mulana-samjun-ghetana-ya-goshti-lakshat-theva

 

पालक होण्याची भूमिका सोपी आहे असे कोणीच सांगणार नाही. पालक होण्याचा जितका आनंद असतो तितकीच ती मोठी जबाबदारी असते. अपत्याची चांगल्या पद्धतीने पोषण, संस्कार, त्याच्या सवयी, या तितक्याच संवेदनशील बाबी आहेत. संसाराला लागणारा पैसा व कुटुंबाच्या सर्व गरजा पुरवून घराला आनंदी ठेवणे, या दोन्ही जबाबदाऱ्या तारेवरच्या कसरती असतात.

खाली दिलेल्या उपायांनी मुलाला चांगल्या रीतीने समजून  घेता येईल.आणि तुम्ही उत्तम पालक होणार.

१) स्वभाव समजून घ्या

तुमच्या मुलाविषयी निर्णय घेण्याअगोदर त्याची मनस्थिती काय आहे, हे समजून घ्या. वडील  म्हणून ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. प्रत्येक मुलं स्वभावाने वेगळे असते. त्यांचे विचार वेगळे असतात म्हणूनच त्या- त्या प्रसंगात त्याची प्रतिक्रिया भिन्न असते. तेव्हा त्याला समजून घ्या.

२) भावनांची कदर करा

अर्थातच, ज्या गोष्टी तुमच्या मुलाला त्रासदायक वाटतात, त्या तुम्हाला महत्वाच्या वाटत असतील तेव्हा त्यावेळी त्याच्या भावनांची कदर करा. त्याची समज कमी असल्याने त्याला प्रेमाने समजावून सांगा. त्यावर रागावून बोलू नका.

३) तुलना नको 

तुमच्या मुलाची सतत इतर मुलांबरोबर तुलना करू नका, त्यामुळे त्याचा मनात न्यूनगंड निर्माण होईल. आणि  कदाचित तो तुमचा आणि त्या मुलाचा दुस्वास करू लागेल.

४) निर्णय घेताना त्याला सहभागी करून घ्या

तुमच्या मुलाचा दररोजच्या दैनंदिन गोष्टीमध्ये त्याला सहभागी करून घ्या. त्याच्या बद्दल निर्णय घेण्याअगोदर त्याला सांगा त्याचे मत जाणून मगच निराळीं घ्या.आणि त्याला जीवनातल्या हे असे  का? व कसे ? या गोष्टीबाबत शिकवण द्या.

५) दृष्टीकोन

तुमच्या मुलाची वाढ एका टप्यातून दुसऱ्या टप्यात होत असताना, त्याच्या दृष्टीने जग व जीवन बदलत असत. त्यामुळे त्याचा दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा 

Leave a Reply

%d bloggers like this: