c-section-sijeeriyan-prasutibabat-samaj-ani-satya


आई होणे हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो.  हा एक सुंदर अनुभव तर आहेच पण त्यासोबत त्याचे काही नाजूक धागेही आहेत जे समजून घेणे आवश्यक आहे. प्रसुतीबद्दल सांगायचं झालं तर शस्त्रक्रियेद्वारे होणारी प्रसूती ही एक आव्हानात्मक बाब असू शकते.

ज्या स्त्रियांची  प्रसूती  सी सेक्शन प्रसूती झाली आहे . त्यांचे प्रसुती दरम्यानचे अनुभव,आणि त्या सर्व गोष्टी ज्या मी ऐकल्या होत्या आणि अनुभवल्या त्या नैसर्गिक प्रसूती झालेल्या स्त्रीपेक्षा सोप्या होत्या. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेंव्हा वर्षभरापूर्वी घडलेली ही घटना मला ताजी वाटते. माझा परिवार, डॉक्टर्स आणि माझी काळजी घेणारे सर्व माझ्या सोबत होते म्हणूनच हे शक्य झाले.
माझी पहिल्यांदा सी-सेक्शन द्वारे प्रसूती झाल्यावर साहजिकच मला माझा हा अनुभव तुमच्यासमोर मांडावासा वाटला जो माझ्यासाखाच अनेक स्त्रियांना मनातली शंका दूर करण्यासाठी कदाचीत उपयोगी पडेल.

१. तुम्हाला वाटले तर तुम्ही शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती निवडू शकता.
सुरवातीला एखाद्या अनुभवी स्त्रीरोगताज्ञाकडेच जा जो तुम्हाला नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रोत्साहन देईल.
जर सिझेरियन करायचे असेल तर त्यासाठी तुमची कारणे न्याय्य हवीत उगाच तुम्हाला एखाद्या ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेलाच बाळाचा जन्म हवा आहे किंवा तुम्हाला जास्त शारीरिक वेदानांमधून जायचे नाही म्हणून शस्त्रक्रियेचा पर्याय निवडू नका, जसे माझ्या बाबतीत बाळ ‘पायाळू’ असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तशी नैसर्गिक प्रसूती केंव्हाही तुमच्या आरोग्यासाठी उत्तमच आहे.

२. सी-सेक्शन एकदाच होऊ शकते.
हि शंका बऱ्याच महिलांना असते. मी उत्सुकतेतून ह्याविषयी खूप संशोधन केले आणि माझ्या असे लक्षात आले आहे कि ह्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. अनेक स्त्रियांनी आजपर्यंत दुसऱ्यांदा सी-सेक्शन होऊनही निरोगी आणि सुदृढ बालकांना जन्म दिला आहे.

३. सी-सेक्शन करणे धोक्याचे असते.
ज्या स्त्रियांना अशा शस्त्रक्रियेतून जायचे आहे त्यांनी धीर आणि संयमाने गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. गरोदर स्त्रीने या प्रक्रियेसाठी तयार  असलेले कधीही चांगले कारण शस्त्रक्रियेदरम्यान काही गुंतागुंतीच्या स्थिती जसे अति-रक्तस्त्राव होणे, मूत्र पिंडाच्या कार्यात गुंतागुंत निर्माण होणे, रक्ताच्या गाठी,  संसर्ग होणे, हृदयाचा झटका येणे उद्भवू शकतात. नैसर्गिक प्रसुतीत असे घडण्याचे धोके कमी असतात. तुमच्या कुटुंबाशी, जवळच्या व्यक्तींशी आणि डॉक्टरांशी याविषयी संवाद साधा. जेणेकरून तुम्हाला आत्मविश्वास येईल.  

४. सी-सेक्शन करण्यासाठी दुसरे मत घेणे उपयोगाचे नसते.
या विषयावर दुसरे मत घ्यावेसे वाटले तर ते अगदी योग्य आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून याविषयी पूर्णपणे सहमत नसाल तर जरूर दुसऱ्या एखाद्या डॉक्टरकडे जाऊन खात्री करून घ्या. शेवटी शस्त्रक्रिया तुमच्यावर होणार आहे त्यामुळे मनातील शंका दूर होऊन तुमच्या मनाची पूर्ण तयारी होणे गरजेचे आहे. खरे सांगायचे तर मी देखील दुसरे मत घेतले होते कारण माझी प्रसूती नैसर्गिकरीत्या होणार नाही या गोष्टीवर मी खूप नाराज झाले होते. माझ्या आईने मला जसा जन्म दिला त्याचाच अनुभव मला घ्यायचा होता, पण माझ्या नशिबात काही वेगळेच होते, असो.

५.सी-सेक्शन झालेल्या मातांना स्तनपान देता येत नाही.

शस्त्रक्रिया केल्यास मातेच्या स्तनांतून चिक लगेच येत नाही पण ती बाळाला स्तनपान मात्र देऊ शकते. कदाचित या मातांना दुध येण्यासाठी ‘सक्शन’ या प्रक्रीयेमधून जावे लागते जे काही प्रमाणात वेदनादायक असते. पण त्याचा नक्कीच उपयोग होतो. मी स्वतः स्तनपान देण्यापूर्वी  या प्रक्रियेतून चार वेळा गेली आहे आणि मला आनंद आहे की माझ्या बाळाला इतर कुठल्याही जास्तीच्या बाह्य आहारावर अवलंबून रहावे लागले नाही.

६. शस्त्रक्रियेनंतर मातेला बरे होण्यास बराच काळ लागतो.
ही गोष्ट पूर्णपणे चुकीची नाही पण पूर्णपणे बरोबरही नाही. नवख्या मातेला ह्यातून लवकर बरे होण्यासाठी पुरेसे वैद्यकीय उपचार आणि औषधी दिली जातात जेणेकरून जखम लवकर भरेल. सोबतच तिला बाळंतपणात मिळणाऱ्या आधारामुळे ती पुरेश्या वेळात चालू-फिरूही लागते.

७. सी-सेक्शन झालेल्या मातांच्या आहारावर नियंत्रण येते.
नाही! अजिबात नाही! हे माझ्या डॉक्टरांनी स्वतः मला सांगितले आहे. फक्त तुमचा आहार पौष्टिक आणि सकस असायला हवा या कडे लक्ष असू दया. कारण शेवटी तुम्ही जे खाणार आहात ते तुमच्या बाळाला मिळणार आहे. तेंव्हा काळजी घ्या!

थोडक्यात सांगायचे तर, सर्व नवख्या मातांनी हे लक्षात घ्या की तुम्ही जसा विचार कराल तशा तुम्ही व्हाल. जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे स्वत:ला सांभाळा आणि जर तुमचे ठरलेले प्लान्स शक्य नाही झाले तर नाराज होऊ नका, सगळे नीट होईल. तुम्ही आई होणार आहात या अवर्णनीय अनुभवाचे आनंदाने साक्षीदार व्हा. तुमचे पालकत्व सुखाचे होवो आणि सोबतच आई होण्याच्या खूप खूप शुभेच्छा !

लेख सहकार्य   -गीतांजली कालीभातLeave a Reply

%d bloggers like this: