aanandi-vaivaheek-jivanasatheeche-sath-marg

 

तुम्हाला असं जाणवलं  आहे का कि तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा प्रेमात पडला आहात.ज्यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला पाहत त्या वेळी तुमच्या मनात खूप प्रेम दाटून येते,  आणि असं  वाटतं कि त्याच्याशिवाय/तिच्याशिवाय जगणं  कठीण आहे असं असेल तर छानच आहे. याचा अर्थ असा होतो की तुमच्या जोडीदारावर तुमचं खूप प्रेम आणि त्याच्याशिवाय /तिच्याशिवाय राहू शकत नाहीत.  

पण काही असे प्रसंग येतात आणि तुम्हाला असे वाटायला लागते की, लग्न करून आपण खूप मोठी चूक केली आहे. पण ही गोष्ट पूर्णतः सत्य नसते. त्यावेळच्या परिस्थिती वरची त्या व्यक्तीची ती प्रतिक्रिया असते आणि ती क्षणिक थोड्या वेळापूर्ती असते.

अशी परिस्थिती आल्यावर किंवा येऊ नये म्हणून काय करावे  यासाठी काही रहस्ये सांगणार आहोत.

  

१) अपेक्षा मनात ठेऊ नका

 

तुम्हाला जोडीदाराकडून काही अपेक्षा असतील त्या लगेच सांगा, त्या तुम्ही मनातच राहू देऊ नका. त्याच्याने गैरसमज दूर होतील व नात्यात मनमोकळेपणा राहील. हा सगळ्यात छान उपाय आहे, एकमेकांना समजून घेण्याचा.

२) तडजोड मान्य करा

तुमच्या स्वभावात बदल स्वीकारत जा त्यामुळे तुमच्या नात्यात सकारात्मकता निर्माण होईल. तुमचा स्वतःचा मतबद्धल हट्टीपणा सोडून बदलाचा स्वीकार करा. शक्य झाल्यास नात्यामध्ये अहंकार बाजूलाच ठेवा.  

३) बिनधास्तपणा आणि नावीन्य

तुम्हाला एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त करा. दोघंच असताना कोणत्या गोष्टीवर बोलावसं वाटल्यास बिनधास्त बोला. असे काही गोष्टी ज्या दोघांना बोलायला आवडता नात्याविषयी नवीन गोष्टी जाणून घ्या. त्या अमलात आणा.

४) एकेमकांची ध्येयं जाणून घ्या. 

स्वप्ने, आकांक्षा, ध्येयाबाबतीत एकमेकांशी चर्चा करा, भविष्याविषयी काय नियोजन आहे याही गोष्टी बोलत रहा. लग्नाच्या जोडीदारांना संसाराच्या गोष्टीसोबत वैयक्तिक जीवनाबाबतही एकत्रित बोलायला हवे. वाटल्यास तुम्ही पालक म्हणून काय इछ्या आहेत त्याविषयी बोलता रहा. याच्याने जोडीदाराचे विचार समजून नाते दृढ होऊन प्रेम गहिरे होते.

५) मुलांची आवड

तुम्हाला लहान मुलं आवडत असतील , लवकरच मुलाचे प्लॅनींग करा कारण बाळ घरात आल्यानंतर तुमचे  नाते आणखीच घट्ट होऊन एकमेकांची काळजी घ्यायला लागतात.  

६) संवाद साधत रहा

संवाद करणे म्हणजे नाते परिपकव  करणे होय. संवाद केल्याने मनात राहिलेल्या गोष्टी येऊन त्याबद्धल गैरसमज दूर होऊन, नाते हेल्थी होते. काही गोष्टीबाबत वेगवेगळी मतं असतील त्याबाबत वाद व चर्चा घडून एका मतावर येत येते.

७) प्रेम व्यक्त करा

जोडीदाराबाबत प्रेम व्यक्त करायला हवे. १०० वेळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो/करते  असे सांगणे म्हणजे प्रेम व्यक्त करणे नव्हे. तर लहान – लहान गोष्टीतून प्रेम व्यक्त करणे. एकमेकाच्या आवडत्या गोष्टी करणे एकमेकां मदत करणे. अचानक एखादा आवडत्या ठिकाणी जायचा प्रयत्न करणे. 

Leave a Reply

%d bloggers like this: