akara-mahinyacha-balacha-aahar

८ महिने वय असलेल्या बाळाचा आहार आणि ११ महिन्याच्या बाळाच्या आहारात फार लक्षणीय असा फरक नसतो. जे पदार्थ ८ महिन्याच्या बाळाला देताना आपण काळजी घेतली होती तेच आता बाळाला आपण रोजच्या आहारात देऊ शकतो. आता लहान मुलाला थोडं वेगळं आणि थोडंसं जड अन्न खाऊ शकते आणि त्याला खाऊ घालणेही  सोप्पे जाते. त्याला हा आहारातला बदल आवडू लागतो आणि खाताना ते जास्त त्रासही देत नाही. आणि जर तुमचे बाळ खाताना थोडी कुरबुर करत असेल तर काळजी करू नका काही बाळांना हा बदल स्विकारायला वेळ लागतो. पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की शिशूला पोषक आहार मिळाला पाहिजे. थोडे संयमाने घेतल्यास हे अवघड नाही, जेणेकरून बाळ सुधृढ राहील आणि त्याची वाढ योग्यरित्या होईल.
खाली ११ महिन्याच्या शिशुसाठी आहार नियोजन दिले आहे, यावरून त्याला काय खाऊ घालावे आणि काय नाही हे पालकांच्या लक्षात येईल. स्तनपानाविषयी बोलायचे झाले तर, १ वर्ष पूर्ण होत आले म्हणून बाळाचे स्तनपान बंद करू नये. कमीत -कमी ६ महिने आणि १२-१८ महिन्याचे होईपर्यंत शिशूच्या आहारात स्तनपान महत्वाचे असते.

सोमवार
सकाळी लवकर स्तनपान देण्यापासून सुरवात करा आणि नाश्ता म्हणून डाळ-खिचडी द्यावी. स्तनपानाची वेळ सकाळीच असली तर चांगले. सकाळच्या स्तनपानानंतर दुपारी जेवणात मऊ भात आणि वरण द्यावं. संध्याकाळी नाश्ताला एखादं फळ बारीक फोडी करून किंवा किसून बाळाला भरवावे. त्याला सर्व डाळींचा किंवा, तांदळाचा, मुगचे घावन भरवावावे झोपण्या आधी पुन्हा स्तनपान करावे.   

मंगळवार
सकाळी उठल्यावर स्तनपान द्यावे. त्यानंतर भाज्या घालून डोसा किंवा इडली देखील चालेल. दुपार जेवणाआधी भूक लागल्यास दुध द्यावे. जेवणात दही-भात साखर घालून द्यावा आणि संध्याकाळी शिजवलेल्या गाजर किंवा बटाटा कुस्करून मऊसर करून द्यावे. ओट्स आणि केळीची लापशी जेवणात द्यावी आणि दिवसाचा शेवट परत मातेच्या दुधाने करावा.

बुधवार
आता त्याला काही विविध डाळीच डोसे घावन असं असे पदार्थ देण्यास हरकत नाही. परंतु पोटाला खूप जड होईल असे पदार्थ देऊ नये जसे ब्रेड, मैद्याचे पदार्थ सकाळचे स्तनपान झाल्यावर दुपारच्या जेवणात परत डाळ –खिचडी आणि संध्याकाळी एखादं फळ बारीक करून किंवा किसून द्यावे . रात्रीच्या जेवणात त्याला वरणात तूप घालून पोळी कुस्करून द्यावी किंवा कमी तिखट आमटी मध्ये पोळी कुस्करून खायला दिली तर त्याला आवडेल आणि झोपताना नियमितपणे स्तनपान करावे.


गुरुवार

सकाळी स्तनपान झाल्यावर न्याहारीसाठी त्यास नाचणी किंवा मुगाचे पीठ घालून डोसा बनवून द्यावा. न्याहारी आणि दुपारच्या जेवणात आईचे दुध द्यावे. जेवणात भातावर कमी तिखटाचे आमटी घालून द्यावे आणि संध्याकाळी नाश्ताला गाजराचे सूप भरवावे. रात्रीच्या जेवणात पिष्टमय पदार्थ, जसे पोळी आणि भात यांचा समावेश करावा. याचसोबत पातळ भाजीची सांगड घालावी. झोपण्यापूर्वी स्तनपान करावे.

शुक्रवार.  
नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर मातेचे दुध द्यावे आणि नाश्ता म्हणून गव्हाचे डोसे भरवावे. बाळाला आवडतील तसे मिश्र किंवा तांदळाचे डोसे अथवा इडली सकाळ-संध्याकाळ जेवणात द्यावी. संध्याकाळी सफरचंद बारीक किसून साखर मीठ घालून द्यावं आवडेल. न विसरता त्याला दोन जेवणामध्ये आणि झोपण्यापूर्वी स्तनपान द्यावे.

शनिवार.  
आठवड्याचा शेवट काहीतरी गोड जसं रव्याचा शिरा,मुगाचा शिरा,शेवयाची खीर अश्या पदार्थानी करा, त्याआधी स्तनपान द्यावे. दुपारी तूप-भात आणि सोबत उकडलेला अंड कुस्करून भरावा. आता बाळाला प्रथिने पचवण्याची शक्ती आलेली असते. संध्याकाळी सूप देऊन आणि रात्री त्याचा आवडता डोसा द्यावा. लक्षात ठेवा रात्रीच्या जेवणात पचायला हलके पदार्थ असावेत. रात्री झोपण्याआधी स्तनपान करावे.

रविवार.
सकाळचे स्तनपान झाल्यावर शिशूला रव्याचा उपमा खाऊ घाला. साळीचा भात रविवारी दुपारी जेवणात द्यायला हरकत नाही, परंतु त्यापूर्वी परत आईचे दुध जरूर दया. संध्याकाळी त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खायला दया. रात्री शेवयाचा उपमा आणि झोपण्यापूर्वी नेहमीप्रमाणे स्तनपान दया.

पाल्याचा आहारात पातळ पदार्थाचा समावेश असावा , काही कोरडे पदार्थ भरवू नये. तसेच त्याला भरवायचे अन्न व्यवस्थित बारीक करण्याचे विसरू नका त्याचा . ११ महीन्याचे होईपर्यंत जरी त्याचे बरेचसे दात आलेले असतात तरीही छोटे छोटे घास भरवणे, आणि कुस्करून खाऊ घालणे कधीही चांगले, जेणेकरून अन्न घशात अडकणार नाही. तेवढी काळजी घ्या.
तुम्हाला पालकत्वासाठी खूप खूप शुभेच्छा !

 

Leave a Reply

%d bloggers like this: