navmatanchya-potavaril-charbi-kamikarnya-sathiche-kahi-sadhe-upay

मातृत्व म्हणजे स्त्री चा दुसरा जन्म. लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्याला बाळ होण्याचे वेध लागते. गरोदरपणाच्या साऱ्या कष्टाला व त्रासाला सहन करून, आई जेव्हा जन्मणाऱ्या बाळाला पहाते, तेव्हा तिचा आई होण्याचा आनंद द्विगुणित होतो. पण या प्रसूती काळात बाळ झाल्याच्या आनंदाबरोबर अप्रत्यक्षपणे वाढलेल्या वजनाची तिला काळजी वाटू लागते. नोकरीवर असणाऱ्या स्त्रियांना अतिरिक्त वाढलेल्या ओटीपोटाची चरबीची  चिंता वाटते व त्यांना ही चरबी कमी होणार नाही अशीही भीती वाटते. तुम्ही सकारात्मकतेने पहिले तर वाढलेले वजन कमी करता येईल. प्रसूतीनंतर काही स्त्रियांच्या शरीरावर सूज आलेली असते, व त्यालाच त्या, आपले खूप वाढले असे ठरवून टाकते. पण ती सूज काही दिवसांनी आपोआप निघून जाते. तेव्हा प्रसूतीनंतर काही दिवसांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व आपल्या प्रकुतीनुसार खाली दिलेल्या उपायांचा अवलंब करता येईल. पण यात  नियमितपणा खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर बाळाचीआणि तुमची  प्रकृती  वजनापेक्षा जास्त महत्वाची आहे, ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवावी.

खाली दिलेल्या उपायांनी बाळ सदृढ राहील, व मातेचे वाढलेलं वजनही आटोक्यात येईल.

चालणे व साधी योगासने

सकाळी उठल्यावर घरातल्या घरात चालणे, संध्याकाळी शांत वातावरणात बाळाला घेऊन फिरावे त्यातून चालणे होईल. बाहेर जाता येत नसेल तर घरात फिरावे. प्रसूतीनंतर काही साधी योगासने करता येतात परंतु  ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. दिवसभर सध्या हालचाली जसेच्या खोलीतून, त्या खोलीत जाणे खोलीतल्या खोलीत इकडून तिकडे चालणे

सकस आहार

तुमच्या व बाळाच्या आरोग्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. बाहेरील तेलकट,आंबवलेले पदार्थ वर्ज्य करावे. ऐवजी त्या ऐवजी घरगुती सात्विक कमी मसालेदार पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच फळे, ताज्या पालेभाज्या,मुळा, गाजर बीट  यांचा समावेश आहारात करावा. तसेच आपल्या रोजच्या दैनंदिन आहारात साध्या छोट्या गोष्टीही वजन कमी करण्यास मदत करतात. जसे साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. चहा – कॉफीचे प्रमाण कमी करावे  

पाण्याचे योग्य प्रमाण

सकाळी नियमितपणे एक ग्लास कोमट पाणी प्यावे. थंड पाण्याच्या जागेवर गरम किंवा कोमट पाणी प्यावे. रात्रीच्या वेळी एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात भिजत घालून ठेवावे. सकाळी उठून ते पाणी उकळून व गाळून प्यायल्याने देखील वजन कमी होण्यास मदत होते.  

स्तनपान

बाळाच्या आरोग्यसाठी स्तनपान अत्यंत आवश्यक आहे. जे घटक बाळाला आईच्या दुधातून मिळतात. ते इतर कशातूनही मिळत नाही. बाळाच्या संपूर्ण, मानसिक, शारीरिक  वाढीसाठी स्तनपान गरजेचे असते. स्तनपान वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

वजन कमी होण्याबाबत आशावादी राहा

गरोदरपणात वाढलेले वजन नियंत्रित करण्यासाठी  सकारात्मक असणे गरजेचे आहे. आता माझे वजन असेच राहणार पुन्हा पहिल्या सारखे होणार नाही असे नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका.वजन हे नियंत्रणात आणणे हे काय एका दिवसात घडणारी गोष्ट नाही त्यामुळे त्याबाबत सहनशील असणे गरजेचे आहे. तसेच वजन कमी होणे गरजेचे असले तरी त्यापेक्षा तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य महत्वाचे हे लक्षात ठेवा  


Leave a Reply

%d bloggers like this: