tavchecha-saundarya-sathi-ghrich-krims-tayr-kara-soundrya-tips-in-marathi

 

   रात्री झोपताना चेहऱ्याला आणि मानेला एखादं  चांगलं क्रीम लावून झोपणे हे हल्ली सगळ्याच महिलांच एक रोजचं  काम झालं  आहे. पण हि रात्री झोपताना लावायची क्रीम्स खूप महाग असतात. आणि त्यातली काही रासायनिक द्रवे रात्रभर आपल्या त्वचेवर राहिली तर त्याचा उपाय सोडाच पण दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून आम्ही तुम्हाला अशी काही क्रीम्स सांगणार आहोत जी घरच्या घरी करता येतील आणि खिशाला देखील परवडतील.

मिल्क क्रीम आणि रोझ वॉटर क्रीम

एक चमचा (टेबलस्पून) दुधाच्या साय,किंवा विकत मिळणार मिल्क क्रीमएक चमचा गुलाबपाणी, ग्लिसरीन,आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. आणि हे क्लिजिंगसाठी आणि  रात्री झोपताना मॉस्चराइजर म्हणून लावता येईल. यावेळी तुम्ही सकाळी उठाल त्यावेळी तुमची त्वचा एकदम मऊ झाल्याचे जाणवेल. संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्ती देखील हे क्रीम वापरू शकतात

त्वचा उजळ करण्यासाठीचे क्रीम

१० रात्री भिजत घातलेले बदाम सकाळी मऊसर होई पर्यंत बारीक करा. त्यात एक चमचा हळद,५ केशराच्या काड्या अर्धा कप दही आणि ५ थेंब  लिंबाचा रस असे सगळे करून मिश्रण तयार करा. आणि हे मिश्रण चेहऱ्यावर आणि हाताला व मानेला लावा. या तयार केलेल्या क्रीमचा रोज वापर केल्यास त्वचा उजळ होते.

रुक्ष त्वचेसाठी क्रीम

बदाम दुधात उगाळून त्यात थोडी हळद घालून ते  चेहेऱ्यांवर  लावावे. त्यामुळे त्वचा  मऊ होते. दुधामुळे त्वचेतील स्निग्धता वाढते. आणि त्वचेतील रुक्षता कमी होते.

मुरमासाठी क्रीम

कोरफडीचे जेल आणि लव्हेंडर ऑइल आणि प्रिमरोझ ऑइल हे एकत्र करा आणि रोज रात्री झोपायच्या आधी चेहऱ्यावर लावा यामुळे मुरुमांचे प्रमाण कमी होईल आणि लव्हेंडर ऑईलमुळे त्वचा मऊ होऊन झोप देखील छान  लागेल

स्वच्छ सुंदर त्वचेसाठी क्रीम

प्रत्येकी एक चमचा ग्रीन टी अर्क किंवा तेल, बदामाचे तेल  गुलाबपाणी आणि पातळ बी वॅक्स असे सर्व एकत्र करून  रात्री झोपताना लावावे. यामुळे धूळ,प्रदूषण यामुळे काळवंडलेली त्वचा उजळेल आणि त्वचा निरोगी बनेन

थंडीसाठीचे क्रीम

दोन चमचे गुलाब पाण्यात प्रत्येकी एक चमचा नारळाचे तेल ( खोबरेल तेल), बदामाचे तेल आणि ग्लिसरीन हे एकत्र करा. आणि थंडीच्या दिवसात रात्री झोपताना चेहऱ्याला मानेला आणि हाताला लावा. यामुळे थंडीच्या दिवसात त्वचा रुक्ष होणार नाही आणि त्वचेमध्ये आद्र्रता टिकून राहील.

Leave a Reply

%d bloggers like this: