balachya-annpadarthatun-food-elarji-kashi-olakhavi

 

 

बाळासाठी नवीन पदार्थांची आई वाटच पाहत असते. जास्त पोषक घटक असलेली पदार्थ द्यायला मिळाले तर आईला आनंदच असतो. पण बऱ्याच मातांना त्या अन्नपदार्थाची बाळाला काही एलर्जी होईल अशी भीतीही असते. आणि तसे बाळाच्या बाबत होते. तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत की, एलर्जी कशी ओळखायची आणि बाळाला कसे निरोगी ठेवता येईल.  

१) एलर्जी व रोगप्रतिकार प्रणाली

एखादा पदार्थ खाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून बाळाला त्रास व्हायला लागलाच तर बाळाची  रोगप्रतिकार प्रणाली  त्याला विरोध करण्यासाठी अँटीबॅडिज(antibodies) तयार करू लागते जेणेकरून भविष्यात असा संसर्ग बाळाला होणार नाही. बऱ्याच वेळा पालक सुद्धा गोंधळात पडतात नेमकी फूड एलर्जी काय करते.

ऍलर्जीची लक्षणे

खाल्यानंतर जर तुमच्या बाळाला काही त्रास जाणवत असेल, आणि तोही काही तासानंतर दिसायला लागला तर ऍलर्जी असू शकते. या ठिकणी काही लक्षणे सांगत आहोत,  तशी ऍलर्जी अनेक प्रकारची असते.

१. पुरळ उठणे, नाकाच्या आजूबाजूला आग -आग  होणे, तसेच तोंड व डोळ्याच्या बाजूला लालसरपणा येऊन आग होणे

२. दम्यासारखा आवाज काढणे

३. आतड्याचा दाह

४. थोडीशी सूज ओठावर, डोळ्यावर आणि  चेहऱ्यावर येते

५. वाहणारे किंवा बंद नाक, आणि डोळे पाणावतात

६. घसा खवखवणे, बऱ्याच केसेस मध्ये जीभ व घसा सुजतो.

७. उलट्या व अतिसार

८. काहीवेळा अचानक रक्तदाब कमी होतो

 

ऍलर्जीचा प्रतिक्रियेच्या वेळानुसार प्रकार

 

१. ऍलर्जीची तात्काळ दिसून येणारी लक्षणे (Immediate Allergic Reaction)

 

बाळाच्या ऍलर्जिक पदार्थच्या खाण्याने लगेच तासाभरातच काही ऍलर्जिक प्रतिक्रिया यायला लागतात, जसे की,नॉर्मल पुरळपासून ते गंभीर प्रकारचे फोड आणि लक्षणे, हे धोकादायक असते. जर तुम्हाला किंवा तुमच्या नवऱ्याला अस्थमा, इसबची ऍलर्जी असेल तर बाळालाही ऍलर्जी होऊ शकते. पण हे  बाळाला लागू होईल असे नाही.

 

२.उशिराने दिसून येणारी लक्षणे ( Delayed Allergic Response)

ह्या प्रकारच्या ऍलर्जीच्या  प्रतिक्रिया ओळखणे कठीण असते, कारण याची लक्षणे तासाभरात किंवा काही दिवसातही दिसत नाही. लक्षणे तशी प्रत्यक्षपणे विकसितही होताना दिसत नाही.

३. ऍनाफिलेक्सिस (अतिसंवेदनशील

सगळयात तीव्र अलर्जी असते  तर ती  म्हणजे, Anaphylaxis ह्याबाबत खूप माता काळजीत असतात.

प्रतिक्रियेचा प्रकार १

ह्या प्रकाराने बाळाची रोग प्रतिकार प्रणालीवर तीव्र प्रतिक्रिया घडून मोठ्या प्रमाणात रक्त पेशी वाढवणारे द्रव्य तयार होऊ लागते व काही रसायने. ह्यामुळे पूर्ण शरीर शॉक मध्ये जाऊ शकते. असे असले तरी, दुसरेही काही लक्षणे यात आढळून येतात.

१. नाडीचे स्पंदन जलद होणे

२. चक्कर येऊन बेशुद्धावस्थेत जाणे

३. दरदरून घाम येणे

४. त्वचा, चेहरा व ओठावर सूज येणे

५. मळमळणे, उलट्या , अतिसार होणे

६. त्वचा पांढरट होणे

पण घाबरण्याचे कारण नाही, कारण ह्या प्रकारची ऍलर्जी खूप दुर्मिळ आहे. पण काळजी घेणे कधीही चांगले

 

ऍलर्जी न होण्यासाठी व तसे अन्नपदार्थही ओळखण्यासाठी, खाली दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळू शकता.

 

१. जो पर्यंत तुमचा बाळ सहा महिन्याचा होत नाही तोपर्यँत बाळाला आईच्या दुधाशिवाय काही देऊ नका. कारण त्याची रोगप्रतिकार प्रणाली  अजून भक्कम झालेली नसते.

२. जर नवीन पदार्थ देत असाल तर चेक करत रहा त्याचा काही बाळावर परिणाम होत नाहीये ना . म्हणजे तुम्हालाही ऍलर्जी शोधणे सोपे होईल.

३. अंडी, नट्स, आमलयुक्त पदार्थ बाळाला देऊ नका. त्यामुळे बाळाला ऍलर्जीकी प्रतिक्रिया ( reaction) होईल.

४. जर तुम्हाला काही अन्नाबाबत शंका असेल तर डॉक्टरांशी बोलून घ्या.

Leave a Reply

%d bloggers like this: