5vyayam-prakar-jymuele-prasutinatar-stan-purvat-honyas-madat-hote

 गरोदरपणात व प्रसूतीनंतर स्त्रीच्या हार्मोनमध्ये बदल घडून येतात. त्यामुळे शरीराच्या विविध भागावर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामध्ये वजन वाढणे स्तनाचे आकार वाढणे. ज्यावेळी बाळाला स्तनपान देणे बंद होते त्यावेळी सुद्धा स्तनाच्या आकारात आणि ठेवणी मध्ये बदल होतो.  ह्या बदलामुळे स्तनाजवळची त्वचा नरम होऊन तुमचे स्तन खाली येतात. अश्यावेळी तुम्ही खालच्या उपायांनी याला प्रतिबंध करू शकता. त्यासाठी पाच  सहजगत्या होणारे व्यायामाचे प्रकार करावे लागतील. हे करताना इतर कोणत्या प्रकारचे आजार जसे पाठीचे दुखणे हाताचे दुखणे, मानेचा त्रास असे काही असेल तर हे उपाय करण्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

   १) पुश अप

पुश अप किंवा सूर्यनमस्कार घरी करू शकता. स्तनाच्या ह्या समस्येसाठी पुश अप खूप चांगला उपाय आहे. ह्याचा फायदा तुमच्या छातीला होतोच पण ह्यामुळे तुमचे खांदेसुद्धा भक्कम होतात. पण ह्या व्यायामाचा प्रकार करताना लक्षात घ्यावे की, प्रसूती होऊन  किती वेळ झाला आहे. ओल्या बाळंतपणात असा कोणताच व्यायाम करू नये. त्यासाठी प्रसूतीतज्ञला विचारून घ्यावे.

२) बेंच प्रेस

या व्यायामासाठी दोन डंबेल्स घ्यावी. पण नसतील तर दोन पाण्याच्या बाटल्या घ्याव्या. एका चटईवर किंवा बेंचवरती आडवे पडून दोन्ही हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन, पुढे :  तुमचे हात खांद्यापासून लांब घ्यावेत, आणि तेच हात परत छातीजवळ आणावेत. हा खूप साधा व हलका व्यायामाचा प्रकार आहे, ह्यामुळे काहीही विपरीत परिणाम होत नाही. आणि छाती साठी उत्तम व्यायाम आहे. सुरुवातीला पाण्याची बाटलीच घ्यावी.

३) डंबेल्स फ्लाय

हा प्रकारही बेंच प्रेस सारखाच आहे. पण ह्या वेळेला, हात छातीकडे घेण्याऐवजी छातीच्या वरच्या दिशेने घेऊन जा. त्यासाठी हातात डंबेल्स किंवा पाण्याची बाटली घेऊन चटईवर निजून घ्या, तुम्ही शक्य झाल्यास गुडघे वाकवू शकतात म्हणजे तुम्ही सोयीस्करपणे करू शकतात. आता, हातात डंबेल्स पकडून कोपरा वाकवून ९० अंशाचा कोन  करून खालून हात वरती घ्या. ह्या प्रकार करताना त्रास होईल पण लवकरच प्रगती होऊन फरक दिसायला लागेल.  

४) हात वर उचलणे

हा प्रकार योगासारखाच आहे, याला काही साधनेही लागत नाहीत. ताठ उभे रहा, खोल श्वास घ्या, हात बाजूला घेऊन हाताचे तळवे वरच्या दिशेने जाऊ द्या, ही अवस्था २० सेकंदापुरती ठेवून श्वास सोडून हात खाली घ्या. यामध्ये तुम्हाला जितकी सेकंद हात स्थिर ठेवता येईल तेवढा ठेवावा. ही क्रिया दिवसभरातुन १५ वेळा दररोज केल्यास लवकरच फरक दिसून येईल.

५) चेस्ट पास

ही क्रिया खूप मनोरंजक आहे, ह्या क्रियेचा परिणामही चांगला होतो. क्रिया करण्यासाठी, तुमच्या बाळाचा  रबरचा चेंडू घेऊन चटईवर निजून घ्या, पाठ ताठ ठेवा, एकत्रितरित्या दोन्ही हातात चेंडू घेऊन तो हात छातीवर ठेवा आणि त्या चेंडूला वरच्या दिशेने फेका ( खूप वर फेकू नका )  आणि वर गेलेल्या चेंडू हात ताठ ठेवून कॅच घ्या . हा प्रकार कठीण आहे पण सवयीने येईल. पुन्हा तसाच छातीवर चेंडू घेऊन परत तशीच क्रिया करा. दररोज दिवसातून १० वेळा करा.

लक्षात घ्या, ह्या व्यायामाच्या क्रिया अगोदर तुम्ही फिट आहात ना ? चेक करून घ्या.

Leave a Reply

%d bloggers like this: