stanpanababat-pach-chukichya-samjuti-tya-tumhi-thambavaylya-havyat

 

भारतीय समाजात बऱ्याच नाजूक गोष्टी सार्वजनिकपणाने बोलल्या जात नाहीत. त्यामध्ये मासिक पाळी किंवा बाळाचे स्तनपान. स्तनपानबाबत काही चुकीचे समज आजही मानले जातात. ही गोष्ट हास्यापद आहेत का गंभीर? या समजाबाबत खूप माता गोंधळलेल्या असतात, त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा का असा त्यांना प्रश्न पडतो. या ठिकाणी स्तनपानाबाबत काही समजुती अजूनही आहेत त्याबद्धल विश्लेषण केले आहे, आणि त्या समजुतीवर विश्वास ठेवणे बंद करायला हवे.

१) स्तनाचा आकार लहान असेल तर  दूध कमी येते

हे १०० टक्के चुकीचे आहे. स्तनाचा टिश्यू हा गरोदरपणाच्या दरम्यान स्तनपानासाठी  दूध वाढवण्याचे कार्य करत असतो. तुमच्या दुधाच्या वाहिनीमध्ये हा फॅटी टिश्यू नसतो, हा स्तनाचा आकार वाढवण्यासाठी जबाबदार असतो. ते अगोदरच विकसित झालेले असतात. तुमचे स्तन लहान आहेत म्हणून स्तनाला दूध कमी येत असेल असा विचार करू नका. ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष करून बाळाला स्तनपान करत रहा.   

२) शस्त्रक्रियामुळे अंगावरच्या दुधावर परिणाम होतो ?

हे खरे नाहीच, ज्या स्त्रियांनी स्तनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यांना स्तनपान करता येत नाही. पण बऱ्याचदा तुम्ही कोणती शस्त्रक्रिया केली आहे त्यावर ते अवलंबून असते. बऱ्याच स्तन वाढण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये काखेजवळ सिलिकॉन कप ठेवतात. तेव्हा त्याचा दुधाच्या वाहिनीवर वर परिणाम होत नाही. म्हणजे दूध कमी होण्याची कोणतीच शक्यता नसते. पण जर एखाद्या स्त्रीने स्तनाग्र काढून आणि पुनः शस्त्रक्रिया करून पूर्वंस्तिथीत स्तनाग्र आणली तर त्यामुळे मज्जासंस्थेमध्ये अडथळा येऊन दुधाच्या वाहिनीवरती वरती परिणाम होऊन संसर्ग होण्याचा धोका असतो, तेव्हा यासंबंधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

३) स्तनपानामुळे स्तनाची ठेवण बिघडते

ही खरी गोष्ट आहे की, स्तनाचा आकार  आणि ठेवणं प्रसूतीनंतर बदलते . पण हा स्तनाचा बदल प्रसूतीमुळे आलेला असतो आणि ती गोष्ट सामान्य आहे, स्तनपानामुळे तसे होत नाही. जरी बाळाला स्तनपान दिले तरी किंवा नाही दिले तरी बहुतेक वेळा स्तनाचा आकार मोठा होतो आणि ठेवण बदलते  त्यामुळे हा गैरसमज मनातून काढून टाका.

४) स्तनपानामुळे संतती नियमन होते

संतती नियमनासाठी बाळाला स्तनपान द्यावे हे बऱ्याच लोकांबाबत खरे ठरले असेल पण संतती नियमनासाठी  हा खात्रीशीर उपाय नाही.  हा समज  मूलतः बाळाला स्तनपान दिल्यामुळे दोन मुलांमधले  अंतर वाढते या वरून निर्माण झाला आहे.

५) दुधाची वाहिनी ब्लॉक झाल्यावर स्तनपान करू नये

दुधाची वाहिनीला अडथळा येणे,  ही बाळाला दूध पिण्याची सवय कशी आहे त्यावरून निर्माण होणारी समस्या आहे. जर तुमचे बाळ त्याच्या दूध प्यायच्या वेळत  झोपून राहिले आणि त्याला त्या वेळेचे दूध देता आले नाही, तर काही वेळा दूध बाहेर येऊ लागते आणि दुध येण्याच्या वाहिन्या बंद होऊ शकतात. यावरती उपाय, दररोज वेळच्यावेळी बाळाला स्तनपान देणे. म्हणजे दुधाच्या प्रक्रियेत समतोल होतो. तसेच खूप घट्ट अंत्वस्त्र घालू नका. त्यामुळेही वाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका असतो.

 

Leave a Reply

%d bloggers like this: