garbhavasthetil-sambhavya-adchaniआम्ही समजू शकतो की आई होण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात. गर्भसंस्कारासाठी आणलेली सगळी पुस्तके, पौष्टिक आहार, डॉक्टरांकडे चेकअप साठी जाणे, औषधी वेळेवर घेणे अशी सुलभ प्रसूतीसाठी  सगळी काळजी तुम्ही घेत असाल. ती आवश्यकही आहे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली कधीही बरी, नाही का?
या गरोदरपणाच्या काळात काही गुंतागुंतीच्या स्थिती उदभवू शकतात. गैरसमज टाळण्यासाठी  त्याविषयीची माहिती गर्भवतींना असणे गरजेचे आहे. खाली यासंदर्भात आवश्यक माहिती दिली आहे.  

१. तीव्र मळमळ आणि उलट्या होणे.
गर्भावस्थेत मळमळ आणि उलट्या हे सामान्य लक्षण आहे, पण हे अति प्रमाणात होत असेल तर काही गुंतागुंतीची परिस्थिती येण्याची शक्यता असते. ह्यामुळे तुमच्या खाण्या-पिण्यात अडचणी येऊ शकतात आणि निर्जलीभवन (डि हायड्रेशन) किंवा पोषक आहार न मिळणे अशा गोष्टी होऊ शकतात. या काळात पाणी कमी पिणे किंवा योग्य आहार न मिळाल्यास त्याचे परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतात. त्यामुळे या संबंधित डॉक्टरांकडे जाऊन तात्काळ उपचार करा.

२. प्री-एक्लॅम्पसिया( किंवा पूर्व गर्भापस्मार)
तीव्र डोकेदुखी, पोट दुखणे, डोळ्यांना अंधुक दिसणे ही प्री-एक्लॅम्पसिया या स्थितीची लक्षणे आहेत. ही समस्या गर्भावस्थेतील ५% स्त्रियांना उदभवू शकते. गंभीर स्वरूपाच्या या स्थितीत उच्च रक्तदाब आणि लघवीतील जास्तीची प्रथिने आढळतात. परंतु २० आठवड्याच्या गर्भावस्थेसाठी या गोष्टी सामान्य असू शकतात.

३. पाण्याची पिशवी फुटणे .
तुम्ही तुमच्या नेहमीच्याच कामात व्यग्र असाल आणि अचानक तुमच्या दोन्ही पायांमधून पाणी सांडू लागते, या प्रकाराला पाण्याची पिशवी फुटणे असे म्हणतात. मूत्राशयावर ताण आल्याने देखील असे होऊ शकते, गर्भावस्थेत ही एक सामान्य बाब आहे. बाळाला धक्का लागू नये म्हणून आवरण असलेली पाण्याची पिशवी फुटल्याने हे पाणी वाहते. ही लघवी आहे की  पिशवीतले पाणी याची खात्री करून घेण्यासाठी सर्वप्रथम लघवी करून घ्या आणि नंतर देखील हे पाणी वाहत असेल तर तुमची पाण्याची पिशवी फुटली आहे. यावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

४. मधुमेह
गरोदर असताना शरीरातील संप्रेरकांच्या अस्थिरतेमुळे रक्तातली साखर वाढू शकते. अशा मधुमेहामुळे गर्भधारणेतील अडचणी वाढू शकतात. ही स्थिती उद्भवली असल्यास तुम्हाला प्रसूती होईपर्यंत सतत  डॉक्टरांच्या देखरेखेखाली राहावे लागते. अशा मधुमेह झालेल्या अनेक स्त्रियांची प्रसूती योग्य आणि वेळेवर उपचार मिळाल्यास सामान्यपणे होऊ शकते आणि त्यांना निरोगी अपत्यप्राप्ती होऊ शकते.

५. कळा.
मुदतपूर्व काळात म्हणजे प्रसुतीच्या खूप आधी गरोदर स्त्रीला कळा सुरु होऊ शकतात ज्या शक्यतो
चुकीच्या असतात. अशा कळा कधीही येऊ शकतात आणि त्या समान लयीत नसतात. वेळेवर पाणी पिल्यास या कळा एखाद्या तासात थांबू शकतात. या कळा दर १० मिनिटांनी चालू राहतात आणि जास्त दुखू लागतात. जर गर्भावस्थेतल्या तिसऱ्या त्रैमासिकात अशा कळा येऊ लागल्यास डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.  

६. उच्च रक्तदाब.
हृदयाकडून शरीरातील इतर अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास  उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो. अशा उच्च रक्तदाबामुळे गर्भातील जीवाला रक्त पुरवठा कमी पडल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो कारण बाळाच्या रक्तवाहिन्यांना हा दाब सहन होत नाही. अशा स्थितीत उपचार घेणेच योग्य ठरते .

७. रक्तस्त्राव.
पहिल्या त्रैमासिकात रक्तस्त्राव झाल्यास हे अस्थानिक गर्भधारणेचे (ectopic pregnancy) म्हणजेच गर्भपात झाल्याचे लक्षण आहे. जेंव्हा फलित झालेले अंडे गर्भाशयात रुजण्यास असफल होते व दुसऱ्याच एखाद्या ठिकाणी रुजते आणि गर्भधारणा झाल्याचे चुकीचे संकेत मिळतात. गर्भवस्थेत कोणत्याही टप्प्यावर रक्तस्त्राव झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यायला हवेत.
  

Leave a Reply

%d bloggers like this: