balacha-janm-zalyavar-vadhnare-kharch-aani-niyojan-kase-karave

 

 

घरात बाळ येणार या आनंदापुढे पैसे ,खर्च सारख्या गोष्टी नगण्य असल्या तरी त्याचे वेळीच केलेले योग्य ते नियोजन  हा आनंद द्विगुणित करते . त्यामुळे या काळात कशाप्रकारचे खर्च येऊ शकतात आणि त्यासाठी कशी तयारी करावी याची साधारण कल्पना आम्ही देणार आहोत 

प्रसूतीच्या खर्च

सिझेरियन प्रसूतीला खूप खर्च येतो. त्याबरोबर औषधीही खूप घ्यावी लागते,म्हणून त्याचा वेगळा खर्च असतो . नार्मल प्रसूतीला जास्त खर्च येत नाही. पण याप्रकारची प्रसूती करणे आपल्या हातात नसते. मातेची व बाळाची तब्येत त्यावेळच्या परिस्थितीवरून डॉक्टर कोणत्या प्रसूती करायची त्याचा निर्णय घेतात. म्हणून अगोदर याचा विचार करून पैशांचे नियोजन करून ठेवावे.

आरोग्यविमावर पूर्णपणे अवलंबून राहू नका.

तुम्ही जर आरोग्यविमा काढला नसेल तर तो काढून ठेवा. आणि आरोग्यविमा काढलाच असेल तर प्रसूतीच्या वेळी त्याचा लाभ होईल अशी समजूत करून घेऊ नका. कारण आरोग्य विमा बनवणाऱ्या कंपन्या या खूप बारीक तपशील विचारून तुम्हाला विम्याचे पैसे नाकारू शकतात. किंवा ते मिळण्यास वेळ देखील लागू शकतो  तेव्हा त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका.

बाळासाठीची  खरेदी

घरात बाळ येणार म्हणाल्यावर त्याचासाठी बऱ्याच गोष्टीची खरेदी करावी लागते. घरातील बऱ्याच गोष्टीमध्ये बदल करावे लागतात. या खर्चाचं गणित लक्षात ठेवावं

 बिनपगारी रजा

आता महिलांना मॅटर्निटी लिव्ह मिळतेच त्यात त्यांचा पगारही कट होत नाही.आणि आता बाळाच्या वडिलांना पालक म्हणून सुट्टी मिळते पण बऱ्याच कंपन्यांमध्ये ती सहज-सहजी मिळत नाही. ती मिळावी म्हणून तशी विनंती तुमच्या बॉसला करावी. परंतू ती न मिळाल्यास कमी येणारा पगार गृहीत धरावा

वाढणारा महिन्याचा खर्च

तुमच्या घरात नवीन व्यक्ती येणार म्हणल्यावर तसा खर्चही वाढतो. ही गोष्ट पालक मनावर घेत नाहीत. पण बाळ आल्यावर किराणा जास्त लागतो. आईच्या सकस आहारच खर्च वाढतो. हा खर्च देखील लक्षात ठेवावा आणि त्याची तजवीज करावी

डॉक्टरांचा खर्च

प्रसूतीनंतर  पालकत्वाची जबाबदारी पार पडत असताना कधी-कधी पालकांना समुपदेशनाची गरज पडते. बाळ केव्हाही आजारी पडते, काही वेळा खात नाही, तेव्हा  आहारतज्ज्ञ कडे जावे  लागते. तेव्हा त्याचा खर्चही नकळत वाढत असतो. हा खर्च देखील लक्षात घेणे गरजेचे आहे

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: