tumchya-mulala-bhavand-asnyache-fayde

भावंडाचं जग हे एक वेगवेगळ्या भावनांनी गजबजलेले जग असतं. यामध्ये प्रेम, मज्जा, उत्सुकता, या सगळ्या गोष्टी असतात. आपल्या मुलाला एखादं  भावंडं असण्याने त्याची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत तर होतेच पण  भावंडं  असण्यचे त्याना भविष्यात जगात वावरताना बरेच फायदे होतात ते कोणते ते आपण पाहुया.

मिळून मिसळून वागण्याची सवय

आजकाल पालक आणि शिक्षकांची एक तक्रार असते कि मुलं त्याची खेळणी, त्यांच्या गोष्टी इतर मुलांना देत नाहीत किंवा ते त्या खेळ्ण्याशी एकत्र मिळून मिसळून खेळत नाही. आणि त्यामुळे बहुतांशी पालकांना लहान मुलांना मिळवून मिसळून वागणे आपली वस्तू दुसऱ्यांना  वापरायला देणे अश्या गोष्टी शिकवाव्या लागतात. परंतु ज्यांना भावंडं असते त्यांना या गोष्टी शिकवण्याची गरज लागत नाही.

टीम वर्क

ज्यावेळी तुमची मुलं एकत्र खेळतात त्यावेळी ती अजाणतेपणे एकमेकांबरोबर कसे काम करायचे शिकतात. एकत्रक काम करण्याची ही सवय त्यांना पुढील आयुष्यात खूप उपयोगी ठरते. तसेच एखादा खेळ खेळताना एकमेकांना पुढे जाण्यास कशी मदत करायची  या गोष्टीचा उपयोग देखील भविष्यात त्यांना होतो.

प्रेरणा आणि मार्गदर्शक

भावंडं ही फक्त खेळायला आणि भांडण करायला नसतात. तर ती एकमेकांसाठी मोठा आधार असतात . कदचित तुमच्या मुलांमधील मोठं मूल  हे तुमच्या लहान मुलासाठी एक खूप मोठी प्रेरणा आणि मार्गदर्शक ठरू शकतं. मोठ्या मुल स्वतःच्या चुका आणि अनुभव वरून  आपल्या भावंडाला पुढील धोक्यापासून सावध करेल. एकमेकांचे अनुभव चुका, यश यावरून या भावंडाना  एकमेकांकडून आयुष्यातील खूप मोठ्या गोष्टी शिकायला मिळतील तसेच दोघांचे यश एकमेकांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील.

सवंगडी

भावंडं असल्यामुळे तुमच्या मुलांना खेळायला, फिरायला, मस्ती करायला एक हक्काचा सवंगडी मिळेल. एवढेच नाही ते  त्यांना एकटेपण कधी जाणवणार नाही. लहान मुलांच्या वाढीच्या अभ्यासात असे दिसून आले आहे कि जर मुले एकमेकांबरोर वाढली, खेळली  तर त्याची वाढ अधिक  चांगल्या प्रकारे होते

आधार

भावंडं असण्यामुले लहानपणापासून एक आधार मिळतो जो आयुष्यभर साथ देतो. भावंडं ही सतत एकमेकांच्या पाठीशी उभी रहातात. खेळताना किंवा एखाद्या गोष्टीसाठी ते एकमेकांशी भांडतील पण तिसरं कुणी आलं  तर एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील. एक भावंडं जर रडत असेल तर दुसरं भावंडं त्याला रडू नको म्हणून समजवतो  असा आधार आई   वडिलांनंतर नंतर भावडंच देऊ शकतं

Leave a Reply

%d bloggers like this: