dusarya-mulacha-vichar-karnyaadhi-ya goshtincha-vichar-kara

पाहिलं बाळ थोडं मोठं झाल्यावर तुम्हाला घरात आणखी एक बाळ असायला हवं असं वाटत असेल.आणि कदाचित  तुम्हाला दोन मुलं असावी असं वाटत असेल. या वाटण्यात वावगं,चुकीचं असा काहीच नाही. तुम्ही स्वतःही भावंडांसोबत वाढलेले असतात, आणि त्या आठवणी आजही तुम्हाला आनंददायक वाटतात. पण ती वेळ व आजची वेळ  यामध्ये खूप फरक आहे, त्यावेळी एकत्र कुटुंबे असल्यामुळे जबाबदारी वाटली जायची. आता परिस्थिती वेगळी आहे. सध्याचं युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे आपण दुसऱ्या मुलाची जबाबदारी पेलण्या इतपत सक्षम आहोत का ? या करता पुढील काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.

१) आर्थिक परिस्थिती

आताची तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर आहे का ? पहिल्या अपत्याच्या वेळी तुम्ही तुमच्या कामातून ब्रेक घेतला होता का? आणि त्यानंतर नुकतेच  तुम्ही पुन्हा काम सुरु केले आहे का?  आणि तुमचे पहिले बाळ मोठं झाल्याने त्याची काळजी घरातले सदस्य घेऊ शकतात का ? आणि तसे नसेल तर त्याला संभाळायची सोय करण्या इतपत तुमची आर्थिक आणि मानसिक तयारी आहे का ? या सर्व बाबींचा विचार करा. गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर  बाळाच्या व आईच्या प्रकृती निरोगी राहण्यासाठी, बाळाच्या पोषणासाठी, आणि प्रसूती जर सिझेरियन झाली, तेव्हा या सगळ्या कारणासाठी खूप खर्च होतो. आणि घरात दोन मुले आल्यावर त्यांच्या व कुटुंबाच्या दोन्हीच्या गरजा भागवून कुटुंब चालवणे म्हणजे दिव्यच असते. या गोष्टी लक्षात घ्या.

२) मागच्या प्रसूतीचा अनुभव

मातृत्व ही गोष्ट सोपी नसते आणि  विशेषतः स्त्रीसाठी सोपी गोष्ट नसते. पहिल्या वेळी जर प्रसूती सिझेरियन झाली असेल त्यावेळी काही गुंतागुंत निर्माण झाली असेल, तर दुसऱ्या वेळी मुलाचा विचार करण्याआधी  डॉक्टराशी त्याबाबत चर्चा करून  निर्णय घ्या. तुमचे शरीर दुसऱ्या प्रसूतीसाठी तयार आहे का ? हे डॉक्टर  तुम्हाला सांगतील. पहिले बाळ तुम्ही ३० वयाचे होते तेव्हा जन्माला घातले असेल तर आता काही जोखमीचे नाही ना ? कारण स्त्रीचे वय जसे वाढते तसे  प्रसूतीमध्ये जोखीमही वाढते. तेव्हा सर्व प्रश्न डॉक्टरांकडे मांडून शंकांचे निरसन करा.

३) कामाचा ताण/बाळाची जबाबदारी  

घरात पहिले बाळ आहे आणि तुम्ही नोकरी करत आहात तेव्हा घर आणि नोकरी.  दोघांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला तुमची क्षमता आहे का? नसेल तर , मग थोड्या काळासाठी तुमचा विचार बाजूला ठेवा. कारण घरातले  कामे, जॉब, आणि बाळाचे पोषण  ही मोठीच कसरत असते.

४) पहिल्या बाळाचे संगोपन महत्वाचे

पहिल्या बाळाच्या सर्व गरजा आणि त्याचे संगोपन तसेच त्याच्या भविष्याची तरतूद करण्यात तुम्ही समर्थ असाल, आणि दुसऱ्या बाळाची जबाबदारी पेलणे तुम्हाला शक्य असेल तर दुसऱ्या बाळाचा विचार करा. जर तुमचे पहिले बाळ स्पेशल चाईल्ड असेल किंवा त्याचा शिकण्याचा वेग इतर मुलापेक्षा कमी असेल, तेव्हा या काळात तुम्ही दुसऱ्या मुलाचा विचार करत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमची इच्छा समजू शकतो, पण तुम्हाला पहिल्या बाळाच्या वाढीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. 

५) तुम्हाला खरंच दुसरं मूल हवंय

अनेकदा, आपण स्वतः दुसरे मूल समाजाकडून व कुटुंबातील इतर सदस्यांची इच्छा असते म्हणून आपण स्वतःची इच्छा नसताना दुसऱ्या मुलाचा विचार करतो. आपल्या देशात अशीही संकल्पना आहे की, दोन मुले पुढच्या भविष्यासाठी चांगली असतात. त्यामुळे साऱ्या बाजूने विचार करूनच दुसऱ्या बाळाचा निर्णय घ्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: