ya-pach-goshtimule-tumhi-punha-ekda-tumchya-patichya-premat-padta

लहान मुलांना सांभाळणं काही सोप्पी गोष्ट नाहीये, पण त्यांना सांभाळताना तुम्हाला ज्यावेळी तुमच्या पतीची साथ मिळते त्यावेळी तुमच्या बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात . आणि ज्यावेळी ते बाळ सांभाळायचा प्रयत्न करत असतात त्यावेळी त्यांचा पुढील ५ छोट्या गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा त्यांचा प्रेमात पडतात .

१. बाळाचे डायपर / लंगोट बदलणे

ज्यावेळी दिवसभर बाळाची  काळजी घेऊन थकलेले असता आणि जरा आरामासाठी जरा  टेकता आणि त्यावेळी बाळ परत शू किंवा शी करतं आणि त्याचे डायपर किंवा लंगोट बदलणं आवश्यक असतं. आणि त्यावेळी तुमचे पती तुम्ही ना सांगता स्वतः पुढे येऊन त्याचे कपडे बदलतात आणि त्याला स्वच्छ करतात.

२. ज्यावेळी ते बाळाबरोबर खेळात असतात

ज्यावेळी तुमचे पती बाळा बरोबरअगदी   लहान होऊन खेळात असतात. त्याच हुंकार ला ओ देत असतात त्याला इकडे तिकडे घेऊन फिरत असतात. कधी त्याचासाठी घोडा बनतात अगदी कामावरून थकून आलेलं असताना देखील बाळला बघितलं कि सगळं विसरून त्याचाशी खेळायला लागतात  

३. रात्री – अपरात्री उठणे

तुम्हाला नुकतीच झोप लागते आणि बाळ रडायला लागतं.अश्यावेळी तुम्हांला त्रास होऊ नये  म्हणून स्वतः उठून बाळाला घेऊन दुसऱ्या खोलीत जातातआणि त्याला शांत करून त्याला झोपवतात आणि मग तुमच्या जवळ  ठेवतात.

४. तुम्हाला बाहेर जायचं असतं त्यावेळी ते घरी थांबतात  

तुम्हाला कधी तुमच्या मित्रमैत्रिणाला भेटायला जायचं असेल आणि त्यावेळी मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसेल तर स्वतः घरी थांबून तुम्हाला बाहेर जायला सांगतात आणि पूर्णवेळ त्याची काळजी घेतात.अश्यावेळी तुम्हाला असा काळजी घेणारा पती मिळाल्याचा आनंद होतो.

५. तुमचं कौतुक करणे

तुमच्या बाळाला जन्म देतानाच्या  वेदनाची जाणीव ठेवून तुमचं कौतुक करतात तुमची काळजी घेताता. तुम्ही कश्या चांगली आई आहेत याची जाणीव करून देतात . तसेच एखाद्य दिवशी बर नसेल वाटत तर तुम्हाला कसं बरं वाटेल याचसाठी धडपड करतात. या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही पुन्हा एकदा त्यांचा प्रेमात पडता .

Leave a Reply

%d bloggers like this: