lahan-mulana-honari-gaseschi-samasya

गॅसची समस्या ही  फक्त वयस्क किंवा मोठयांची समस्या आहे असे नाही. तर लहान मुलांमध्ये आढळणारी सामान्य समस्या आहे. परंतु लहान बाळांना होणारे गॅस हे त्यांच्यासाठी फार त्रासदायक ठरू शकतात.

 गॅस झाल्याची साधारण लक्षणे

१) गॅस झाल्यावर मुलांचे पोट नेहमीपेक्षा थोडे कडक आणि फुगल्यासारखे वाटते.

२ )लहान मुल बैचेन होऊन रडायला लागते.आणि त्याला साध्या उचक्या लागायला लागतात.

 गॅसेस होऊ नये म्हणून घ्यायची खबरदारी

१) बाळाला गॅस होऊ नये या करता स्तनपान झाल्यावर किंवा खाऊन झाल्यावर त्याला कडेवर घेऊन ढेकर येईपर्यंत पाठीवरून हलकेच हात फिरवत राहावा.

२) तसेच बाळाला स्तनपान देताना त्याचा पोटात हवा जाणार नाही याची काळजी घ्या

३) जो पर्यंत बाळाला स्तनपान देत आहात तो पर्यंत आईने देखील आहारात देखील वातूळ गॅस होतील असे पदार्थ  वर्ज्य करावे. आईने ओवा-शेपचे सेवन करावे त्याचा फायदा बाळाला देखील होतो.

४) ६ महिन्यानंतर लहान बाळाला काय खाऊ घालावं त्याचा आहार काय असावा हे निश्चित करून घ्या.

 गॅस झाल्यावर उपाय

१) वर सांगितल्याप्रमाणे काळजी घेऊन सुद्धा बाळाला गॅस झालेच तर काय करावे बाळाच्या पोटाला  नुसते हलक्या हाताने चोळा.

२) पोटला  अगदी थोडासा हिंग पोटाला चोळावा. त्यामुळे बाळाचे गॅस बाहेर पडायला मदत होईल.

३) बाळाच्या पायांची थोडी हालचाल करावी. हे करून देखील गॅस बाहेर पडत नसतील तर  बाळाला डॉक्टरकडे घेऊन जावे व त्याच्या सल्ल्याने औषध द्यावे.

 तसेच बाळाला सतत गॅसेसचा तरस होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा आहारा आणि त्याचा वेळात बदल करावा. अंगावर पिणारे मुल असल्यास त्याचा दूध  पाजण्याचा वेळामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने बदल कारावा. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: