navin-palakansamoril-pach-aavhane-aani-tyache-upay

 

 

पालकत्वाची भूमिका म्हणजे आनंदाचा प्रवास. बाळ येण्याने त्या जोडप्याचे जीवनच बदलत असते. त्यांच्या जीवनात आनंद, उल्हास, सुख येते. आणि हा आनंद कायम त्याचा आसपास बागडणार असतो. बाळ पालकांचे जीवन बदलून टाकतात. पण या आनंदबरोबर काही जबाबदाऱ्या येत असतात खरं म्हणजे, त्याचे पालन पोषण करणे ही गोष्ट करायची असतेच, पण त्या सोबत नात्यातही काही समस्यांना तोंड द्यावे लागते.  

नवीन पालकांना नव्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते आणि त्या समस्या ते कश्याप्रकारे हाताळतात

१) संवादात येणारे अंतर

बाळाला अंघोळ घालणे, खाऊ घालणे, ह्यातच दोन्ही पालकांचा  दिवसातला बराचसा वेळ जातो. त्यामुळे मग दोघांना एकत्रित रित्या वेळ मिळत नाही. त्यावरती लक्ष व काळजी घ्यावीच लागते. पती- पत्नीला दोघांना खूप कमी वेळ मिळतो आणि त्यात ती त्यांचे दुःख, भावना, सुख, असुरक्षितता असे काहीच सांगता येत नाही. मग त्यात बाळाच्या गमतीशीर प्रसंग का असेना. हे संवादातील अंतर वाढत जाते  आणि काही वेळा ह्यामुळे काही वेळा भांडणे देखील होतात. त्यामुळे थोडासा वेळ काढून बाळाच्या जन्माअगोदरच्या आठवणी एकमेकांना सांगा. दिवसभरात वेळात-वेळ काढून थोडा वेळ जोडीदाराला दिवस कसा गेला हे विचार,  एकमेकांशी गप्पा मारा, बाळाने केलेल्या गमती-जमती एकमेकांना सांगा

२) बाळ दोघांचे आहे

तुमचे बाळ हे तुमच्यासाठी खास असते, तुम्ही त्याच्यावरती जीवापाड प्रेम करता. तसेच तुमचा जोडीदार पण त्याच्यावर तेवढंच प्रेम करत तेव्हा लक्षात असू द्या की, जेव्हा तुमचा जोडीदार बाळाच्या बाबतीत काहीतरी सूचना देतो, तेव्हा तुम्हाला त्याचा रागही किंवा कधी कधी त्या गोष्टी पटत देखील नाही एक गोष्ट लक्षात घ्या, बाळ दोघांचे आहे म्हणून एकमेकांना समजून त्याचे संगोपन करा.

३) जागरणाच्या रात्री

नवीन पालकांसाठी कमी झोप हे खूपच मोठं आव्हान असते. कमी झोप ही गोष्ट खूप त्रासदायक व चीड – चीड करवणारी गोष्ट आहे. त्यासाठी व्यवस्थित झोप घ्या, बाळ केव्हाही रडते म्हणून आलटून पालटून- पालकांनी झोप घ्यावी. या काळात स्त्रीला जास्त आरामाची गरज असते म्हणून काही जबाबदारी बाळाच्या बाबांनी  स्वतःहून उचलावी

४) रोमान्सला ब्रेक

नवीन बाळ येण्याने तुमचे समागम मध्ये थोडासा अडथळा येतो. बाळ बाजूलाच झोपले असेल तर तुम्हाला समागमाचा विचारही येत नाही. ज्यावेळी दोघांच्या इच्छेने तुम्ही रोमँटिक मूडमध्ये असतात तेव्हाच बाळ रडायला लागते, मग त्यानंतर दोघांचा मूड जातो. खरं म्हणजे समागम सुद्धा महत्वाचे आहे दोघांचे नाते  घट्ट होण्यासाठी, काही वाद झालेही असतील तर ती ह्या वेळेला जुळतात, जर जमलेस तर बाळ शांत व गाढ झोपल्यावर या गोष्टी करा.

५) काम आणि पालकत्वाची  जबाबदारी याचा  समतोल

बाळासाठी थोड्याशा कालावधीकरिता तुमच्या करियरला ब्रेक लागतो. बऱ्याच माता बाळाच्या जन्म झाल्यावर आपले करियर कायमचे थांबवतात. तसेच सुरवातीच्या काळात बाळ  आणि काम याचा समतोल साधणे अवघड जाते. त्यामुळे थोडा ब्रेक घ्या किंवा घरून काम करणे गरजेचेच काम करण्याचा पर्याय निवडा. कारण करियर बरोबर आपले आरोग्य देखील महत्वाचे असते. मॅटर्निटी सुट्यांचा उपयोग करून पूर्ण वेळ बाळासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी देण्याचा प्रयत्न करा. या काळात बाळाच्या वडलांवर आर्थिक आणि सर्वच प्रकराची जबाबदारी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी शांतपणे हाताळा चीड चीड करून  स्वतःला आणि कुटूंबाला त्रास करून घेऊ नका.

 

Leave a Reply

%d bloggers like this: