balacha-mitra-naralache-khobrel-tel

आजही बऱ्याच आज्या  नारळाच्या  तेलानेच  बाळाची मालिश करतात. ते तिला डॉक्टरांनी सांगितले नाही. हे ज्ञान  परंपरागतच भारतीय मातेला मिळाले आहे. कारण नारळाच्या तेलात, रोगाच्या सूक्ष्मजंतूंना (Anti-Bacterial) विरोध करण्याची क्षमता असते, त्याचबरोबर त्यात विषाणूंना विरोध करण्याची शक्तीही असते. त्याच्या शरीरावर काहीच  विपरीत परिणाम होत नाही. हेच नारळाचं  तेल (खोबरेल तेल) हे बाळांसाठी अतिशय उपयुक्त असं तेल मानण्यात येतं. बाळासाठी  हे  तेल पुढील काही प्रकारे  कसे उपयुक्त ठरते हे आपण पाहणार आहोत

 टाळूची मालीश

बाळाच्या जन्म झाल्यांनतर काही बाळांच्या टाळूवर रखरखीत त्वचा तयार तयार होते. तुम्हाला तो डोक्यामध्ये कोंडा झालाय असे वाटते. आणि ही अवस्था आठवड्यानंतर येते. बऱ्याचदा ही स्थिती बाळाचे डोके उशीला किंवा कपड्याला घासल्यामुळे येते. याला सेबोरेहीक (seborrheic dermatits) असेही म्हणतात. यासाठी नारळाचे तेल खूप उपयुक्त आहे. बाळाच्या टाळूवर व त्या भागात  नारळाच्या तेलाची हलकी मालीश करा. आणि ती २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर  अंघोळीच्या वेळी  कोमट पाण्याने हलकेच डोकं धुवा.

      डायपरचे रॅश

बाळ खूप तान्हे असताना त्याला मऊसर सुती लंगोट घालावे. पण जर पर्याय नसेल आणि काही कारणाने डायपर घालावे लागल्यास बाळाच्या नाजूक त्वचेला रॅशेस किंवा पुरळ येण्याची शक्यता असते. कधी कधी सततच्या शु करण्याने किवां काही कारणाने आणि हळूहळू मांडीलाही लालसर पुरळ येते तेव्हा नारळाचे तेल याबाबत मदत करते. त्यासाठी बाळाची अंघोळ झाल्यावर  नारळाचे तेल(खोबरेल तेल)  ज्या भागावर पुरळ उठले असतील  त्या ठिकाणी लावावे. व बाळाचे डायपर नेहमी बदलत राहावे. लवकरच पुरळपासून बाळाला आराम मिळेल.

 मुलायम केसांसाठी

बाळाच्या केसांना रोज नारळाचे (खोबरेल तेल) लावल्यामुळे पुढे बाळाच्या केस मुलायम होतात,केसाची चांगली वाढ होते.आणि भविष्यात केसाच्या तक्रारी कमी प्रमाणात उद्भवतात.

किडा /मुंगी चावल्यामुळे येणारे रॅशेस

बाळाची त्वचा मऊ आणि नाजूक असल्याने त्यावर कीडा/ मुंगी  चावल्यावर ती जागा लगेच लालसर होते, व काही बाळांना त्यामुळे अलर्जी होते. त्यावेळी नारळाचे तेल  हातावर घेऊन चावलेल्या जागेवर हळूहळू चोळावे. जोराने चोळू नये. पण जर एखादा किडा चावल्यावर असाधारण लक्षणे दिसल्यास  बाळाला डॉक्टरांकडे कडे घेऊन जावे.

नैसर्गिक बॉडी लोशन

नारळाचे तेल (खोबरेल  तेल) हे बाळासाठी आणि सर्वांसाठीच नैसर्गिक बॉडीलोशन आहे. हे नैसर्गिकपणे त्वचेला ओलावा देते. ह्या तेलात त्वचेसाठी पोषक घटक व जीवनसत्व असतात, ते  कोरड्या त्वचेला तुकतुकीत व मुलायम करतात. त्यासाठी नारळाचे तेल(खोबरेल तेल) हातावर घेऊन ज्या ठिकाणी रुक्ष व कोरडी  त्वचा झाली असेल तिथे हलक्या हाताने   लावावे व अंघोळीपर्यंत राहू द्यावे.

नैसर्गिक उपचार

जर तुमच्या बाळाला लागलं, काही कापले गेलं, हात भाजला, कुठे टेंगुळ आले तेव्हा तिथे आपण शुद्ध नारळाचे  तेल लावतो. जखम झाली तिथेही नारळाचे तेल घरोघरी लावले जाते कारण त्यामध्ये औषधी घटक आहेत. ते घटक जखम भरून येण्यास मदत  करतात

डोक्याची मालीश

रोज रात्री झोपताना बाळाच्या डोक्याला नारळाच्या तेलाने (खोबरेल तेलाने )हलक्या हाताने मालीश  केली असता बाळाला शांत झोप लागते

एवढ्या सगळ्या बाबतीत उपयुक्त असणारे तेल बाळाचा जवळचा मित्र असते. परंतु एखाद्या बाळाला नारळाच्या तेलाची ऍलर्जी असू शकते पण ते प्रमाण अगदी नाही इतके कमी असते. फक्त तुम्ही वापरात असलेले नारळाचे तेल हे शुद्ध आणि केमिकल विरहित आहे ना याची खात्री करून घ्या.

Leave a Reply

%d bloggers like this: