balala-navin-padarth-khau-ghlnyache-5-upay


तुमच्या बाळाला आता आईच्या दुधाबरोबर बाकीचेही अन्न पदार्थ द्यायचे आहेत का ? पण तुम्ही गोंधळात आहात सुरुवात कशी करायची, कोणत्या नवीन मार्गानी बाळाला खाऊ घालता येईल? यासाठी आम्ही काही उपाय दिले आहे

१) बाळाचे लक्ष विचलीत होऊ देऊ नका

ज्यावेळी तुम्ही बाळाला नवीन अन्नपदार्थ देणार, त्यावेळी बाळाचे लक्ष विचलित होईल अशी कोणतीच गोष्ट होऊ देऊ नका. उदा. तुम्ही त्याला वाटी घेऊन चमच्याने खाऊ घालत असाल तर टी. व्ही चालू असेल तर ती बंद करा. मोबाईल जवळ असेल तर बाळ मोबाईलकडेच जाणार तेव्हा तोही बाजूला ठेवा.     बाळाला जशी भूक लागेल तसे खाऊ घाला म्हणजे त्याला समजेल, आपल्या जेवणाची वेळ झाली आहे.

२) वेगवगळ्या प्रकारच्या प्लेट

वेगवेगळ्या आकाराचा रंगीबेरंगी प्लेट मध्ये बाळाला भरावयाचा पदार्थ घ्या म्हणजे त्या प्लेटकडे आकर्षित होऊन बाळ त्यातल्या पदार्थाकडे आकर्षित होईल . बऱ्याच माता या बाळाला खूप नावीन्यपूर्वक कल्पनेने खाऊ घालत असतात. त्या गोष्टी तुम्हाला माहिती असतीलच.

३) खेळणी लपवा.

ही कल्पना थोडीशी त्रासदायक आहे, पण बाळाचे जेवणही महत्वाचे आहे. त्यासाठी त्याची सगळी खेळणी थोड्या कालावधीकरिता लपवून द्यायची. मग बाळ त्याची खेळणी शोधू लागतो, मग ज्यावेळी त्याला खाऊ घालायचे आहे तेव्हा हळूच   त्याची जेवणाची प्लेट काढून त्याला खाऊ घालायचे, बाळ विरोध करेल खाणार नाही पण त्याला अशी कल्पना द्या की, जोपर्यंत प्लेटमधील पदार्थ संपवत नाही तोपर्यंत खेळणी नाहीत. जर त्याला अशी सवय लागली तर बाळाच्या खाण्याची समस्या सुटलेच. प्रयत्न करून बघा.

४) पतीला खाऊ घाला

ह्या कल्पनेसाठी दोघे नवऱ्या – बायकोला प्रयत्न करावे लागतील. अगोदर तुम्ही तुमच्या नवऱ्यासमोर प्लेट ठेऊन स्वतःच्या हाताने नवऱ्याला खाऊ घालावे, समोर बाळ असेल तेही निराळ्याच जिज्ञासूपणाने पाहिल, मग नंतर तोही त्याच्या आईला खाऊ घालण्यासाठी रडेल. आणि तुमची कल्पना काम करेल.

५) थोडे नवीन  प्रयोग करत रहा

जर तुम्ही बाळाला फळाचा ज्यूस  देण्याचे सुरु करणार असाल तर त्याचा दुधाच्या बाटलीत ते ज्यूस द्या कारण तुम्ही जेव्हा त्याला ज्यूस देणार तेव्हा समजेल कि यात दूध नाही ज्यूस आहे. त्यावेळी  त्याला ज्यूस आवडत आहे की नाही हे कळेल. जर त्याला एखाद्या फळाची चव आवडलीच  तर बाळ पुन्हा ते घेईलच. आणि त्याचे आवडते फळ बनेल.

लक्षात असू द्या की, एखाद्या फळाची व खाद्यपदार्थंची अलर्जी असेल तर पुन्हा तो पदार्थ बाळाला देऊ नका.

Leave a Reply

%d bloggers like this: