balachi-zop-ani-bhukechya-patarn

 

एका नव्या आईसाठी, बाळाची व्यवस्थित झोप होतेय ना ! त्याला झोपेत काही समस्या नाही ना ! त्याचे काही दुखते म्हणून त्याला झोप येत नसेल ना ! असे बरेच काळजीचे प्रश्न आईला पडतात. ती त्यासाठी पुस्तक वाचते, व्हिडीओ पाहते. प्रत्येक मातेला बाळाच्या झोपण्याबाबत चिंता असते. ० – ६ पर्यतचे बाळ दिवसातून १६ – २० तास झोपते आणि भूक लागते तेव्हाच उठते. तुम्हाला बऱ्याचदा हे ही लक्षात येत नाही की, तुमचे बाळ भूक लागली तेव्हा उठते की, तुम्ही त्याला उठवता. तेव्हा बाळाच्या झोपेचे परीक्षण करा त्यातून तुमचे बाळ प्रकृतीने ठीक आहे ना ते लक्षात येईल.

१) नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाची झोप

जन्माला आलेल्या बाळाची झोप तुमच्या कल्पनेपलीकडे आहे. चार महिन्याचे बाळ १५ तास झोपतेच. तसे प्रत्येक बाळाचे झोपण्याचा पॅटर्न वेगवेगळा असतो. काही बाळांना झोपेत अडथळा येतो, तरीही ते १५ तास झोपतात. बाळ त्यांचा ८० टक्के वेळ हे रॅपिड आय मोव्हमेन्ट ( Rapid eye movement ) च्या झोपेत असतात. याचा अर्थ म्हणजे जास्तीजास्त वेळा डोळ्याची उघडझाप होते त्याने स्वप्नही पडतात आणि हे प्रमाण प्रौढ लोकांच्या झोपेत निम्म्यापेक्षा कमी असते फक्त २० टक्के असते. REM ची झोप बाळासाठी खूप फायदेशीर असते. त्यामध्ये त्याचा मेंदू विकसित होतो. बाळाची हलकी आणि गाढ झोप कशी आहे ते पहा. प्रत्येक ५० ते ७० मिनिटांनी बाळ हलक्या झोपेच्या मूडमध्ये प्रवेश करते तेव्हाच बाळाला स्तनपानासाठी उठवा. म्हणजे त्याची झोप ठीक झाली तर ते निरोगी व उत्साही  राहील.

२) बाळाला झोपेतून का उठवायचे ?

बाळाला झोपेतून का उठवणार त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याला भूक लागली असेल. सामान्यतः प्रौढ लोकांना दोनदा खावे लागते. पण बाळाला दर काही वेळाने उठवून स्तनपान करावे लागते. म्हणून त्याला उठवावे लागते दुसरे कारण बाळाला दिवस व रात्रीचा फरक समजायला हवा, नाहीतर बाळाला दिवसाच झोपण्याची सवय लागेल. तेव्हा बाळाला दिवसा त्याच्याशी खेळा व रात्री झोपवा. बाळाला व्यवस्थित झोपण्याची सवय लागेल.

३) तुमच्या बाळाला किती दूध पाहिजे

प्रत्येक बाळाच्या वाढीसाठी पोषक घटक आवश्यक असतात. आईने ही  गोष्ट जाणून घ्यायला हवी की बाळाला साधारणतः कधी भूक लागते किती वेळा लागते याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. साधारणतः पहिल्या दोन ते ४ आठवड्यात बाळ प्रत्येक वेळी साधारणत ६० ते ७० मिली दूध पिते. त्यानंतर २ महिन्याचे होई पर्यंत प्रत्येक वेळी साधारणत ७५ ते १०० मिली दूध प्रत्येक वेळी पिते. त्यानंतर २ ते ६ महिन्याचा दरम्यान बाळ १०० ते २०० मिली दूध पिते. प्रत्येक बाळाची प्रकृती वेगळी असल्याने त्याला लागणारी भूक आणि त्याचा वेळा वेगवेगळ्या असतात.  

४) बाळाला अन्न देण्यासाठी झोपेतून उठवता येईल का ?

हो, आता तुम्हाला बाळाची झोपेची सवय एव्हाना लक्षात आलेली असेलच. बाळाची झोप पूर्ण झालेली आहे. त्याला उठवून स्तनपान द्या. सुरवातीच्या २ -३ आठवड्यात बाळाला साधारणत दोन दोन तासाने पाजणे गरजेचे असते. त्यानंतर बाळाच्या भुकेच्या वेळा लक्षात आल्यावर त्याचा सोयीनुसार त्याला दूध पाजा .

Leave a Reply

%d bloggers like this: