nalechya-urvarit-bhag-ambilikal-stamp-swachh-karanyasarhiche-upay

 

 तुम्ही ज्यावेळी बाळाला जन्म देतात, त्यावेळी आयुष्याची नवीनच सुरुवात करतात. तुम्ही नव्या आई झाल्यावर तुम्हाला मग काकू, मावशी, व आईकडून ‘ज्ञान’ मिळायला लागते. त्यांच्या अनुभवाचे ज्ञान ही महत्वाचे आहेच. बाळाचा मूड, त्याची झोपण्याची तऱ्हा, त्याची प्रकृती आणि त्याची नाळ कापल्यानंतर उरलेला भाग,  नाळ कापल्यानंतरचा भाग तसाच असतो. जो नंतर काही दिवसाने आपोआप गळून पडतो. परंतु तो गळून पडे पर्यंत त्याची काळजी घेणे गरजेचे असते. या नाळेचा उर्वरित भागाला अँम्बीलिकल स्टंम्प  असे म्हणतात अँम्बीलिकल स्टंम्प पोटावर असताना, बाळाची स्वच्छता करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी.  हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) स्पंज बाथ

बाळ सतत शी – शु करत असते त्यामुळे त्याला सतत स्वच्छ करावे लागते. स्वच्छ करताना प्रत्येक वेळी अंघोळ घालण्यापेक्षा  स्पंज बाथ द्यावा. ह्या प्रकाराने बाळ स्वच्छ राहतेच आणि बाळाच्या अँम्बीलिकल स्टंम्पला ओलावा लागत नाही आणि धक्का लागत नाही .

स्पंज बाथ कसा  द्यावा

१. खोलगट भांडे घ्या / तर बाजूला कोमट पाणी बाजूला घेऊन ठेवा

२. मेडिकल स्पंजने किंवा /ओलसर कॉटनच्या कपड्याने बाळाला पुसा

३. चेहऱ्याला साबण लावू नका, ऍलर्जी असेल तर

४. पुसताना चेहऱ्यापासून सुरुवात करून खाली पायाकडे जावे

५. नाळेजवळ काळजीने पुसा. आणि तो भाग नेहमी स्वच्छ ठेवायचा, बॅक्टरीयाची समस्या राहणार नाही.

२) अंघोळ

काही तान्ह्या बाळांची, अँम्बीलिकल स्टंम्प लवकर गळून पडते आणि लवकर बरीही होते. पण काही बाळांना २-३ आठवडे लागतात. तेव्हा जर बाळाचा नाळेचा उर्वरित भाग ( अँम्बीलिकल स्टंम्प ) बरा झाला असेल तर  डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही सौम्य साबणाने व कोमट पाण्याने त्याची अंघोळ करू शकतात.  

३) अँम्बीलिकल स्टंम्प कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा

अँम्बीलिकल स्टंम्पला कोरडेच ठेवण्याचा प्रयत्न करा. जर ते ओले राहिले तर संसर्ग होण्याची शक्यता असते . त्यासाठी वाटल्यास अँटी-बॅक्टरील पावडर लावा, आणि नाळेच्या जागेवर कपडे गुंडाळून ठेऊ नका, त्याला हवा लागू द्या. गरम दिवसात, बाळाला गारवा असलेल्या खोलीत ठेवा. 

 ४) मऊ रुमालाचा वापर कर

 बाळाची अंघोळ झाल्यावर बाळाला पुसण्यासाठी मऊ कापडाचा वापर करा. अँम्बीलिकल स्टंम्पची जागा नेहमी कोरडी राहील असे बघा . वाटल्यास थोडेशी ऍण्टीफंगल पावडर स्टंम्पच्या  आसपास लावा

 ५) अँम्बीलिकल स्टंम्प आपोआप पडू द्या

अँम्बीलिकल स्टंम्प म्हणजे नाळ कापल्यानंतर पोटावर उरलेले नाळेचा भाग तो  वाळून अपोआप पडून जातो. वाळलेला दिसल्यावर तो भाग ओडून काढायचा प्रयत्न करू नका. असे केल्यामुळे मोठ्या समस्येला आमंत्रण द्याल.

Leave a Reply

%d bloggers like this: