दही आणि बटाट्याचा फेसपॅक
बटाट्या मध्ये असणारी जीवनसत्वे ही चेहऱ्याच्या त्वचेसाठी उपयुक्त असतात. हा पॅक तयार करण्यासाठी एक कच्चा बटाटा बारीक किसून घ्या. त्यात मध्यम आकारची अर्धी वाटी दही त्यात घाला. आणि ते मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या .आणि हे मिश्रण १५ ते २० मिनीटं चेहऱ्यावर राहू द्या . त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. असं एक आठवडाभर करा,आणि मग बघा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यचा त्वचेमध्ये नक्कीच फरक जाणवेल.
2. डाळीच्या/बेसनाच्या पिठाचा पॅक
हा पॅक बनवण्यासाठी एका वाटीत दोन चमचे डाळीचं पीठ /बेसन पीठ घ्या त्यात अर्धा लिंबू पिळा आणि २ चमचे दूध घाला. हे मिश्रण चांगलं मिक्स करा आणि हा पॅक चेहऱ्यावर आणि हाता पायाला लावा. १०-१५ मिनिट हा पॅक तसाच ठेवा आणि जसा हा पॅक वाळेल तसा थोड्याश्या पाण्याने पुन्हा ओला करून हळू-हळू चेहऱ्यावर मसाज करा नंतर २,४ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. डाळीचे पीठ हे त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत. या पॅकमुळे निस्तेज आणि मलूल झालेली त्वचा सतेज आणि प्रफुल्लीत होण्यास मदत होते.
चंदन आणि संत्र्याच्या सालीचा पॅक
एक चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा संत्र्याचा सालीची पावडर घ्या. या मिश्रणात थोडंसं दूध घाला. हे मिश्रण चांगले मिक्स करा.आणि चेहऱ्यावर आणि हाता पायांचा त्वचेला लावा. आणि हे मिश्रण १० -१५ मिनिट तसेच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. चंदन शरीरात थंडावा निर्माण करतं हे चेहऱ्यासाठी आणि निस्तेज त्वचेसाठी अमृतासारखे काम करतं. या लेपामुळे त्वचेला पुनरुज्जीवन मिळते. आणि जर उन्हामुळे त्वचा जर काळवंडली असेल तर त्यासाठी देखील उपयुक्त ठरतं
केळ आणि मध पॅक
हा पॅक तयार करण्यासाठी एक केळ कुस्करा आणि त्या अर्धा चमचा मध आणि आणि थोडासा दूध घाला. हे मिश्रण नीट मिक्स करा.त्याच मास्क चेहऱ्यावर १०-१५ मिनिट ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा . केळ हे त्वचा लवचिक आणि मऊ ठेवण्यास मदत करतं. तसेच त्वचेला सुरकुत्या पडू नये यासाठी उपयुक्त ठरते. आणि त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते.