garodarpanat-mahilana-padnare-kahi-prasn

 

 

गरोदरपणाचा प्रवास हा फार रोमांचक प्रवास असतो.आणि या मध्ये तुमच्या आणि तुमच्या पतीच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात. स्त्रीरोग तज्ज्ञच्या मते पुढील प्रश्न स्त्रिया त्यांना नक्की विचारतात

स्नायू आखडणे आणि योनी-स्त्राव नैसर्गिक आहे का?

पहिल्या ३ महिन्यात शरीराच्या खालच्या भागात म्हणजेच पोट, ओटी पोट या भागातील स्नायू थोडे आखडल्यासारखे वाटतात आणि तो भाग ओढल्या ओढल्या सारखा वाटतो आणि कधी-कधी योनीतुन काही स्त्राव होत असतो. यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही  गर्भाशयामध्ये तुमच्या बाळाची वाढ सुरु झालेली असते त्यामुळे स्नायू थोड्या प्रमाणात आखडतात आणि योनिस्राव देखील होतो. परंतु हे वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार होणार योनिस्राव हा कधी कधी योनी किंवा गर्भाशयाचे इंफेक्शनचं लक्षण असू शकते त्यामुळे वारंवार असे घडल्यास डॉक्टरांना त्याची कल्पना द्या. (याचा काळात जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक असते)

गरोदरपणात किती वजन वाढू शकते ?

गरोदरपणात वाढणारे वजन हे किती प्रमाणात वाढायला हवे आणि साधारण वजन किती असावे. हा प्रश्न बहुतेक महिलांना पडतो. गरोदरपणात किती वजन वाढले तर ते योग्य असते हे तुमच्या बी एम आय च्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यावेळी तुमचे गरोदर असण्याचा पूर्वीचे साधारण वजन, तुमची उंची तुमचे साधारण वजन या वरून तुमचे किती वजन वाढले तर ते योग्य आणि त्यापेक्षा जास्त झाले तर त्याचे दुष्परिणाम डॉक्टर तुम्हाला सांगतात.यासाठी तुम्हला डॉक्टर वारंवार तपासणीसाठी  बोलावतात.

गरोदरपणात कोणत्या प्रकारचे व्यायाम केले तर चालतात  ?

गरोदरपणात क्रियाशील असणे  हे तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या प्रकृतीसाठी चांगले असते. या  काळात व्यायाम आणि कोणत्याही प्रकारचा ताण शरीराला देताना काळजी बाळगणे गरजेचे असते. विशेषतः पहिल्या ३ महिन्यात  काळजी घेणे गरजेचे असते. चालणे,फिरणे जलतरण हे प्रकार गरोदरपणात सुरक्षित व्यायामाचे प्रकार मानले जातात.परंतु यात देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला कुठे दुखापत होणार नाही, तसेच शरीराला जास्त ताण द्यावा लागणार नाही असे व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याने करा

गरोदरपणात किती वेळ काम करावं

हे प्रत्येक महिलेच्या वजन आणि क्षमतेवर अवलंबून असते. जर तुम्हाला जास्त शाररिक श्रमाचे काम करावं लागत असेल. तर काही दिवसासाठी या कामातून ब्रेक घ्या. कमी श्रमाचे काम करा आणि जर कामामुळे मानसिक ताण येत असेल तर ते थोडे दिवस थांबवा  

प्रसूतीच्या वेळी लक्षात ठेवायच्या गोष्टी

प्रसूतीच्यावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवव्या  आणि नाही हा प्रश्न सगळ्या महिला हमखास डॉक्टरांना विचारतात. त्यांना आपल्यात होणाऱ्या शारीरिक बदला विषयक जाणून घेण्यास उत्सुकता असतात. या सर्व गोष्टी प्रत्येक महिलेच्या बाबतीत निरनिराळ्या असू शकतात. तसेच  त्यावेळी तुम्ही विचार करण्याच्या मनस्थितीत देखील नसता त्यामुळे या बाबत डॉक्टरकडून माहिती जाणून घेताना कुटूंबातील एखादी व्यक्ती बरोबर असणे गरजेचे असते.

सुरक्षित प्रसूती

हॉस्पिटल मधली किंवा डॉक्टरांच्या देखरेखेतील प्रसूती केव्हाही सुरक्षित मानण्यात येते. पण जर प्रसूती घरी झाली तरी त्या महिलेले हॉस्पिटल मध्ये नेणे बाळाच्या आणि तिच्या प्रकृतीसाठी आवश्यक असते. डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या आसपास गरोदर स्त्रीला कळा सुरु झाल्यावर ताबडतोब हॉस्पिटल मध्ये नेणे आवश्यक असते.ज्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळू शकतात

नैसर्गिक व  सिजेरियन प्रसूती  (सी-सेक्शन)

नैसर्गिक प्रसूती आणि सी -सेक्शन प्रसूती या बाबत देखील अनेक महिलांच्या मनात शंका असतात. साधरणतः ३ पैकी  १ महिलेला  सी-सेक्शन प्रकारच्या प्रसूतीची गरज पडते. याबाबत डॉक्टरांशी चर्चा करणे गरजेचे असते कोणत्या प्रकारची प्रसूती तुमच्या साठी सुरक्षित असू शकते याचा सल्ला घेणे गरजेचे असते.

Leave a Reply

%d bloggers like this: