balache-dat-datanchi-wadh-prkar-arogya

 सुरवातीचे काही महिने तुमच्या बाळाने दूध, पातळ पदार्थ, पेज अश्या असे प्रकार खाऊन मजा केली. पण आता काही कडक कुरकुरीत खाण्याची वेळ आली आहे. आता त्याला हळू- हळू थोडेसे कडक /घन पदार्थ खाऊ घालण्याची घालण्याची वेळ आली आहे. कारण आता बाळाला हळू- हळू दात येणार आहेत. बाळाचे दात साधारणतः कधी आणि कसे येतात हे आता आपण जाणून घेणार आहोत

दातांची वाढ 

लहान बाळाच्या हिरड्या तयार होण्याची सुरवात बाळ पोटात असताना तीन महिन्याचा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ३ ते ६ महिन्याचा दरम्यान होते. म्हणजेच  बाळ ज्यावेळी जन्माला येते त्यावेळी त्याचा हिरड्यामध्ये ( तोंडामध्ये) २० दुधाचे दात वरती येण्यासाठी तयार असतात. हे दात बाळ ६ ते १२ महिन्याचे असताना हिरड्यांचे टिश्यू (उती ) पुढे ढकलून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागतात.

दुधाचे दात

लहान बाळाला साधारणतः सहाव्या महिन्यापासून दुधाचे दात यायला सुरवात होत. मुल दोन अडीच वर्षाचे होई पर्यंत दुधाचे पूर्ण दात येतात. हे दात मुलाच्या सहाव्या-सातव्या वर्ष पर्यंत टिकतात. वयाच्या सातव्या वर्षांनंतर हे दुधाचे दात पडायला  सुरवात होते. साधारणतः ९ व्या वर्षापर्यंत  हे सर्व दात पडतात. दुधाचे साधारण २० दात येतात.

कायमचे दात

साधारणत मुलाच्या वयाच्या सहाव्या वर्षा पासून मुलांना कायमचे दात यायला सुरवात होते. सुरवातीला दाढा यायला सुरवात होते. या दाढा येत असताना दुधाचे दात पडायला सुरवात झाली नसते किंवा नुकतीच पडायला सुरवात झाली असते. त्यामुळे या दाढा दुधाच्याच आहेत असा पालकांचा समज होतो. यानंतर मुलच्या वयाच्या ८व्या ९व्या वर्षी वरच्या भागातील पुढचे दात येण्यास सुरवात होते. वयाच्या १२ ते १६  वर्षापर्यंत मुलाला २८ दात येतात. त्यानंतर अक्कलदाढा येतात.या अक्कलदाढा जबड्याच्या म्हणजे तोंडात एकदम मागच्या भागात येतात  अक्कलदाढ येण्याचा ठराविक असा काळ नसतो. अक्कल दाढ येताना काही वेळा त्रास होतो काही जणांना अक्कलदाढ येत देखील नाही.

दातांची काळजी

दातांची काळजी घेणे गरजेचे असते कारण पोटात जाणारा पदार्थ दाताने चावून त्यात लाळ  मिसळून पोटात जाणे गरजेचे असते. त्यासाठी दाताचे आरोग्य सांभाळणे गरजेचे असते. दात दुधाचे असो किंवा कायमचे दातांची योग्य त्या प्रकारे काळजी घेतली गेली नाही की  दात किडतात आणि त्याचे परिणाम पूर्ण शरीरावर होतो. दात स्वच्छ न ठेवल्यास दाताच्या फटींमध्ये अन्नाचे कण अडकतात आणि दात किडतात  आणि दात ठिसूळ होतात आणि त्याचे आवरण निघायला लागते आणि थंड आणि गरम खाल्यावर दातांना ठणका लागतो. बाळ लहान असल्यापासूनच दातांची काळजी घेणं गरजेचे आहे त्यामुळे भविष्यात दातांच्या विकार होत नाही.

 

Leave a Reply

%d bloggers like this: