julaya-mulanbabatchya-kahi-goshti

खूपच आनंदाची गोष्ट असते जेव्हा तुम्ही गरोदर असतात, आणि लवकरच एका बाळाला जन्म देणार असता. तुम्हाला जर जुळे झालीत तर तुमचा आनंदही द्विगुणीत होतो . जुळे होणं ही मजेशीर गोष्ट असतेकारण जुळे होणे ही, सहज घडणारी गोष्ट नाही. जुळ्या बाळांच्या गरजा पुरविणे म्हणजे तुमची परीक्षाच असते, कारण प्रत्येक वस्तू तुम्हाला दोन आणावी लागतात, व दोन्हींचा एकदम सांभाळ करणे म्हणजे दिव्यच. डायपर, कपडे, खाऊ घालणे, झोपवणे या सगळ्याच दोनदा कराव्या लागतात. पण तुमचे सुखही डबल होते. या ठिकाणी तुम्हाला जुळ्याविषयी काही तथ्ये सांगणार आहोत.  जुळ्यांना कसे चांगले ओळखता येईल

१) शारीरिक रचना

 

जुळ्यांच्या शारीरिक पैलूविषयी बघितले, दोन्हीचे जरी लिंग सामान असले, तरी दोन्हीचे स्वभाव विशेष गुण हे वेगवेगळे असतात. तीळ, जन्माच्या वेळच्या खुणा, आणि त्यांच्या डोळ्यांच्या आकार यांच्यावरून दोघांमध्ये फरक करता येतो. जुळे ही त्यांच्या डोक्याच्या आकारावरूनही ओळखता येतात,  दोघांचा जन्म कसा झाला त्यावरून त्यांच्या डोक्याच्या आकारात फरक पडतो.जुळ्यांवर लहानपणापासूनच विशेष लक्ष द्यावे जेणेकरून तुम्ही त्यांना जणू शकाल.

२) कपड्यावरून फरक ओळखायचा

तसे तर जुळे ही सारखेच  दिसतात पण जेव्हा त्यांना तुम्ही कपडे परिधान करतात, तेव्हा ती वेगवेगळी दिसतात. त्यासाठी पालकांनी जुळ्यांना वेगवेगळी कपडे घालायला दयावी. जेणेकरून तुम्ही गोंधळणार नाहीत.

३) काजळ लावायचे

तुमचे जुळी बाळ वेगवेगळी आहेत, हे लक्षात घ्या नाहीतर तुमच्याकडून त्यांच्यापैकी एखाद्या बाळाला दोन वेळा खायला दिले जाईल. यावरती एक मजेशीर उपाय, एका बाळाच्या पायाच्या नखावर बारीकशी नेलं पॉलिशची खून करून द्यावी. हाताच्या नखावर करू नका, कारण बाळ बोट तोंडात घेत असते. नाहीतर बऱ्याच स्त्रिया बाळाला कुणाची नजर लागू नये म्हणून काजळ डोक्याच्या माथ्यावर लावत असतात, हाही उपाय छान आहे.

४) जुळ्यांची व्यक्तिमत्व ओळखायचे

तुमच्या जुळ्यांचे व्यक्तिमत्व ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण जरी ती जुळी असली पण त्यांचे व्यक्तिमत्व भिन्न राहील. एक शांत असेल, तर दुसरा आगाऊ असू शकतो. म्हणून दोघांची व्यक्तिमत्व जाणण्याचा प्रयत्न करा.उदा. जर राम रात्रीच्या वेळेस शांत झोपत असेल, तर श्याम रात्रभर रडून त्रास देईल. आणि श्याम दिवसा झोपणार. असा फरक असतो. जसजशी ती मोठी होतात, तास फरक त्यांच्या वागण्यात व एकंदर व्यक्तिमत्वात दिसायला लागतो.   

Leave a Reply

%d bloggers like this: