि हा पदार्थ मातेचे अंगावरचे दूध वाढविण्यास मदत करतो. बरेच डॉक्टर नवीन मातांना मेथीचे पदार्थ खाण्यास सांगतात.

 २) बडीशोप

 

 

बडीशोप मध्येही अंगावरचे दूध वाढविण्याचे गुणधर्म असतात. माता या दररोज जेवणानंतर बडीशोप खातात, कारण अन्न पचविण्यास त्याची मदत होते. व  मलावरोधला विरोध करते, जी  मातांना सामान्यतः प्रसूतीनंतर ही समस्या असते.

 ३) लसूण

लसूण वनौषधी आहेच. व ती रोगनिवारक वनस्पती आहे. अंगावरचे दूध  वाढवते व  काही अभ्यासाअंती निष्पन्न झालेय की, जी माता जेवणात लसूणाचा वापर करत असेल, ती माता इतर मातांपेक्षा जास्त वेळ बाळाला दूध पाजते.

४) जिरे

 

स्वयंपाकात जितका जिऱ्याचा समावेश करता  येईल, तेवढेच दुधाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. जिऱ्यामुळे आयरन सुद्धा शरीराला मिळते.

 ५) तीळ

 

 

दोन्ही काळी आणि पांढरी तीळ कॅल्शिअम व कॉपर साठी उत्तम स्रोत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात आईला व बाळाला पोषक ठरतील असे घटक असतात.

 ६) ओवा

 

प्रत्येक माता प्रसूतीनंतर ओवा खात असते, आणि हे डॉक्टरांनीही सांगायची जरुरी नसते. ओवा या अन्न पचविण्याबरोबर मलावरोधला अटकाव करतात.

७) ओट्स

ओट्स सकाळच्या नाश्त्यासाठी महत्वाचा स्रोत आहे, त्यातून तुम्हाला  कॅल्शियम व फायबर, आयरन,  मोठ्या प्रमाणात मिळेल.

 ८) हिरव्या पालेभाज्या

हिरव्या भाज्या तर जीवनसत्त्वयुक्त आहेतच, पण भोपळा, दुधी भोपळा, कोबी या भाज्या जेवणात आणाव्यात. हिरव्या भाज्या पचायला हलक्या व मोठ्या प्रमाणात जीवनसत्व देतात.

 ९) लाल भाज्या आणि कंदमुळं 

 

रताळे, उकडून खाण्याचा कंद (याम), गाजर, बीट, ह्या फळांमध्ये बीटा कॅरोटीन जास्त असते.आणि नवंमातांसाठी हा खूप चांगला डायट आहे. ह्या लाल भाजीपालात अंगावरचे दूध तर वाढतेच, शिवाय यांच्या खाण्याने  यकृताचे आरोग्य वाढते, आणि प्रसूतीनंतर  मातेच्या रक्तातील तांबड्या पेशींची कमतरता झाल्याने तिला अशक्तपणा जाणवू लागतो,तेव्हा या भाज्यांचा आहारातील  समावेशाने  अशक्तपणा जाणवत नाही. शक्य झाल्यास दररोज जेवणात ह्या लाल भाज्यांचा समावेश करावा.

१०) सुका मेवा

सुका मेवामधील काही पदार्थ जर रोजच्या भाज्यांत वापरले तर त्याचा घटक शरीराला मिळेल.

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: