ya-margani-tumchyat-natyat-punha-prem-anaa

 

तुम्ही एका मुलाची आई झाल्यावर तुम्ही बाळाबरोबर व्यस्त होता  तुम्हाला कुणालाच द्यायला  वेळ नसतो. मग तो न घरातली माणसं असो  किंवा नवरा किंवा तुम्ही स्वतः असो. बाळाच्याच साऱ्या गोष्टीत तुमचे लक्ष असते अश्यावेळी लहान व सुंदर गोष्टीतून छोटे-छोटे क्षण कसे संस्मरणीय करता येईल ते पाहूया.

१) एकत्र स्वयंपाक करा

एकत्र स्वयंपाक करायची गोष्ट खूप आनंददायक असते. जरी तुम्हाला कोणता पदार्थ येत नसेल तर इतर कामे जरूर करा. वाटल्यास स्वयंपाकात घरात थांबून एकमेकांशी गप्पा करा. एकमेकांसोबत राहा

२) मेसेज करा

एखादी गोष्ट  जोडीदाराला सांगावीशी वाटली तर वाट पाहू नका. मेसेज करून सांगून टाका . तुमचा एखादा  साधा मेसेज तुमच्या जोडीच्या चेहऱ्यावर हसू आणेन.  एकमेकांच्या प्रत्येक मेसेज ला उत्तर द्यायच प्रयत्न करा. यामुळे तुमच्या नात्यात एक नवीन सुरुवात झाली असे वाटेल.

३) एकत्र चित्रपट बघा

बाहेर फिरायला जायला वेळ नाही. तेव्हा त्यावरती चांगला मार्ग म्हणजे चित्रपट बघणे होय. घरीच अरामात लोळत एखादा रोमँटिक चित्रपट बघा. त्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल

४) तुमच्या आवडत्या स्थळाला भेट द्या

तुम्ही ज्या थंड हवेच्या ठिकाणी किंवा प्रथमतः ज्या ठिकाणी गेला असाल त्याला भेट द्या. तुमच्या जुन्या आठवणी, प्रसंग, पुन्हा नव्याने ताज्या होतील. ते भारावलेले दिवस पुन्हा येऊ द्या.

५) रात्री फिरायला जा

रात्रीच्या शांत वेळी जवळच कुठेतरी फिरायला जा. आईस्क्रीम खा, छान रोमँटिक गप्पा मारा. शांतता अनुभवा या गप्पामुळे तुम्हाला हलके वाटेल.

६) एकत्र व्यायामाला बाहेर पडा  

 
 

दोघांनी एकत्र व्यायाम करा. सकाळी लवकर उठून बागेत फिरायला जा. यामुळे तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवत तर येईलच पण तुमचा व्यायाम देखील होईल 

७) एकत्र खेळाचे सामने /टीव्ही बघा

 क्रिकेट, फुटबाँल, टेनिस, कोणताही खेळ असो तो जर टी.व्ही वर पहात असेल तर तुम्हाला आवडत नसेल तरी पाहण्याबचा प्रयत्न करा. त्या खेळाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही एकमेकांची मने जिंकणार.

८) सुटी घेऊन बाहेर पडा

एखाद्या दिवशी सुट्टी घेऊन  बाळाला त्याच्या आजीकडे सोपवून  बाहेर फिरायला जा. असे छोटे छोटे क्षण  आपल्या नात्याला घट्ट करून आनंदी राहा.या मार्गानी तुमच्या नात्यात पुन्हा प्रेम आणा

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: