14-mahinyacha-balakansathi-ahar

                  तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस म्हणजे त्याच्या आहारात आता लक्षणीय बदल घडण्यास सुरवात होणार! त्याचे शरीर आता या बदलांचा स्वीकार करण्यास तयार आहे अर्थातच त्याला ‘प्रौढ’ अन्नपदार्थांची ओळख होणार आहे.

१ ते १२ महिने शिशूला स्तनपानातून अनेक गरजेची प्रथिने आणि पोषकद्रव्ये मिळालेली असतात. आईचे दुध हे पाणी, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, असते ज्यामुळे आपण त्याला ‘सुपर फूड’ म्हणू शकतो.पण आपल्या पाल्याला रोजचे आपल्या खाण्यातले जेवण द्यायची जेंव्हा वेळ येते तेंव्हा ते अन्न पौष्टिक आणि सकस आहे याची सर्वप्रथम खात्री करून घ्या.१४ महिन्याच्या शिशूच्या आहाराचे नियोजन करताना काही प्रमाण आहेत ते जाणून घेऊयात. एवढ्या लहान वयाच्या शिशूचे आहार नियोजन करताना किती लक्षपूर्वक सगळी निवड करावी लागते हे पाहून तुम्हला आश्चर्य वाटेल परंतु चौकस आहार हा त्याच्या सर्वांगीण वाढीसाठी गरजेचा आहे.

खाली दिलेल्या वर्गीकरणाप्रमाणे बाळाच्या आहारात या गोष्टींचा मूळ समावेश असायला हवा:

दुग्धजन्य पदार्थ.

दुध हे नेहमीच सगळ्यात महत्वाच्या आहारात मोडणार आहे. बाळाच्या सुधृढ वाढीसाठी दुध अत्यंत महत्वाचे आहे. दुधामध्ये ड जीवनसत्व आणि कॅल्शियम ज्यामुळे दुध हे तुमच्या पाल्याच्या आहाराचा सगळ्यात मोठा हिस्सा असायला हवे. दही आणि ताक सुद्धा दुधाचे उत्तम स्त्रोत आहेत.

धान्य आणि डाळी.

धान्यामध्ये बाजरी, नाचणी,किंवा साळीचा भात यांमध्ये जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. लहानपणापासूनच अश्या डाळी  व धान्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले तर पाल्याला त्याची आवड निर्माण होते आणि आरोग्यदायी आहाराची सवयही लागते. १४ महिन्याच्या बाळाच्या आहारात धान्याचा मुख्यत्वे समावेश करा.

फळे आणि भाज्या

रसरशीत फळे आणि हिरव्या भाज्या लहान मुलांना खाऊ घालणे सोप्पे आणि मजेशीर असते. तुम्ही वेगवेगळ्या पाककृती तयार करू शकता. किवी, चेरी, केळी, सफरचंद, संत्री अशा फळांचे सलाड छानसे  सजवून ठेवले तरीही मुले पटकन खातात. भाज्या उकडून वरणात टाकता येतात किंवा पराठे बनवता येतात.

प्रथिने
जनावरांचे मांस जसे की बीफ किंवा मटन अथवा सस्तन प्राण्याचे मांस जसे कोंबडी किंवा मासे हे प्रथिनांचे खूप मोठे स्त्रोत असतात. परंतु त्याचे प्रमाण कमी ठेवा कारण ते पचायला जाड असतात. शाकाहारात वाटाणे, चणे, पालक, मटकी हे घटक प्रथिनांचे स्त्रोत आहेत. प्रथिने स्नायूंच्या बळकटीसाठी  आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयोगी असतात.प्रथिनांचे प्रमाण आहारात इतर घटकांपेक्षा कमी ठेवा.   

Leave a Reply

%d bloggers like this: