he-padarth-lahan-mulana-dene-talave

तुमचं मुल आता तुमच्या ताटातलं ओढून खाण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला पण त्याला नव-नवीन चवी चाखवण्याची घाई झाली असेल. पण तुमच्यासाठी योग्य असणारा पदार्थ तुमच्या बाळासाठी पण योग्य असेलच असे नाही. म्हणून आम्ही काही पदार्थीची यादी पुढे देत आहोत. त्यातले पदार्थ लहान मुलांना देणे टाळावे.

टीप :पुढील यादीत देण्यात आलेल्या पदार्थामुळे बहुतांशी लहान मुलांच्या आरोग्यवर काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून देण्यात आले आहेत तरी त्याला काही अपवाद असू शकतात . एखाद्या पदार्थाचा  आरोग्यवर विपरीत परिणाम होणे म्हणजे त्या पदार्थाची ऍलर्जी असणे असा अर्थ होत नाही.

१) कच्चे दुध 

कच्चे दूध हे लहान मुलांना पचण्यास जाड असते. त्यामुळे लहान मुलांचे पोट  बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना ज्यावेळी वरचे दूध द्याल त्यावेळी ते उकळून, कोमट करून द्यावे. कच्या दुधापेक्षा प्रक्रिया केलेले दूध लहान बाळांना पचण्यास त्या मानाने हलके असते.

२) कठीण कवचाची फळे /पदार्थ ,दाणे 

सगळ्या प्रकारची कठीण कवचाची फळे किंवा पदार्थ लहान मुलांना चावता येत नाही आणि ती तसंच  गिळण्याचा प्रयत्न करतात. आणि ती त्याच घश्यात अडकण्याची शक्यता जास्त असते. ४ वर्षाच्या आतील लहान मुलांना असे कठीण कवचाच फळे देणे टाळावे- अक्रोड, शेंगदाणे ,बदाम,मोठी बोरं.

३)  मासे 

साधारणतः एक वर्षाच्या आतील लहान मुलांना कडक आवरण असणारे मासे, कोलंबी ,खेकडे,असे  प्रकार खायला घालू नये. तसेच इतर प्रकारचे मासे खायला देत असताना त्याची आई किंवा वडलांना ऍलर्जी तर नाही ना आणि असेल तर ते बाळाला देण्या आधी  त्या बाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

४)अंड्याचा पांढरा भाग कडक 

बहुतेक आहारतज्ज्ञ लहान मुलांना बहुतेक पदार्थ उकडून मऊ करून खाऊ घाला असा सल्ला देतात. परंतु  त्यात उकडलेले अंड  बाळाला देताना त्याचा कोणता भाग बाळास उपयुक्त असतो हे डॉक्टरकडून जाणून घ्या. साधारणतः अंड्याचा पांढरा भाग खाणे टाळावे असे डॉक्टर सांगतात तरी तुमच्या बाळाच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.आणि ज्यावेळी ऊकड्ले अंड बाळाला भरावाल  त्यावेळी खात्री करून घाई कि अंड व्यवस्थित उकडलेले असेल.

५) कच्च्या भाज्या

खूप कडक आणि कच्च्या भाज्या लहान मुलांना देणे टाळावे एकत्र त्यामुळे लहान मुलांना चावता येत नाही म्हणून तश्याच गिळतात आणि त्यामुळे घश्यात अडकण्याचा धोका असतो किंवा कच्चा भाज्या पचवणं त्यांना कठीण असत म्हणून पोट  दुखू शकतं

६) ब्रेड आणि ब्रेडचे पदार्थ/मैद्याचे पदार्थ

ब्रेड आणि ब्रेडचे पदार्थ आणि मैदा पचवणे लहान मुलांना जड जाते. आणि आत्ता त्याचे दुष्परिणाम जाणवले नाही तरी भविष्यात पचनाच्या तक्रारी उद्भवू  शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: