navin-palkansathi-bharttil-kahi-parytansthle

 

     बाळ आता १०- ११ महिन्याचं झालं आहे. आणि तुम्ही एक ब्रेक घेऊन सुट्टीवर जाण्याच्या विचारात आहात  का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमचा विचार योग्य आहे. गेल्या काही महिन्यात बाळाची काळजी, तुमची तब्बेत, तुमचं काम, घरच्या जबाबदाऱ्या, या सगळ्यातून एक ब्रेक घ्यावास वाटणे साहजिक आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रसन्न आणि शांत वाटेल. आणि तुमच्या बाळाला पण दुसऱ्या ठिकाणाची ओळख होईल नवीन वातावरण,नवीन जागा, असा हवाबदल बाळासाठी त्याची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. परंतु बाळ किंवा तुम्ही नुकत्याच कोणत्या आजारातून बऱ्या झाला असाल तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय बेत आखू नका.

चला तर मग सुट्टी टाका आणि आत्ताच तिकिटं बुक करा, पण थांबा तुम्ही जाणार कुठे, असा बेत आखताना तुम्हांला आता हे लक्षात घेतलं पाहिजे,की आता आपल्याबरोबर एक छोटंसं बाळ  असणार आहे. त्यानुसार ठिकाण निवडा. आम्ही तुम्हाला काही अशी ठिकाण सुचवणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्हाला आणि तुमच्या एक वर्षा-  पर्यंतच्या  बाळाला घेऊन जाऊ शकता

  १) उटी

 तामिळनाडू राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून  उटी  ओळखले जाते. हे नंदानवनापेक्षा कमी नाही जर तुम्ही या आधी तिकडे जाऊन आला असाल तर तुम्हाला त्याबद्दल  माहिती असेलच,आम्ही त्या जागेला नंदनवन  का म्हणत आहोत. येथील  अमाप असे निसर्ग सौंदर्य, चहुबाजूंनी दाटलेली हिरवळ, देवदार वृक्षाने सजलेली वनराई मन प्रसन्न  करते. येथील तापमान वर्षभर ५ ते २५ अंश इतकेच  म्हणजे अति थंड ते माध्यम थंड असे असते. त्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला थंड ठिकाणी जायचं नसेल तर तुम्ही  उन्हाळ्यात या ठिकाणी जाऊ शकता.  उटी मधली हॉटेलं ही मुलाच्या दृष्टीने बऱ्यापैकी सुसज्ज आहेत. आणि तुम्ही जर उटीला गेलात तर तिकडच्या बॉटनिकल गार्डन, लहान  मुलांसाठीचे आकर्षण चिलून पार्क, तसेच कालहट्टी धबधबा, उटी संग्रहालय, या ठिकाणांना भेट दयायला विसरू नका  

२) केरळ मधील टेक्कडी

या ठिकाणच्या यादी मध्ये हे स्थळ देण्याचे खास कारण आहे. हे ठिकाण लहान मुलांना आकर्षित करणारे आहे . येथील पेरियार वन्यजीव अभयारण्य. इथे तुम्हाला आणि तुमच्या मुलाला, विविध प्राणी ,पक्षी, झाडे फुले आणि तर वन्यजीव प्रत्यक्ष वावरताना बघायला मिळतील. तसेच इकडच्या हत्तीशी तुमच्या मुलाला खेळायला देखील मिळेल. परंतु या ठिकाणी जाताना तिकडचा मार्गदर्शक  बरोबर असल्या शिवाय आत जाणे हे धोक्याचं आहे त्यामुळे ती काळजी घ्यावी

३) अनंतगिरी पर्वतरांगा

हे ठिकाण तेलंगणामध्ये आहे आणि हे हैद्राबाद वरून साधारतः २ तासाच्या अंतरावर आहे. इकडची सुंदर  हिरवळ आणि निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकते. तसेच इकडचे धबधबे तुम्हाला तुमचे ताण  विसरायला लावतात आणि मन शांत करतात. आणि महत्वाची  गोष्ट म्हणजे हे ठिकाण आर्थिकदृष्ट्या देखील इतर ठिकाणांपेक्षा स्वस्त आहे. तसेच इतर पर्यटन स्थळांपेक्षा इकडे  पर्यटकांची वर्दळ देखील कमी असते. त्यामुळे शांतात आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी या  ठिकाणाची निवड योग्य ठरेल .

४) दार्जिलिंग जैसलमेर 

थंड वातावरण, चहाचे मळे आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी दार्जिलिंग प्रसिद्ध आहे. केबल कार , टॉय  ट्रेन  हिरवळ,चहाचे मळे  या ठिकाणच्या या गोष्टी आकर्षित करतात. तसेच काही संग्रहालय देखील पाहण्यासारखी आहेत. दार्जिलिंगला जाण्यासाठी जर तुम्ही विमानाने जात असाल तर  तुम्हाला बागदोगरा येथील विमानतळावर उतरून २ गाडीचा प्रवास करून दार्जिलिंग ला पोहचता येईल. आणि दार्जिलिंग पासून जवळचे रेल्वे स्टेशन  जलपाईगुडी हे आहे. आणि याशिवाय टॉय ट्रेन ने जलपैगुडी ते दार्जिलींग  जात येते तसेच( ७-८ तास प्रवास) आणि जर तुम्ही गाडी करून जायचा विचार करत असाल तर सिलिगुडी वरून २ तासाच्या अंतरावर दार्जिलिंग आहे

५)  जैसलमेर 
हे तलावांचे राजेशाही शहर  जे गोल्डन सिटी म्हणून देखील ओळखले जाते हे  ठिकाण तुमच्या साठी योग्य आहे.  या ठिकाणी जाण्यासाठी साधारण सप्टेंबर ते जानेवारी हा काळ योग्य असतो. उन्हाळ्यात या ठिकाणी जाणे टाळा. इकडे वाळवंट असला तरी इकडची जैनमंदिर,राजेशाही थाट, की जैसलमेर फोर्ट हे  अनुभवण्यासारखे आहे. तुमच्या मुलाला इकडे उंटावर बसण्याचा अनुभव तुम्ही देऊ शकता

ही सर्व ठिकाणे लहान मुलांच्या दृष्टीने सुसज्ज अशी आहेत. तरी प्रवासाला निघताना  एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. मुलाला कोणते ठिकाण योग्य ठरेल याचा अंदाज घ्यावा. सर्दी-खोकला पडसं  अश्यासाठी काही औषधे बरोबर असु द्यावी. थंड हवेच्या ठिकाणी जाताना बाळासाठी गरम कपडे आणि जास्तीचे कपड्याचे जोड बरोबर असु  द्यावे. यामुळे तुमचा प्रवास आणि तुमची ट्रिप अधिक सुखकर होईल

Leave a Reply

%d bloggers like this: